IPO AND MARKET NEWS
Trending

पारस हेल्थकेअर लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी खुला होणार

प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ६६० रुपये ते ६९३ रुपये निश्चित करण्यात आला आहे

MRUNALI SAKPAL DATED ON  : 15/10/2026 (8850212023) 📞
  • बोली/ऑफर बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी खुली होईल आणि शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बंद होईल (“बोलीच्या तारखा”).
  • अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली/ऑफरचा कालावधी सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी असेल.
  • किमान २१ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २१ इक्विटी शेअर्सच्या पटीत शेअर्ससाठी बोली लावता येईल (“बोलींची संख्या”)
  • आरएचपी लिंक: https://www.jmfl.com/Common/getFile/6104

Mumbai (NHI24) : पारस हेल्थकेअर लिमिटेड (“कंपनी”) आपल्या इक्विटी शेअर्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरच्या (“ऑफर”) संदर्भातील बोली/ऑफर बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी खुली करणार आहे. किमान २१ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २१ इक्विटी शेअर्सच्या पटीत शेअर्ससाठी बोली लावली जाऊ शकते. (“किमान बिड लॉट”).

(डावीकडून उजवीकडे)
योगेश हेडे – कार्यकारी संचालक, जेएम फायनान्शियल लिमिटेड.
दिलीप बिदानी – समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी, पारस हेल्थकेअर लिमिटेड.
डॉ. धर्मिंदर कुमार नागर – व्यवस्थापकीय संचालक, पारस हेल्थकेअर लिमिटेड.
सायंतन भट्टाचार्य – सहयोगी, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड.
प्रीती सहाय – आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण क्षेत्राच्या संचालक, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड.

अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ असेल. बोली/ऑफर बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी खुली होईल. या ऑफरमध्ये ५०० कोटी रुपयांपर्यंत ताज्या इक्विटी शेअर्सचा (फ्रेश इश्यू) समावेश असून सेलिंग शेअरहोल्डरद्वारे ९५० कोटी रुपयांपर्यंत शेअर्सची विक्री (ऑफर फॉर सेल) केली जाणार आहे. या ऑफरचा एकूण आकार १,४५० कोटी रुपयांपर्यंत आहे. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य १ रुपया आहे.

(डावीकडून उजवीकडे)
दिलीप बिदानी – समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी, पारस हेल्थकेअर लिमिटेड.
डॉ. धर्मिंदर कुमार नागर – व्यवस्थापकीय संचालक, पारस हेल्थकेअर लिमिटेड.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या माध्यमातून ऑफर केले जाणारे १ रुपया दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”, आणि बीएसईसह एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंजेस”) या मान्यताप्राप्त शेअर बाजारांवर सूचिबद्ध (लिस्ट) करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील कारणांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते:

कंपनीने घेतलेल्या विशिष्ट थकीत कर्जांची पूर्ण किंवा अंशतः मुदतपूर्व परतफेड किंवा वेळेवर परतफेड करणे; पूर्ण मालकीची उपकंपनी प्लस मेडिकेअर हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड (“पीएमएचपीएल”) (जी श्रीनगरमधील हॉस्पिटलचे संचालनही करते) मधील कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी त्या उपकंपनीमध्ये गुंतवणूक करणे; आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापर जेएम फायनान्शियल लिमिटेड, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड हे या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

ही ऑफर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रूल्स, १९५७ च्या सुधारित नियम १९(२)(ब) (“एससीआरआर”) तसेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१८ च्या सुधारित नियम ३१ (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) नुसार आणली जात आहे. सेबी आयसीडीआर नियमावलीतील नियम ६(२) च्या अनुपालनानुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे ही ऑफर दिली जात आहे. या अंतर्गत, ऑफरमधील किमान ७५ टक्‍के हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी” आणि असा भाग, “क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणशीर वाटपासाठी उपलब्ध असेल; पण कंपनी बीआरएलएम्सच्या सल्ल्याने सेबी आयसीडीआर नियमांनुसार क्यूआयबी पोर्शनमधील ६० टक्क्यांपर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना स्वअधिकारानुसार वाटप करू शकते (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). या अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमधील ४० टक्‍के भाग खालीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) ३३.३३ टक्‍के देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी; आणि (ii) ६.६७ टक्‍के जीवन विमा कंपन्या व पेन्शन फंडांसाठी उपलब्ध असेल, बशर्ते देशांतर्गत म्युच्युअल फंड तसेच जीवन विमा कंपन्या व पेन्शन फंडांकडून सेबी आयसीडीआर नियमांनुसार अँकर गुंतवणूकदार वाटप किमतीवर (“अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राईस”) किंवा त्याहून अधिक किमतीवर वैध बोली प्राप्त व्हाव्यात. जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीव असलेल्या अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमधील ६.६७ टक्‍के भागाची कमी वर्गणी (अंडर-सबस्क्रिप्शन) राहिल्यास, तो देशांतर्गत म्युच्युअल फंडांना वाटप केला जाऊ शकतो. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये कमी वर्गणी नोंदवली गेल्यास किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये (“नेट क्यूआयबी पोर्शन”) जोडले जातील.

याव्यतिरिक्त, नेट क्यूआयबी पोर्शनमधील ५ टक्‍के भाग केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणशीर वाटपासाठी उपलब्ध असेल आणि नेट क्यूआयबी पोर्शनमधील उर्वरित भाग म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबी बोलीदारांना प्रमाणशीर वाटपासाठी उपलब्ध असेल, बशर्ते ऑफर किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर वैध बोली प्राप्त झाल्या पाहिजे. ऑफरमधील किमान ७५ टक्‍के भागाचे वाटप जर क्यूआयबींना करता आले नाही, तर अर्जाची संपूर्ण रक्कम तात्काळ परत केली जाईल. पण, म्युच्युअल फंडांची एकत्रित मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यास, म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबींना प्रमाणशीर वाटप करण्यासाठी उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील.

तसेच, सेबी आयसीडीआर नियमांनुसार ऑफरमधील जास्तीत-जास्त १५ टक्‍के भाग बिगर-संस्थात्मक बोलीदारांना (“एनआयबी”) वाटपासाठी उपलब्ध असेल, ज्यामध्ये (a) एक तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत अर्जाचा आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल; आणि (b) दोन तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त अर्जाचा आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल, बशर्ते यापैकी कोणत्याही उप-श्रेणीतील न विकला गेलेला (अनसबस्क्राईब्ड) भाग ऑफर किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर वैध बोली प्राप्त होण्याच्या अधीन राहून बिगर-संस्थात्मक बोलीदारांच्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना वाटप केला जाऊ शकतो; आणि सेबी आयसीडीआर नियमांनुसार ऑफरमधील जास्तीत-जास्त १० टक्‍के भाग किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना (“आरआयबी”) वाटपासाठी उपलब्ध असेल, बशर्ते त्यांच्याकडून ऑफर किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर वैध बोली प्राप्त व्हाव्यात. सर्व बोलीदारांसाठी (अँकर गुंतवणूकदार वगळता) अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेचा वापर करणे अनिवार्य आहे; यासाठी त्यांनी आपापल्या एएसबीए खात्यांचे तपशील देणे आणि युपीआय मेकॅनिझम वापरणाऱ्या युपीआय बोलीदारांच्या बाबतीत युपीआय आयडी नमूद करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत, या ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी संबंधित बोलीची रक्कम एससीएसबी किंवा युपीआय मेकॅनिझम अंतर्गत लागू असल्यास प्रायोजक बँकांद्वारे ब्लॉक केली जाईल. अँकर गुंतवणूकदारांना एएसबीए प्रक्रियेद्वारे या ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!