वेक्ट्रास एनप्रोकोन’चा आयपीओ ३० ऑक्टोबरला खुला, तर ३ नोव्हेंबरला बंद होणार
कंपनी इक्विटी शेअर ९९ ते १०५ रुपये अशी किंमत श्रेणी निश्चित केली आहे. इश्यूचा एकूण आकार ५३.०५ कोटी रुपये असून, लॉट साईज १,२०० इक्विटी शेअर्सचा असेल. हे इक्विटी शेअर्स बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत.

POSTED BY : ANAGHA SAKPAL DATED ON 27/10/2026 [9004379946]
अहमदाबाद [NHI24] : तेल आणि वायू उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ‘मिडस्ट्रीम’ आणि ‘डाउनस्ट्रीम’ पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एकात्मिक उपाय पुरवणारी, गुजरातस्थित ‘वेक्ट्रास एनप्रोकोन लि.ने आपल्या प्रस्तावित ‘इनिशियल पब्लिक ऑफरिंग’ (आयपीओ) साठी ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ दाखल केले आहे. या आयपीओ अंतर्गत प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ५०,५२,००० इक्विटी शेअर्स जारी केले जाणार असून शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी हा इश्यू खुला होईल तर मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६ रोजी बंद होणार आहे.
या प्रस्तावित आयपीओमध्ये ४०,५६,००० नवीन इक्विटी शेअर्सची विक्री आणि ९,९६,००० इक्विटी शेअर्सची ‘ऑफर फॉर सेल’ यांचा समावेश आहे.

‘वेक्ट्रास एनप्रोकोन लि.’ बद्दल २०२१ मध्ये स्थापन झालेली ‘वेक्ट्रास एनप्रोकोन लि.’ ही अहमदाबादस्थित कंपनी असून, ती तेल आणि वायू उद्योगासाठी आवश्यक असलेल्या ‘मिडस्ट्रीम’ आणि ‘डाउनस्ट्रीम’ पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एकात्मिक सेवा पुरवते. कंपनी पाइपलाइन नेटवर्क, एकत्रित तेल आणि वायू स्टेशन कामे, तसेच संबंधित पायाभूत सुविधांच्या डिझाइन, अभियांत्रिकी, खरेदी बांधकाम, चाचणी आणि कार्यान्विती यांसारख्या सेवा प्रदान करते. कंपनीच्या मुख्य सेवांमध्ये एकत्रित स्टेशन कामे, मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम पाइपलाइन प्रकल्प आणि इतर संबंधित पायाभूत सुविधांचा समावेश आहे. कंपनीने क्रॉस-कंट्री पाइपलाइन्स, ‘स्पर’ पाइपलाइन्स, सिटी गॅस पायाभूत सुविधा आणि तत्संबंधीत नागरी व यांत्रिक कामे पूर्ण करण्यात कौशल्य विकसित केले आहे. कंपनी देशाच्या विविध राज्यांमधील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील ग्राहकांसाठी काम करते. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत, कंपनीकडे ३४ प्रकल्पांचे एकूण १८,३२७.८८ लाख रुपयांचे ‘अनएक्झिक्युटेड ऑर्डर बुक’ (पूर्ण न झालेले काम) होते. यामध्ये एकत्रित तेल आणि वायू स्टेशन कामांचे ११,६२९.०३ लाख रुपये, पाइपलाइन कामांचे ५,९४५.७२ लाख रुपये आणि इतर संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांचे ७५३.१३ लाख रुपयांचे मूल्य समाविष्ट आहे. कंपनीचा प्रकल्प पोर्टफोलिओ गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, बिहार आणि ओडिशासह अनेक राज्यांमध्ये पसरलेला आहे, जे गुजरातच्या पलीकडे झालेल्या त्यांच्या भौगोलिक विस्ताराचे निदर्शक आहे.
दरम्यान, कंपनीने घेतलेली काही थकीत कर्जे पूर्णपणे किंवा अंशतः परत करणे/पूर्व-परतफेड करणे,
कंपनीच्या दीर्घकालीन खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करणे, सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देश पूर्ण करणे हा या इश्यूचा उद्देश आहे. या इश्यूचा अँकर पोर्शन सुरू होण्याची/संपण्याची तारीख गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२६ आहे.
इश्यू-पूर्व इक्विटी शेअर्स १,५०,००,००० इक्विटी शेअर्स
इश्यू-पश्चात इक्विटी शेअर्स १,९०,५६,००० इक्विटी शेअर्स
या ऑफरचे ‘बुक रनिंग लीड मॅनेजर ”बीलाईन कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रा. लि.’हे तर ‘एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रा. लि.’ हे या ऑफरचे ‘रजिस्ट्रार’ आहेत.




