IPO AND MARKET NEWS

स्वरा बेबी प्रॉडक्ट्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री  बुधवार, 02 डिसेंबर 2026 रोजी खुली होणार

कंपनीच्या प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 105 रु. ते प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 111 रु. असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 27/11/2026 (8850212023) 📞

  • स्वरा बेबी प्रॉडक्ट्स लिमिटेड (“कंपनी”) च्या प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 105 रु. ते प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 111 रु. (“इक्विटी शेअर्स”) असा किंमतपट्टा निश्चित 
  • प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली साठीचा दिनांक मंगळवार, 01 डिसेंबर 2026 आहे. 
  • बोली/ऑफर बुधवार, 02 डिसेंबर 2026 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 04 डिसेंबर 2026 रोजी बंद होईल. 
  • बोली प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या किमान 135 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 135 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल 
  • रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस लिंक:

 https://www.swarababy.com/wp-content/uploads/2026/11/Project-Dream-Red-Herring-Prospectus-Filing-Version.pdf

 

राष्ट्रीय [RMN] : स्वरा बेबी प्रॉडक्ट्स लिमिटेडने (‘कंपनी’) आपल्या प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) बुधवार, 02 डिसेंबर 2026 रोजी खुली करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रमुख गुंतवणूकदारांसाठी बोली सादर करण्याचा दिनांक  ही बोली/ऑफर खुली होण्याच्या आधीचा कामकाजाचा दिवस म्हणजेच मंगळवार, 01 डिसेंबर 2026 आहे. बोली/ऑफर बंद होण्याचा दिनांक शुक्रवार, 04 डिसेंबर 2026 आहे. बोली प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या किमान 135 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या 135 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

स्वरा बेबी प्रॉडक्ट्स लिमिटेड फोटो २ : (डावीकडून उजवीकडे) श्री. आलोक बिर्ला (प्रवर्तक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, स्वरा बेबी प्रॉडक्ट्स लिमिटेड) आणि श्री. उदित बिर्ला (प्रवर्तक, स्वरा बेबी प्रॉडक्ट्स लिमिटेड) मुंबई येथे आयोजित स्वरा बेबी प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या आयपीओ पत्रकार परिषदेदरम्यान.

या ऑफरमध्ये प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा समावेश असलेले एकूण 5000.00 दशलक्ष रु. (500 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यूचे वितरण (“फ्रेश इश्यू”) आणि काही विद्यमान  भागधारकांकडून प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सची एकूण 3000.00 दशलक्ष रु. (300 कोटी रु.) पर्यंतची विक्री ऑफर (“ऑफर फॉर सेल”) यांचा समावेश आहे. यामध्ये ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेडकडून प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या एकूण 1500 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची आणि अनाद्या बॉन मर्चारी एलएलपीकडून प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या एकूण 1500 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्री समाविष्ट आहे. या दोन्ही भागधारकांना (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) असे संबोधले आहे. फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल या दोन्हींचा एकत्रितपणे “ऑफर” असा उल्लेख करण्यात आला आहे.

 

स्वरा बेबी प्रॉडक्ट्स लिमिटेड फोटो ३: श्री. आलोक बिर्ला (प्रवर्तक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, स्वरा बेबी प्रॉडक्ट्स लिमिटेड).

ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 50% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी.  परंतु त्यासाठी  देशांतर्गत म्युच्युअल फंड, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड यांच्याकडून अँकर गुंतवणूकदारांना ज्या किमतीवर शेअर्सचे वाटप केले जाते, त्या किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा अधिक किमतीवर वैध बोली प्राप्त व्हायला हवी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”). प्रमुख गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या हिस्स्याचे पूर्ण सदस्यत्व न झाल्यास किंवा त्यातील शेअर्सचे वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स QIB साठी राखीव असलेल्या हिस्स्यात (प्रमुख गुंतवणूकदारांसाठी राखीव हिस्सा वगळून) समाविष्ट केले जातील (“Net QIB Portion”).

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या उर्वरित QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल.

पुढे, नेट ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Investors” किंवा “NIIs”) उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग 200,000  रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. मात्र त्यांच्याकडून ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे. 

 

सेबीच्या आयसीडीआर नियमांनुसार, रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना RIIs  (“Retail Category”) ऑफरच्या किमान 35% हिस्सा वाटपासाठी उपलब्ध असेल. मात्र त्यांच्याकडून ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, कर्मचारी आरक्षित हिस्स्यांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना, त्यांच्याकडून ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा अधिक किमतीवर वैध बोली प्राप्त होण्याच्या अधीन राहून, इक्विटी शेअर्सचे प्रमाणानुसार वाटप करण्यात येईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (except Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. 

इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी एनएसई हे निर्धारित स्टॉक एक्स्चेंज असेल. जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि अव्हेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!