मनिका प्लास्टेक लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होणार
प्रत्येक इक्विटी शेअरसाठी प्राईस बँड ४० रूपये ते ४३ रूपये निश्चित करण्यात आला आहे

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 07/09/2026 (8850212023)
- फ्लोर प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या (प्रति शेअर २ रूपये) २० पट आणि कॅप प्राईस २१.५० पट आहे.
- बिड/इश्यू ओपनिंग तारीख – शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६, क्लोजिंग तारीख – बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ (“बिड तारखा”).
- अँकर इन्व्हेस्टर बिड/ऑफर कालावधी गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ असेल.
- किमान ३४८ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३४८ इक्विटी शेअर्सच्या पटीत बिड्स (“बोलींची संख्या”) लावल्या जाऊ शकतात
- आरएचपी लिंक: https://manikaplastech.com/wpcontent/uploads/2026/09/RHP.pdf
मुंबई (NHI24) : मनिका प्लास्टेकने (‘कंपनी‘) आपल्या इक्विटी शेअर्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) संबंधी बिड/ऑफर शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी खुला करण्याची घोषणा केली आहे. या ऑफरचा प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ४० रूपये ते ४३ रूपये निश्चित करण्यात आला आहे. (‘प्राईस बँड’) किमान ३४८ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३४८ इक्विटी शेअर्सच्या पटीत अर्ज केले जाऊ शकतात. (‘किमान बिड लॉट’).
अँकर इन्व्हेस्टर बिडिंग तारीख गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. हा बिड/ऑफर शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होईल आणि बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल. या ऑफरमध्ये ९२.५ कोटी रूपयांपर्यंतच्या (‘फ्रेश इश्यू’) इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि ७६,७४,४१८ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा (‘ऑफर फॉर सेल’) समावेश आहे. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य २ रूपये आहे.
कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ रक्कमेचा वापर खालील उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते:
(i) प्लांट आणि मशिनरी खरेदीसाठी लागणाऱ्या भांडवली खर्चासाठी;
(ii) कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेडीसाठी; आणि
(iii) सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी.
या रेड हॅरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”) वर सूचीबद्ध (list) करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी बीएसई डेझिग्नेटेड स्टॉक एक्सचेंज असेल. पँटोमॅथ कॅपिटल अडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
ही ऑफर सुधारित सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रूल्स, १९५७ च्या (‘एससीआरआर’) नियम १९(२)(बी) सह वाचल्या गेलेल्या सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या नियम ३१ अंतर्गत केली जात आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या नियम ६(१) नुसार बुक बिल्डिंग प्रोसेसद्वारे केली जात आहे; ज्यामध्ये सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या नियम ३२(२) नुसार ऑफरच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”, आणि असा भाग, “क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणात वाटपासाठी उपलब्ध नसेल. मात्र, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार आमची कंपनी, बुक रनिंग लीड मॅनेजर्सचा (बीआरएलएम) सल्ला घेऊन क्यूआयबी पोर्शनच्या ६० टक्क्यांपर्यंत भाग अँकर इन्व्हेस्टर्सना स्वविवेकाधिकारावर (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”) वाटप करू शकते; ज्यापैकी ४० टक्के भाग पुढीलप्रमाणे राखीव असेल: (i) ३३.३३ टक्के घरगुती म्युच्युअल फंडांसाठी; आणि (ii) ६.६७ टक्के आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी, जे अँकर इन्व्हेस्टर वाटप किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत वैध बिड्स प्राप्त होण्याच्या अधीन राहील. वरील (ii) मध्ये कमी सबस्क्रिप्शन झाल्यास, ते वाटप घरगुती म्युच्युअल फंडांना केले जाऊ शकते. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये कमी सबस्क्रिप्शन झाल्यास किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबी पोर्शनमध्ये (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळून) (“नेट क्यूआयबी पोर्शन”) जोडले जातील. तसेच, नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५ टक्के भाग केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणात वाटपासाठी उपलब्ध असेल, आणि उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शन हा ऑफर प्राईसवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत वैध बिड्स प्राप्त होण्याच्या अधीन राहून, म्युच्युअल फंडासह सर्व क्यूआयबी बोलीदारांना (अँकर इन्व्हेस्टर्स वगळून) प्रमाणात वाटपासाठी उपलब्ध असेल.

पण, म्युच्युअल फंडांची एकूण मागणी क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स सर्व क्यूआयबींना प्रमाणात वाटप करण्यासाठी उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील. याशिवाय, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार ऑफरच्या किमान १५ टक्के भाग बिगर-संस्थात्मक बोलीदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल, ज्यापैकी (अ) अशा पोर्शनपैकी एक-तृतीयंश भाग ०.२० दशलक्ष रूपयांपेक्षा जास्त आणि १.०० दशलक्ष रूपयांपर्यंत अर्जाचा आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल; आणि (ब) अशा पोर्शनपैकी दोन-तृतीयंश भाग १.०० दशलक्ष रूपयांपेक्षा जास्त अर्जाचा आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल; जर या उप-श्रेण्यांपैकी कोणत्याही एका श्रेणीतील सबस्क्राइब न झालेला भाग बिगर-संस्थात्मक बोलीदारांच्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना वाटप केला जाऊ शकतो. तसेच, ऑफर प्राईसवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत वैध बिड्स प्राप्त होण्याच्या अधीन राहून, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार ऑफरच्या किमान ३५ टक्के भाग रिटेल वैयक्तिक बोलीदारांना (“आरआयबी”) वाटपासाठी उपलब्ध असेल.

अँकर इन्व्हेस्टर्स वगळता सर्व संभाव्य बोलीदारांना त्यांच्या संबंधित बँक खात्यांचे तपशील (यूपीआय यंत्रणेचा वापर करणाऱ्या यूपीआय बोलीदारांच्या बाबतीत यूपीआय आयडीसह) प्रदान करून अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेद्वारेच ऑफरमध्ये भाग घेणे बंधनकारक आहे; ज्यानुसार त्यांची बोली रक्कम लागू असल्यानुसार सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स (एससीएसबी) किंवा स्पॉन्सर बँकांद्वारे ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेद्वारे ऑफरच्या अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही.




