एअरप्रो टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेडचा आयपीओ शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी खुला होणार आहे .
या इश्यूमध्ये प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे एकूण ३६,००,००० इक्विटी शेअर्सपर्यंत समावेश असून, प्रति शेअर ९९ रुपये इश्यू प्राईस निश्चित करण्यात आली आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 26/11/2026 (8850212023) 📞
- एकूण इश्यू साइज: प्रत्येकी ₹१० दर्शनी मूल्याचे ३६,००,००० इक्विटी शेअर्सपर्यंत
- आयपीओचा आकार: ₹३५.६४ कोटी
- इश्यू प्राईस: ₹९९ प्रति शेअर
- लॉट साइज: १,२०० इक्विटी शेअर्स (किमान अर्जासाठी २ लॉट म्हणजेच २,४०० इक्विटी शेअर्स)

. श्री. निशांत तोडी होरायझन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड
. श्री. मयूर बांका होरायझन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड
. श्री. दीपक जैन एअरप्रो टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड
. श्री. पंकज भन्साळी एअरप्रो टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड
. श्री. मनोज जैन एअरप्रो टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड
मुंबई [NHI24] – एअरप्रो टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेड, वायर्ड आणि वायरलेस नेटवर्किंग उत्पादने व सोल्यूशन्स पुरवणारी तंत्रज्ञान-आधारित कंपनी असलेली एअरप्रो टेक्नोलॉजी इंडियालिमिटेड आपला प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी खुला करणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीचे ३५.६४ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट असून, कंपनीचे शेअर्स एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. यामध्ये २९,२०,००० इक्विटी शेअर्सपर्यंतचा फ्रेश इश्यू आणि विक्री करणाऱ्या भागधारकांकडून ६,८०,००० इक्विटी शेअर्सपर्यंतचा ऑफर फॉर सेल (ओएफएस) यांचा समावेश आहे.
इक्विटी शेअर्सचे वाटप:
- नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII)– किमान १७,०८,८०० इक्विटी शेअर्स
- वैयक्तिक गुंतवणूकदार – किमान १७,११,२०० इक्विटी शेअर्स
- मार्केट मेकर – १,८०,००० इक्विटी शेअर्स
आयपीओमधून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा वापर उत्पादन सुविधेसाठी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी भांडवली खर्चाची पूर्तता, जयपूर येथे कारखान्यासाठी जमीन अधिग्रहणाच्या उर्वरित रकमेचे पेमेंट, जयपूर येथील कारखान्याच्या इमारतीच्या बांधकामासाठी भांडवली खर्च, कंपनीच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी केला जाणार आहे. हा आयपीओ शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी खुला होणार असून, मंगळवार, १ डिसेंबर २०२६ रोजी बंद होणार आहे. या इश्यूचे लीड मॅनेजर होरिझॉन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड असून, रजिस्ट्रार म्हणून एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड काम पाहणार आहे.
एअरप्रो टेक्नोलॉजी इंडियालिमिटेडचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपक जैन यांनी सांगितले की, “आजच्या वाढत्या कनेक्टिव्हिटीच्या जगात विश्वासार्ह नेटवर्किंग सोल्यूशन्स ही केवळ निवड राहिलेली नसून, ती एक गरज बनली आहे. एअरप्रो टेक्नोलॉजी इंडियालिमिटेडमध्ये आम्ही या बदलत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. आमचा आगामी आयपीओ हा आमच्या क्षमता अधिक मजबूत करण्याच्या आणि विकासाच्या नव्या संधी विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. गेल्या काही वर्षांत, ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासार्ह, विस्तारक्षम आणि किफायतशीर नेटवर्किंग तसेच वायरलेस कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स पुरवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून आम्ही आमचा व्यवसाय उभारला आहे.
