Business

विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी पीअँडजी शिक्षा ची नवीन मोहीम

पीअँडजी शिक्षा दीर्घकाळापासून शिक्षणातील तफावतीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने कार्यरत आहे

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON 26/03/2026 ( 8850212023 )

‘#EraseTheLearningGap’ मोहिमेला बळ देणारे नवे गीत

मुंबई, २६ मार्च २०२६ :   संपूर्ण भारतात १ कोटी मुलांपर्यंत पोहोचून त्यांच्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणल्याच्या अलीकडील यशानंतर, पीअँडजी शिक्षाने आपल्या सातत्यपूर्ण #EraseTheLearningGap मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी‘ अब सब जाएंगे स्कूल पीअँडजी शिक्षा के साथ’ हे गीत लॉन्च केले आहे. जिओहॉटस्टारसोबत भागीदारीत तयार करण्यात आलेले हे गीत शिक्षणातील तफावतीची भावनिक वास्तवता दर्शवते — ती शांत, अनेकदा दुर्लक्षित राहणारी क्षणं, जेव्हा एखादं मूल स्वतःला मागे पडल्यासारखं वाटू लागते; आणि त्याच्या उलट शिकण्याचा आनंद, जो आत्मविश्वास, चिकाटी आणि प्रगतीत रूपांतरित होतो, हेही प्रभावीपणे मांडते.

पीअँडजी शिक्षा दीर्घकाळापासून शिक्षणातील तफावतीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने कार्यरत आहे — ही तफावत म्हणजे मुलाच्या सध्याच्या शिकण्याच्या पातळी आणि अपेक्षित पातळीमधील अंतर. यासोबतच, स्थानिक स्तरावर राबवण्यात येणारे विविध उपक्रम #EraseTheLearningGap या उद्दिष्टाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गेल्या २१ वर्षांत पीअँडजी शिक्षाने १ कोटींहून अधिक मुलांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकल्याचा टप्पा गाठला आहे. ही केवळ एक संख्या नसून, १ कोटी वैयक्तिक प्रवासांचे प्रतिनिधित्व करते, जिथे शिक्षणातील तफावत लवकर ओळखली गेली आणि ती कायमची अडथळा ठरण्यापूर्वीच दूर करण्यात आली.

‘अब सब जाएंगे स्कूल पीअँडजी शिक्षा के साथ’ या गीताच्या लॉन्चनिमित्त एक संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्राचे संचालन किडस्टॉपप्रेसच्या सीईओ व संस्थापक मानसी झवेरी यांनी केले. या चर्चेत द इंडियन पेरेंट पॉडचे सह-संस्थापक नकुल मेहता तसेच पीअँडजी इंडियाचे सीनियर डायरेक्टर – ब्रँड ऑपरेशन्स रजत बरार सहभागी झाले होते.

या गीताबाबत आणि व्यापक मोहिमेबाबत बोलताना, द इंडियन पेरेंट पॉडचे सह-संस्थापक नकुल मेहता म्हणाले, “शिक्षणातील तफावत नेहमी स्पष्टपणे दिसून येत नाही — ती संकोच, लक्ष विचलित होणे किंवा एखाद्या मुलाचे शांत राहणे अशा स्वरूपात समोर येते. ‘अब सब जाएंगे स्कूल पीअँडजी शिक्षा के साथ’ या उपक्रमाचा भाग बनणे माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक अनुभव ठरला, कारण यामुळे मला माझ्या बालपणातील त्या क्षणांची आठवण झाली, जेव्हा नवीन वर्गखोलीच्या वातावरणात जुळवून घेणे नेहमीच सोपे नव्हते.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!