Uncategorizedखेल

राज्य पातळी आंतर को-ऑपरेटिव्ह बँक कॅरम व बुध्दिबळ स्पर्धा २४ जानेवारीपासून

राज्य पातळी आंतर को-ऑपरेटिव्ह बँक कॅरम व बुध्दिबळ स्पर्धा २४ जानेवारीपासून

POSTED BY ANAGHA SAKPAL DATED ON 15/01/2026(9004379946)

MUMBAI (NHI@24.CON) माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या एकमेव मान्यता प्राप्त को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य पातळी आंतर को-ऑपरेटिव्ह बँक कॅरम व बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २४ व २५ जानेवारी रोजी दादर-पश्चिम येथील सिबीईयूएम सभागृहात होईल. मुंबई शहर व उपनगरसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील को-ऑपरेटिव्ह बँकांमधील कर्मचारीवर्ग प्रतिवर्षीप्रमाणे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत.

को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई संलग्नीत सहकारी बँकांमधील महाराष्ट्र राज्यातील महिला व पुरुष खेळाडूंसाठी ही स्पर्धा मर्यादित आहे. स्पर्धा बाद पध्दतीने होणार आहे. पहिल्या ४ विजेत्या-उपविजेत्या स्पर्धकांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक देऊन अध्यक्ष आनंदराव अडसूळ व सल्लागार माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी युनियन कार्यालय ( दूरध्वनी: २४३७ १७५५/ ९९६९२ ६५५३८), ८१/८३ शालिनी पॅलेस, भवानी शंकर रोड, दादर-पश्चिम, मुंबई-२८ येथे १९ जानेवारीपर्यंत संपर्क साधावा. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे तसेच इतर पदाधिकारी जनार्दन मोरे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, नितीन गवादे, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर आदी कार्यरत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!