एसआरआयटी इंडिया लिमिटेडचा आयपीओ २८ सप्टेंबर २०२६ ला खोल आर्थिक आहे .
या इश्यूमध्ये प्रत्येकी ₹५ दर्शनी मूल्याचे १,६८,००,००० इक्विटी शेअर्स असून, त्यासाठी प्रति इक्विटी शेअर ₹१२३ ते ₹१३० असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 24/09/2026 (8850212023) 📞
● एकूण इश्यू आकार – प्रत्येकी ₹५ दर्शनी मूल्याची १,६८,००,००० पर्यंत इक्विटी शेअर्स
● आयपीओ आकार – ₹२१८.४ कोटी (वरच्या किंमत पट्ट्यानुसार)
● किंमत पट्टा – प्रति इक्विटी शेअर ₹१२३ ते ₹१३०
● लॉट आकार – ११५ इक्विटी शेअर्स
मुंबई, २४ सप्टेंबर २०२६ – एसआरआयटी इंडिया लिमिटेड, बंगळुरू मध्ये मुख्यालय असलेली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड सर्व्हिसेस (आयटी/आयटीईएस) सोल्यूशन्स कंपनी, आपला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ला खुला करणार आहे. या आयपीओद्वारे वरच्या किंमत पट्ट्यानुसार ₹२१८.४ कोटी उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असून, कंपनीचे शेअर्स एनएसई आणि बीएसईवर सूचीबद्ध केले जाणार आहेत.
इक्विटी शेअर वाटप:
- नेट क्यूआईबी – इश्यूच्या ५०% पेक्षा जास्त नाही
- एनआईआई – इश्यूच्या किमान १५%
- इंडिविज्युअल इन्व्हेस्टर्स – इश्यूच्या किमान ३५%
आयपीओतून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा वापर विद्यमान उत्पादनांच्या आधुनिकीकरणासाठी आणि पुनर्विकासासाठी आवश्यक भांडवली खर्चासाठी निधी उपलब्ध करणे, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करणे, ओळख न झालेल्या अधिग्रहणांद्वारे आणि इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे अजैविक वाढ साध्य करणे, तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी केला जाणार आहे.अँकर बिडिंग शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ला होणार असून, आयपीओ सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ला खुला होऊन बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ला बंद होणार आहे. या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर चॉइस कॅपिटल अडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड असून, इश्यूचे रजिस्ट्रार केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड आहेत.
एसआरआयटी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,डॉ. नम्बियार राघवन मधुसूदन म्हणाले, “ सदर आयपीओ हा अडीच दशकांहून अधिक काळाच्या एसआरआयटीच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. ई-गव्हर्नन्स, दूरसंचार आणि ब्रॉडबँड तसेच आरोग्यसेवा क्षेत्रातील मिशन-क्रिटिकल डिजिटल प्लॅटफॉर्मची रचना, अंमलबजावणी आणि संचालन करण्याच्या क्षमतेचा आम्ही विकास केला आहे. उत्पादनांचे आधुनिकीकरण, खेळते भांडवल आणि धोरणात्मक विकास उपक्रमांसाठी निव्वळ निधीचा प्रस्तावित वापर आमच्या व्यवसायाच्या पुढील टप्प्याला पाठबळ देण्यासाठी असून, तंत्रज्ञानविषयक क्षमता अधिक मजबूत करताना आणि सोल्युशन्स पोर्टफोलिओचा विस्तार करताना याचा फायदा होईल.”

डावीकडून उजवीकडे —
श्री. अनुज किल्ला
चॉइस कॅपिटल अडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड
डॉ. नंबियार राघवन मधुसूदन
एसआरआयटी इंडिया लिमिटेड
एसआरआयटी इंडिया लिमिटेडचॉइस कॅपिटल अडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री रतिराज टिबडेवाल म्हणाले, “सरकारी संस्था आणि उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावरील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचा एसआरआयटी इंडिया लिमिटेडचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. ३० जून २०२६पर्यंत कंपनीची प्रलंबित ऑर्डर बुक ₹१२,०४७.१७ दशलक्ष होती. आर्थिक वर्ष २०२६मध्ये ऑपरेशन्समधून मिळणारे उत्पन्न ₹४,४९९.९९ दशलक्ष, ऑपरेटिंग ईबीआयटीडीए ₹६४७.७४ दशलक्ष आणि पीएटी ₹४३२.८९ दशलक्ष होता. उत्पादनांचे आधुनिकीकरण, खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि धोरणात्मक विकास उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी फ्रेश इश्यूचा प्रस्ताव आहे.”
