हाऊस ऑफ हिरानंदानी टाउनशिपमध्ये लक्झरी सिनेमा अनुभव
हाऊस ऑफ हिरानंदानी टाउनशिपमध्ये लक्झरी सिनेमा अनुभव

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 240/03/2026 📞 8850212023
ठाणे, NHI24.COM(M): हाऊस ऑफ हिरानंदानीने अभिनेता अजय देवगण यांच्याशी हातमिळवणी करून आज ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील ‘द वॉक’ येथे ‘देवगण सिनेएक्स’ (Devgn CineX) चे उद्घाटन केले आहे. १९ मार्च रोजी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसह या मल्टीप्लेक्सचा श्रीगणेशा झाला. ठाण्यातील या विस्तीर्ण टाउनशिपमध्ये मल्टीप्लेक्स सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एकूण पाच स्क्रीन्स आणि ९५३ आसनक्षमता असलेले हे मल्टीप्लेक्स ‘द वॉक’मधील बेलोना टॉवरमध्ये आहे. हे दालन अत्याधुनिक डॉल्बी साउंड आणि डिजिटल प्रोजेक्शन तंत्रज्ञानाने सज्ज आहे. हाऊस ऑफ हिरानंदानीचे चेअरमन श्री. सुरेंद्र हिरानंदानी आणि देवगण सिनेएक्सचे सह-संस्थापक तसेच पॅनोरमा स्टुडिओचे चेअरमन श्री. कुमार मंगत पाठक यांच्या हस्ते, इतर मान्यवरांच्या उपस्थितीत याचे भव्य उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभात दीपप्रज्वलनासोबतच संपूर्ण सिनेमा हॉलची पाहणी देखील करण्यात आली.
हिरानंदानी इस्टेट ३७५ एकरवर विस्तारलेले असून, येथे १५० पेक्षा अधिक निवासी टॉवर्समध्ये १०,००० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. तसेच, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि वीवर्क सारख्या दिग्गज कंपन्यांची कार्यालये देखील येथे आहेत.
‘द वॉक’ मध्ये रिटेल, डायनिंग आणि वेलनेसचे ३५ पेक्षा जास्त आऊटलेट्स आहेत. देवगण सिनेएक्स (पूर्वीचे एनवाय सिनेमाज) सध्या अहमदाबाद, गुरुग्राम, गुवाहाटी आणि मुंबईसह अनेक शहरांतील १९ ठिकाणांवर ५७ स्क्रीन्स चालवत आहे.
हाऊस ऑफ हिरानंदानीचे संचालक हर्ष हिरानंदानी म्हणाले की , मल्टीप्लेक्सच्या आल्यामुळे टाउनशिपची जीवनशैली आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील. ते म्हणाले, “आज हिरानंदानी इस्टेटमध्ये १०,००० पेक्षा जास्त कुटुंबे राहतात, जिथे शाळा, रुग्णालय, कार्यालये आणि रिटेल सारख्या सर्व सुविधा परिसरामध्येच उपलब्ध आहेत. मनोरंजन आणि विरंगुळ्यासाठी या इकोसिस्टममध्ये एका मल्टीप्लेक्सची उणीव होती. ही कमतरता भरून काढण्यासाठी आणि हा अनुभव टाउनशिपमध्ये आणण्यासाठी आम्ही देवगण सिनेएक्ससोबत भागीदारी केली आहे, याचा आम्हाला आनंद आहे.”
देवगण सिनेएक्सचे सह-संस्थापक आणि पॅनोरमा स्टुडिओचे चेअरमन कुमार मंगत पाठक म्हणाले , “संपूर्ण भारतातील प्रेक्षकांना लक्झरी सिनेमाचा अनुभव देण्याच्या दृष्टिकोनातून देवगण सिनेएक्सची निर्मिती करण्यात आली होती. हिरानंदानी इस्टेटमधील ‘द वॉक’ येथे ठाणेकरांसाठी चित्रपट पाहण्याचा एक भव्य अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी हाऊस ऑफ हिरानंदानीसोबत भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या भागीदारीमुळे आम्ही चित्रपटप्रेमींना त्यांच्या घराच्या जवळच जागतिक दर्जाचे मनोरंजन देऊ शकू आणि १९ मार्च रोजी ‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या पहिल्या स्क्रीनिंगसह प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”




