पत्रकार मित्र दीपक कैतके यांना ‘सर्वोत्कृष्ट राजकीय वार्ताहर’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार
२७ डिसेंबर रोजी मुंबईत रंगणार भव्य सोहळा; पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांचा होणार गौरव
श्री दीपक हनुमान कायतके, वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता, मुंबई, महाराष्ट्र. तसेच JAC, GoM चे अध्यक्ष.
मुंबई,( NHI@24.COM) : पत्रकारिता क्षेत्रात निःपक्षपाती, निर्भीड आणि लोकहितलक्षी वार्तांकनासाठी श्री. दीपक हनुमान कैतके यांना ‘PVS एक्सलन्स अवॉर्ड-२०२५’ अंतर्गत ‘सर्वोत्कृष्ट राजकीय वार्ताहर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार विकास संघ तर्फे आयोजित हा गौरव सोहळा २७ डिसेंबर रोजी साई पॅलेस हॉटेल, कांचपाडा, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई येथे संपन्न होईल. दीपक कैतके हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील देवपिंपरी येथील रहिवासी असून, सध्या ते ‘दैनिक महासागर’ आणि ‘हिंदुस्तान पोस्ट’चे मुंबई मुख्य वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत.
पत्रकार विकास संघाने आपली १७ वर्षांची रचनात्मक आणि अर्थपूर्ण वाटचाल पूर्ण केली असून आता संघटना १८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘PVS एक्सलन्स अवॉर्ड्स–२०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडिया, छायाचित्रण आणि संपादन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे.
इतर पुरस्कार विजेते:
PVS ज्युरी अवॉर्ड (सर्वोत्कृष्ट संपादक): संजय सावंत (आपलं महानगर);
PVS ज्युरी रौप्य महोत्सव पुरस्कार: ओमप्रकाश तिवारी (दैनिक जागरण); PVS जीवनगौरव (पत्रकारिता): शेषनाथ सिंग (दुपार का सामना)
PVS जीवनगौरव (छायाचित्रकार): प्रदीप धिवार
PVS सर्वोत्कृष्ट वार्ताहर (सामान्य श्रेणी): भानू प्रकाश मिश्रा (दैनिक भास्कर); सर्वोत्कृष्ट गुन्हेगारी वार्ताहर (Crime Reporter): डॉ. अखिलेश तिवारी (नवभारत टाइम्स);सर्वोत्कृष्ट युवा पत्रकार: नम्रता अरविंद दुबे; सर्वोत्कृष्ट डिजिटल पत्रकार: प्रवीण नलावडे; सर्वोत्कृष्ट टीव्ही रिपोर्टर: कृष्णा सोनारवडकर; सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार: शैलेश जाधव.सर्वोत्कृष्ट व्हिडिओ जर्नलिस्ट: राजेंद्र दशरथ गायकवाड;
PVS ज्युरी अवॉर्ड (कै. शिव देवनाथ स्मृती – अर्धवेळ पत्रकारिता): अनिल शुक्ला (नवभारत टाइम्स);
PVS ज्युरी अवॉर्ड (संपादकीय): विक्रम जाधव.
राजकीय पत्रकारितेत एक खंबीर ओळख:
दैनिक महासागरचे ज्येष्ठ पत्रकार दीपक कैतके यांना राजकीय घडामोडींचे तथ्यपूर्ण, संतुलित आणि प्रभावी वार्तांकन केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे. PVS च्या ज्युरीनुसार, कैतके यांनी जनहिताचे प्रश्न प्रकर्षाने मांडून लोकशाही मूल्यांना बळकटी दिली आहे. PVS पत्रकार मित्र पुरस्कार-२०२५: पत्रकारांना सहकार्य केल्याबद्दल आणि सामाजिक कार्यात सक्रिय योगदान दिल्याबद्दल डॉ. अजय गुप्ता (वैद्यकीय अधीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय), प्रेम प्रकाश दुबे, केशव अंजन, उदय प्रताप सिंग, सुनील काबरा आणि अभिषेक जाजू यांना ‘PVS पत्रकार मित्र पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.
PVS एक्सलन्स अवॉर्ड्सच्या माध्यमातून पत्रकारितेतील मूल्ये, सत्य आणि लोकहिताची बांधिलकी अधोरेखित केली जाते. हा सोहळा केवळ पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची दखल घेत नाही, तर नवीन पिढीतील पत्रकारांना जबाबदार आणि निर्भीड पत्रकारितेसाठी प्रेरित करतो. नुकतेच १४ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद’च्या कार्यक्रमात ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळखले जाणारे दीपक कैतके यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पत्रकारांच्या प्रश्नांवर, विशेषतः आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



