Uncategorized

महापौर कॅरम स्पर्धेच्या पूर्वतयारी सराव उपक्रमास शालेय खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महापौर कॅरम स्पर्धे

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 08/09/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM : आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, चेंबूरनाका मनपा शाळा व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या विनाशुल्क पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात चेंबूर परिसरातील शालेय ६५ कॅरम खेळाडूंनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू नरसिंगराव सकारी यांनी शालेय खेळाडूंना कॅरम सराव व कौशल्याबाबत तर शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी कॅरम विषयक प्रमुख नियमांबाबत मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक नरसिंगराव यांनी शालेय कॅरम खेळाडूंना बसण्याची शास्त्रीय बैठक, स्ट्रायकर सोडण्यासाठी वापरली जाणारी बोटांची पकड, सोंगट्या घेतांना घ्यावी लागणारी दक्षता, सरळ जाणाऱ्या सोंगट्यांचा सराव आदीबाबत चँम्पियन कॅरम बोर्डवर मार्गदर्शन केले. तसेच शालेय मुलांच्या खेळाविषयक शंकांचे निरसन देखील केले. याप्रसंगी कनिष्ठ पर्यवेक्षक रघुनाथ सोनवणे, क्रीडा शिक्षक डॉ.जितेंद्र लिंबकर, डॉ. भारती ढोकरट, जागृती पाटील, स्नेहल दौंड, अर्चना साबळे, चंद्रकांत करंगुटकर आदींनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय मुलामुलींची विनाशुल्क एकेरी कॅरम स्पर्धा २६ व २७ सप्टेंबर रोजी दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!