या आयपीओमुळे आम्हाला उत्पादन पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे, कार्यान्वयन क्षमता वाढवणे आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करणे शक्य होणार आहे. या भांडवली गुंतवणुकीमुळे भविष्यातील विकासासाठी अधिक भक्कम पाया तयार होईल आणि नेटवर्किंग सोल्यूशन्स उद्योगातील आमचे स्थान अधिक मजबूत होईल, असा आम्हाला विश्वास आहे. या नव्या अध्यायाची सुरुवात करताना, नावीन्य, गुणवत्ता, ग्राहकांचे समाधान आणि शाश्वत व्यावसायिक विकासाद्वारे दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या या प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या ग्राहकांचे, कर्मचाऱ्यांचे, भागीदारांचे आणि सर्व हितचिंतकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”
होरिझॉन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड श्री. मयूर बंका आणि उपाध्यक्ष श्री. राहुल बजाज यांनी सांगितले की,“एअरप्रो टेक्नोलॉजी इंडियालिमिटेडने नेटवर्किंग आणि वायरलेस कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले असून, उद्योग आणि संस्थांच्या बदलत्या कनेक्टिव्हिटीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी कार्यरत आहे. नेटवर्किंग उत्पादनांमधील कंपनीचे कौशल्य, उत्पादन क्षमता मजबूत करण्यावर आणि कार्यान्वयन पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर असलेल्या लक्ष केंद्रित दृष्टिकोनासह, कंपनीच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी भक्कम पाया उपलब्ध करून देते.
प्रस्तावित आयपीओ हा कंपनीच्या विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निधीचा वापर यंत्रसामग्रीसाठी भांडवली खर्च, जमीन अधिग्रहण, कारखाना सुविधेचे बांधकाम तसेच खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे. या प्रस्तावित भांडवली गुंतवणुकीमुळे कंपनीला आपली कार्यान्वयन क्षमता वाढवण्यास आणि दीर्घकालीन व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होईल, असा आम्हाला विश्वास आहे. एअरप्रो टेक्नोलॉजी इंडियालिमिटेडच्या सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी बनण्याच्या प्रवासात सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे.”
एअरप्रो टेक्नोलॉजी इंडियालिमिटेड विषयी:
२०१४ मध्ये स्थापन झालेली एअरप्रो टेक्नोलॉजी इंडियालिमिटेड ही तंत्रज्ञान-आधारित कंपनी असून, वायर्ड आणि वायरलेस नेटवर्किंग उत्पादने व सोल्यूशन्सची रचना, असेंब्ली, वितरण आणि सेवा पुरवण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. कंपनी उत्पादनांची रचना, फर्मवेअर कस्टमायझेशन, क्लाउड-आधारित नेटवर्क व्यवस्थापन, इन-हाऊस असेंब्ली आणि व्हाइट-लेबल नेटवर्किंग सोल्यूशन्स अशा विविध सेवांचा समावेश असलेल्या हायब्रीड बिझनेस मॉडेलद्वारे ब्रँड ओनर म्हणून कार्य करते. राजस्थानमधील जयपूर येथे मुख्यालय असलेली ही कंपनी मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील सुविधेत ॲक्सेस पॉइंट उपकरणांची असेंब्ली आणि चाचणी करते. कंपनीचे प्रवर्तक दीपक जैन, पंकज भन्साळी, रूपाली भन्साळी आणि राजेश हसमुख वखारिया आहेत.
कंपनी वायरलेस ॲक्सेस पॉइंट्स, डब्ल्यूएलएएन कंट्रोलर्स, इथरनेट स्विचेस, गेटवेज, आउटडोअर वायरलेस सोल्यूशन्स, 4G/5G कस्टमर प्रिमायसेस इक्विपमेंट (CPE) आणि इंडस्ट्रियल PoE स्विचेस यांसारखी उत्पादने पुरवते. यासोबतच कंपनीचे ‘एअरप्रोक्लाउड’ हे क्लाउड-आधारित नेटवर्क मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मही उपलब्ध आहे. कंपनी ४७ डीलर्स आणि वितरकांच्या (सप्टेंबर २०२६ पर्यंत) तसेच ऑनलाइन चॅनेल पार्टनर्सच्या नेटवर्कद्वारे कॉर्पोरेट कंपन्या, शैक्षणिक संस्था, सरकारी संघटना, आरोग्यसेवा सुविधा, हॉस्पिटॅलिटी व्यवसाय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि सिस्टम इंटिग्रेटर्सना सेवा पुरवते. कंपनीच्या असेंब्ली लाईनची वार्षिक स्थापित उत्पादन क्षमता २४,००० युनिट्स (मार्च २०२६ पर्यंत) असून, कंपनीकडे ISO 9001:2015 आणि ISO 14001:2015 प्रमाणपत्रे आहेत.
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीने ३,९०९.३७ लाख रुपयांचा महसूल, ९४०.६४ लाख रुपयांचा EBITDA आणि ६०८.४५ लाख रुपयांचा PAT नोंदवला. ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत कंपनीने १,९३१.८३ लाख रुपयांचा महसूल, ४८५.८ लाख रुपयांचा EBITDA आणि ३१८.४५ लाख रुपयांचा PAT नोंदवला.