एसआरआयटी इंडिया लिमिटेडविषयी :
एसआरआयटी इंडिया लिमिटेड ही बेंगळुरूस्थित आयटी/आयटीईएस सोल्युशन्स कंपनी असून, कस्टम अप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि इंटिग्रेशन सेवांद्वारे डिजिटल सोल्युशन्स तसेच सिस्टम ऑटोमेशन सेवा प्रदान करते. कंपनी भारतातील सरकारी संस्था आणि उद्योगांसाठी तसेच निवडक परदेशी बाजारपेठांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मची रचना, अंमलबजावणी आणि संचालन करते. कंपनी आपल्या प्रमुख कार्यक्षेत्रांमध्ये एआय-सक्षम सोल्युशन्सद्वारे एआय क्षमता मजबूत करत असून, मोठ्या प्रमाणावरील मिशन-क्रिटिकल प्रकल्पांची अंमलबजावणी केली आहे.
कंपनीचे कामकाज ई-गव्हर्नन्स, दूरसंचार आणि ब्रॉडबँड तसेच आरोग्यसेवा या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये विभागलेले आहे. आर्किटेक्चर आणि डिझाइन, बिल्ड आणि इंटिग्रेशन, डेटा मायग्रेशन, डिप्लॉयमेंट तसेच सातत्यपूर्ण ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स अशा संपूर्ण सेवा-व्याप्तीद्वारे या सेवा दिल्या जातात. कंपनीच्या डिलिव्हरी प्रक्रियांना सीएमएमआय व्ही३.० (डीईव्ही) मॅच्युरिटी लेव्हल ५ (ऑप्टिमायझिंग) आणि सिस्टम्स सिक्युरिटी इंजिनीअरिंग कॅपॅबिलिटी मॅच्युरिटी मॉडेलनुसार मानांकन मिळाले आहे. तसेच, माहिती सुरक्षा, आयटी सेवा व्यवस्थापन, गुणवत्ता, पर्यावरण आणि व्यावसायिक आरोग्य व सुरक्षा या क्षेत्रांमध्ये कंपनीकडे नऊ आयएसओ प्रमाणपत्रे आहेत. आर्थिक वर्ष २०२६मध्ये कंपनीने ₹४,४९९.९९ दशलक्ष महसूल, १४.३९% ईबीआयटीडीए मार्जिन आणि ९.६२% पीएटी मार्जिन नोंदवले.
अस्वीकरण :
या दस्तऐवजात ऐतिहासिक तथ्ये नसलेली काही विधाने ही भविष्यातील अपेक्षांवर आधारित विधाने आहेत. अशी भविष्यातील अपेक्षांवर आधारित विधाने सरकारी कारवाई, स्थानिक, राजकीय किंवा आर्थिक घडामोडी, तंत्रज्ञानविषयक जोखीम आणि इतर अनेक घटकांसारख्या विविध जोखीम व अनिश्चिततेच्या अधीन आहेत. या घटकांमुळे प्रत्यक्ष परिणाम संबंधित भविष्यातील अपेक्षांमध्ये नमूद केलेल्या परिणामांपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळे असू शकतात. अशा विधानांच्या आधारे करण्यात आलेल्या कोणत्याही कृतीसाठी कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. तसेच, त्यानंतरच्या घटना किंवा परिस्थिती प्रतिबिंबित करण्यासाठी या भविष्यातील अपेक्षांवर आधारित विधानांमध्ये सार्वजनिकरित्या अद्ययावत माहिती देण्याचे कोणतेही बंधन कंपनी स्वीकारत नाही.




