आवड आणि जबाबदारी यांचा समतोल साधण्यासाठी भारतीयांना प्रेरित करणारी एसबीआय लाइफचा नवीन उपक्रम, नवीन ब्रँड ॲम्बेसेडरसह; ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचा सहभाग असलेली ‘जॉली अँड पॉली’ मोहीम
ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचा सहभाग असलेली 'जॉली अँड पॉली' मोहीम

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 03/01/2026 📞 8850212023
~ एसबीआय लाईफच्या या मोहिमेत ब्रँड अॅम्बेसेडर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा हे जॉली आणि पॉली आहेत, जे जीवन विम्यामुळे कोणालाही खरोखरच त्यांच्या आवडीनुसार काम करण्यास सक्षम करत असल्याचे सांगतात
मुंबई NHI24.COM(M) : भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने क्रिकेट सुपरस्टार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना ‘जॉली‘ आणि ‘पॉली‘ या दोन विशिष्ट भूमिकांमध्ये सादर करण्यात आले आहे, जे लोकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतात, त्याच वेळी कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील, याचीही काळजी घेतात.
जीवन विम्याबद्दलची जागरूकता वाढत असतानाच एसबीआय लाइफ लोकांच्या दैनंदिन जीवनात हा विषय अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करते आहे. ‘अपने लिए, अपनो के लिए‘ या ब्रँड तत्त्वज्ञानावर आधारित, ‘जॉली आणि पॉली‘ हे एक साधी पण महत्त्वाची बाजू समोर आणतात: वैयक्तिक आकांक्षा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांना कधीही पर्याय नसतो. कुटुंबीयांच्या गरजा आणि आकांक्षा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करून, कोणीही स्वतःची स्वप्ने साकार करू शकते.
ऋषभ पंतने साकारलेला ‘जॉली‘ हा सहज जगणारा, आशावाद आणि आयुष्य पूर्णपणे जगण्याचे धैर्य यांचे प्रतीक आहे. तो लोकांना जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसतो. नियोजन करणे म्हणजे स्वातंत्र्य सोडणे नव्हे, तर त्याचे संरक्षण करणे आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. तर रवींद्र जडेजाने साकारलेला ‘पॉली‘ हा शांतपणा, आत्मविश्वास आणि दूरदृष्टीचे प्रतिनिधित्व करतो. तो शांतपणे आणि स्पष्टपणे संभाषणाला दिशा देतो. नियोजन ही एक जबाबदारी आहे, जी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि कौटुंबिक सुरक्षा या दोन्हींना बळकट करते.
‘जॉली आणि पॉली’ ही जोडी भारतीय घरांमध्ये होणाऱ्या घरगुती संवादांची झलक देते. जिथे पुढे जाण्याच्या इच्छेचा आणि प्रियजनांची काळजी घेण्याच्या जबाबदारीचा समतोल साधला जातो. विम्याचे नाट्यरुपांतर करणे ही त्यांची भूमिका नाही, तर सर्वसामान्यांसाठी त्याला महत्त्वाचा ठरवणे, ही आहे. जीवन विम्याद्वारे मिळणारे संरक्षण हे व्यक्तीला सक्षम बनवण्यासाठी पुरेसे आहे. यामुळेच भविष्याबद्दलची आस राहते आणि प्रगती शक्य होते.
एसबीआय लाइफने दैनंदिन भारतीय वातावरणाशी अनुरूप अशा दोन टीव्ही जाहिराती सादर केल्या आहेत—जिथे आकांक्षा आणि जबाबदारी परस्परांना भेटतात. या दोघांमधील अर्थपूर्ण संवादातून व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो.
पहिल्या टीव्हीसीमध्ये एका तरुण मुलीने कुस्तीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतल्याचे दाखवले आहे. यामुळे तिच्या कुटुंबात चिंता निर्माण होते. त्यावेळी जॉली आणि पॉली तिच्या कुटुंबाला हे समजावून सांगतात की, एसबीआय लाइफमुळे कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेची खात्री असल्याने ती आपली स्वप्ने नक्कीच पूर्ण करू शकतात. दुसऱ्या टीव्हीसीमध्ये एक पुरुष महिलांच्या हक्कांशी संबंधित कायद्याचा अभ्यास करू लागतो, मात्र, यामुळे कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक स्थितीबद्दल चिंता निर्माण होते. तेव्हा जॉली आणि पॉली हेच अधोरेखित करतात की, जेव्हा कुटुंबाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असते, तेव्हा व्यक्तींना स्वतःच्या आवडी निवडी जपण्याचे स्वातंत्र्य मिळते.
