IPO AND MARKET NEWS

‘मिल्की मिस्ट डेअरी फूड लिमिटेड’चा आयपीओ ११ ऑगस्टपासून खुला

गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिवस सोमवार, १० ऑगस्ट २०२६ असणार आहे.

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON  : 08/08/2026 (8850212023)

  • प्रत्येकी दोन रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअरसाठी १३३ ते १४० रुपये असा किंमतपट्टा निश्चित.

  • ‘मिल्की मिस्ट डेअरी फूड कंपनी’च्या या ‘आयपीओ’मध्ये २ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठीची किमान किंमत (फ्लोअर प्राइस) ६६.५० पट, तर कमाल किंमत (कॅप प्राइस) ७० पट.

  • बोली वा ऑफरची प्रक्रिया मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होऊन गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी समाप्त होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिवस सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६.

  • गुंतवणूकदारांना किमान १०७ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल. त्यानंतर १०७ शेअर्सच्या पटीत बोली लावता येणार आहे.

  • कर्मचारी आरक्षण भागातून अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर १३ रुपयांची सवलत देण्यात येणार आहे.

  • ४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसची लिंक : ‘मिल्की मिस्ट डेअरी फूड लिमिटेड’चा आयपीओ ११ ऑगस्टपासून खुला

  • किंमतपट्ट्याच्या जाहिरातीची लिंक : https://epaper.financialexpress.com/4184461/Mumbai/August-06-2026#page/28/1

मुंबई, ६ ऑगस्ट २०२६ (NHI24.COM) : ‘मिल्की मिस्ट डेअरी फूड लिमिटेड’च्या प्राथमिक समभाग विक्रीसाठीची (आयपीओ) बोली वा ऑफरची प्रक्रिया मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिवस सोमवार, १० ऑगस्ट २०२६ असणार आहे. बोलीची प्रक्रिया गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी समाप्त होईल. गुंतवणूकदारांना किमान १०७ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल. त्यानंतर १०७ शेअर्सच्या पटीत बोली लावता येणार आहे.या ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर १३३ ते १४० रुपये असा किंमतपट्टा (प्राइस बँड) निश्चित करण्यात आला आहे.दोन रुपये दर्शनी मूल्याच्या एकूण [] इक्विटी शेअर्सची ही ऑफर असून, तिचा एकूण आकार १,५५३ कोटी इतका आहे.

या ऑफरमध्ये २ रुपये दर्शनी मूल्याच्या [] नव्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीतून १,४२८ कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. तसेच, १२५ कोटींचे इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहेत. ऑफर फॉर सेल अंतर्गत सतीशकुमार टी हे ७५ कोटींचे, तर अनिता एस या ५० कोटींचे दोन रुपये दर्शनी मूल्याचे [] इक्विटी शेअर्स विकणार आहेत.कर्मचारी आरक्षण भागातून अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर १३ रुपये इतकी सवलत देण्यात येणार आहे.

बुक रनिंग लीड मॅनेजर्स यांच्या सल्ल्याने कंपनीने, लागू असलेल्या कायद्यांनुसार, आयपीओपूर्व समभाग वाटप (प्री-आयपीओ प्लेसमेंट) केले आहे. यामध्ये, २ रुपये दर्शनी मूल्याचे ५,४३,७८९ इक्विटी शेअर्स प्रति शेअर १३९.७६ या किमतीने (यामध्ये १३७.७६ प्रीमियमचा समावेश) वाटप करण्यात आले. तसेच, २ रुपये दर्शनी मूल्याचे २,५०,००,००० इतके, अनिवार्यपणे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित होणारे प्राधान्याचे समभाग (सीसीपीएस) हे प्रति समभाग १३९.७६ रुपये या किमतीने वितरीत करण्यात आले. या दोन्ही वाटपांचा एकूण आकार ३५७ कोटी रुपये इतका आहे.

या ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’अंतर्गत ऑफर करण्यात येणारे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड या शेअर बाजारांवर सूचीबद्ध करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) हा नियुक्त (डिझिग्नेटेड) शेअर बाजार असेल.

ही ऑफर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्स, १९५७ मधील नियम १९(२)(ब) आणि सेबी आयसीडीआर नियमावलीतील नियम ३१ यांच्या तरतुदींनुसार अमलात आणली जात आहे. तसेच ही ऑफर सेबी आयसीडीआर नियमावलीतील नियम ६(१) नुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेनुसार, निव्वळ ऑफरपैकी जास्तीत जास्त ५० टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्यूआयबी) प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. कंपनीला बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम्स) यांच्या सल्ल्याने, क्यूआयबी राखीव भागापैकी ६० टक्क्यांपर्यंत हिस्सा अँकर गुंतवणूकदारांना त्यांच्या निर्णयानुसार वाटप करण्याचा अधिकार असेल. अँकर गुंतवणूकदारांसाठीच्या राखीव भागापैकी ४० टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. यामध्ये ३३.३३ टक्के हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी आणि ६.६७ टक्के हिस्सा आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीव असेल. मात्र, त्याकरीता सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार, देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर गुंतवणूकदारांच्या वाटप किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे.

अँकर गुंतवणूकदारांसाठीच्या राखीव भागात पूर्ण प्रतिसाद न मिळाल्यास किंवा त्या भागातील काही शेअर्सचे वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबींसाठी राखीव असलेल्या इतर भागात समाविष्ट करण्यात येतील. यालाच निव्वळ क्यूआयबी भाग असे म्हटले जाते. याशिवाय, निव्वळ क्यूआयबी भागापैकी ५ टक्के हिस्सा केवळ म्युच्युअल फंडांसाठी प्रमाणानुसार वाटपासाठी राखीव असेल. उर्वरित निव्वळ क्यूआयबी भाग (अँकर गुंतवणूकदार वगळून) सर्व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (क्यूआयबी) (त्यामध्ये म्युच्युअल फंडांचाही समावेश) प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे. मात्र, म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी निव्वळ क्यूआयबी भागाच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंडांसाठी राखीव असलेले उर्वरित शेअर्स इतर क्यूआयबींना प्रमाणानुसार वाटप करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.

याशिवाय, निव्वळ ऑफरपैकी किमान १५ टक्के हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एनआयबी) राखीव असेल. त्यापैकी २ लाख ते १० लाख रुपये या मर्यादेत बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक-तृतीयांश हिस्सा राखीव असेल. तर १० लाख रुपयांपेक्षा जास्त बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी दोन-तृतीयांश हिस्सा राखीव असेल. तसेच, निव्वळ ऑफरपैकी किमान ३५ टक्के हिस्सा किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (आरआयबी) राखीव असेल. यासाठी त्यांनी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या वैध बोली सादर करणे आवश्यक आहे. अँकर गुंतवणूकदार वगळता सर्व अर्जदारांना या ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (एएसबीए) प्रक्रियेचा वापर करणे बंधनकारक आहे. यासाठी त्यांना आपल्या एएसबीए खात्याचा तपशील द्यावा लागेल. यूपीआयद्वारे अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आपला यूपीआय आयडी देणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँका (एससीएसबी) किंवा प्रायोजक बँकांकडून (स्पॉन्सर बँक), लागू असल्यास, त्यांच्या खात्यात तात्पुरती रोखून ठेवली जाईल.

जेएम फायनान्शियल लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वाश्रमीची आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड) हे या समभाग विक्रीचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!