या दोन्ही जाहिरातींमध्ये, ‘जॉली आणि पॉली‘ शांतपणे कथेतील पात्रांना मार्गदर्शन करतात आणि हा संदेश देतात की, जेव्हा प्रियजनांना दिलेली वचने पूर्ण केली जातात, त्यांचे भविष्य सुरक्षित केले जाते, तेव्हा व्यक्तीच्या स्वतःच्या इच्छा अधिक मजबूत होतात. यामुळेच या जाहिरातींचा शेवट त्यातील पात्रांच्या आवाहनाने होतो: “करो पूरे अपने इरादे, अपनो से किए सभी वादे”
टीव्हीसींची लिंक:
नवीन ब्रँड सहकार्य आणि टीव्हीसीच्या (TVC) लाँचिंगवर भाष्य करताना, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि सीएसआर विभागाचे प्रमुख श्री. रवींद्र शर्मा म्हणाले, “महत्त्वाकांक्षांमध्ये भारत प्रत्येक पिढीमागे बदल अनुभवत आहे, जिथे व्यक्ती आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करत असतानाच, अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगू इच्छितात. आमचा विश्वास आहे की, जीवन विमा हा समतोल साधण्यास मदत करतो. ‘जॉली अँड पॉली’ ही संकल्पना हाच विश्वास सोप्या आणि सहज शब्दात मांडतात. हे दाखवून देतात की, जेव्हा लोक आपल्या जवळच्यांसाठी आर्थिकदृष्ट्या तयार असतात, तेव्हा ते आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात. प्रियजनांच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षेची खात्री असलेल्या व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम असतात, आमच्या ‘अपने लिए, अपनों के लिए’ हे तत्त्वज्ञान याच दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमचे ब्रँड ॲम्बेसेडर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या माध्यमातून या पात्रांना जिवंत करून, आम्ही एक अशी गोष्ट तयार करत आहोत जी काळानुसार विकसित होत जाईल—आणि जीवन विम्याबद्दलची कसलीही भीती राहणार नाही. उलट याबद्दल जागरूकता निर्माण होऊन सबलीकरण, आत्मविश्वास आणि दैनंदिन जीवनातील गरज, याचे महत्त्व पटवेल. ही मोहीम जीवन विमा अधिक सुलभ बनवण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेवर जोर देते, ज्यामुळे ब्रँडबद्दलची आपुलकी आणि आर्थिक कल्याणाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून जीवन विम्याबद्दलची समज या दोन्ही गोष्टी मजबूत होतात.”
या भागीदारीबद्दल आपले विचार व्यक्त करताना, क्रिकेटचा सुपरस्टार आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्सचा ब्रँड ॲम्बेसेडर ऋषभ पंत, उर्फ जॉली म्हणाला, “आपल्या देशातील तरुणांची स्वप्ने मोठी आहेत आणि त्या स्वप्नांना पंख देण्यासाठी संधी निर्माण करण्यावर माझा नेहमीच विश्वास आहे. खरं तर, व्यक्तींना भविष्य घडवण्यासाठी सक्षम करण्याच्या या ब्रँडच्या वचनबद्धतेशी मी मनापासून जोडला गेलो आहे. वास्तविक, स्वतःला जे आवडते, ते करावे, त्याचा पाठपुरावा करावा, या तत्त्वावर मी जगतो आणि जॉली म्हणून, मी कुटुंबांना त्यांच्या मुलांना त्यांच्या आवडीचा पाठपुरावा करू देण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे एसबीआय लाइफचा ब्रँड ॲम्बेसेडर असणे हे मला स्वाभाविक वाटते, कारण स्वप्नांना पाठिंबा देण्याची आणि अनेक संधी निर्माण करण्याची भावना माझ्याशी जोडलेली आहे.”
एसबीआय लाइफ इन्शुरन्सचा ब्रँड ॲम्बेसेडर, रवींद्र जडेजा, उर्फ पॉली म्हणाला, “एसबीआय लाइफचा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याने मला देशभरातील कुटुंबांशी गप्पा मारण्याची आणि त्यांच्या घरातील संवादाचा एक भाग होण्याची एक अनोखी संधी मिळते. पॉली म्हणून, मी लोकांना विचारपूर्वक नियोजन करण्यास प्रोत्साहित करत आहे, जेणेकरून वैयक्तिक स्वप्ने पूर्ण करताना त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांशी कसलीही तडजोड करावी लागणार नाही. व्यक्ती आणि कुटुंबांना हे पटवून देण्याच्या एसबीआय लाइफच्या या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे. वैयक्तिक आकांक्षा आणि कौटुंबिक ध्येय यांचा समतोल साधणे केवळ शक्य ठरवणारेच नाही, तर ते सबलीकरण करणारे देखील आहे. मला मनापासून आशा आहे की, आपण एक सांस्कृतिक बदल घडवून आणू आणि एक व्यक्ती – एक कुटुंब याप्रमाणे आपल्या राष्ट्राच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम करू शकू.”
‘जॉली अँड पॉली’च्या माध्यमातून, जीवन, महत्त्वाकांक्षा आणि जबाबदारी यांबद्दलच्या आधुनिक विचारांना प्रतिबिंबित करणारी एक दीर्घकालीन कथा तयार करण्याचे एसबीआय लाइफचे उद्दिष्ट आहे. ही पात्रे घरोघरी ओळखीची ठरत असताना, एसबीआय लाइफ स्वतःला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थापित करते, आणि जीवनातील अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर व्यक्तींना विश्वास देऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम करते.
ही मोहीम एका मोठ्या कथाविश्वाची सुरुवात आहे, ज्याच्या केंद्रस्थानी ‘जॉली आणि पॉली’ आहेत, आणि महत्त्वाकांक्षा आणि तयारी यांचा समतोल साधण्यातूनच खरी प्रगती साधली जाते, या एसबीआय लाइफच्या विश्वासाला याद्वारे बळ मिळते.



