IPO AND MARKET NEWS

एसव्हेक्टर लिमिटेडचा इक्विटी शेअर्सचा इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) २५ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होणार

दर्शनी मूल्य प्रत्येकी १ रुपया असलेल्या इक्विटी शेअरसाठी प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ३० रुपये ते ३२ रुपये निश्चित करण्यात आला आहे ("इक्विटी शेअर").

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON  : 22/09/2026 (8850212023) 📞

. ही ऑफर बोली लावण्यासाठी शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी खुली होईल आणि मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल.

.अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होऊन त्याच दिवशी बंद होईल.

.किमान ४६८ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ४६८ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावली जाऊ शकते.

.दर्शन मूल्य प्रत्येकी १ रुपया असलेल्या इक्विटशेअरसाठी प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ३० रुपये ३रुपये निश्चित करण्यात आला आहे (“इक्विटी शेअर.आरएचपी – https://www.iiflcapital.com/institutionalequities/Upload/InvestmentBanking/Prospects/Acevector_-_RHP.pdf

राष्ट्रीय, सप्ट: एसव्हेक्टर लिमिटेड (“एसव्हेक्टर” किंवा “कंपनी“) ने जाहीर केले आहे की, कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या इनिशिएल पब्लिक ऑफरिंगच्या (“ऑफर“) संदर्भातील बोली/ऑफर खुली होण्याची तारीख शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ असणार आहे. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ असेल.

या ऑफरमध्ये कंपनीकडून एकूण २,८७०.०० दशलक्ष रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या नवीन इश्यूचा (“फ्रेश इश्यू“) आणि कंपनीच्या काही विद्यमान भागधारकांद्वारे (“विक्री करणारे भागधारक” / सेलिंग शेअरहोल्डर्स) ४१,५६२,५०० पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरचा (“ऑफर फॉर सेल“) समावेश आहे.

कुणाल बहल — प्रवर्तक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, Acevector Limited
अचिंत सेतिया — मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), Snapdeal
रोहित कुमार बन्सल — प्रवर्तक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, Acevector Limited
भरत वेणिशेट्टी — मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), Acevector Limited

कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ रकमेचा वापर पुढील बाबींसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते: (i) कंपनीच्या मार्केटप्लेस व्यवसायासाठी लागणाऱ्या मार्केटिंग आणि बिझनेस प्रमोशनच्या खर्चाच्या एका भागासाठी निधी पुरवणे, (ii) कंपनीच्या मार्केटप्लेस व्यवसायाच्या टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चरच्या खर्चासाठी निधी देणे, आणि (iii) संपादनांच्या (अॅक्विझिशन्स) माध्यमातून इनऑरगॅनिक वाढ आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी निधी पुरवणे (“ऑब्जेक्ट्स ऑफ द ऑफर“).

कुणाल बहल — प्रवर्तक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, Acevector Limited आणि अचिंत सेतिया — मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), Snapdeal

ऑफर फॉर सेलमध्ये पुढील इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा समावेश आहे: स्टारफिश आय प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर“) २७,६०७,०८२ पर्यंत इक्विटी शेअर्स; नेक्सस इंडिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स II द्वारे ७,३९१,११३ पर्यंत इक्विटी शेअर्स; एफआयएच बिझनेस ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (पूर्वी वंडरफुल स्टार प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) १,७४०,५२८ पर्यंत इक्विटी शेअर्स; नेक्सस अपॉर्च्युनिटी फंड लिमिटेडद्वारे ८३९,७१३ पर्यंत इक्विटी शेअर्स; नेक्सस व्हेंचर्स III लिमिटेडद्वारे ४६५,५९९ पर्यंत इक्विटी शेअर्स; रुपेन इन्व्हेस्टमेंट अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे २६९,१२० पर्यंत इक्विटी शेअर्स; सेंटॉरस ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे २६९,१२० पर्यंत इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे, “इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स”); केनेथ स्टुअर्ट ग्लास यांच्याद्वारे १,३२०,७९९ पर्यंत इक्विटी शेअर्स; जेसन अशोक कोठारी यांच्याद्वारे १,१११,६८० पर्यंत इक्विटी शेअर्स; लॉरेंट बर्नार्ड अमोय्याल यांच्याद्वारे २२४,७८६ पर्यंत इक्विटी शेअर्स; मिशा कोहली यांच्याद्वारे २१५,२८० पर्यंत इक्विटी शेअर्स; राधिका गुप्ता यांच्याद्वारे ५३,८४० पर्यंत इक्विटी शेअर्स; आणि नलिन लुईस मोनिझ यांच्याद्वारे ५३,८४० पर्यंत इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे, “इंडिव्हिज्युअल सेलिंग शेअरहोल्डर्स”).

अँकर इन्व्हेस्टर बिड/ऑफर कालावधी गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होऊन त्याच दिवशी बंद होईल. सबस्क्रिप्शनसाठी बिड/ऑफर कालावधी शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होईल आणि मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल. या ऑफरचा प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ३० रुपये ते ३२ रुपये निश्चित करण्यात आला आहे. किमान ४६८ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ४६८ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावली जाऊ शकते.

 

कुणाल बहल — प्रवर्तक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, Acevector Limited

आरएचपीद्वारे देऊ केल्या जाणाऱ्या इक्विटी शेअर्सची बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई“) वर नोंदणी (लिस्टिंग) करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरच्या उद्दिष्टांसाठी, एनएसई डेझिग्नेटेड स्टॉक एक्सचेंज आहे.

ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ६(२) चे पालन करून आणि एससीआरआरच्या नियम १९(२)(ब) सहवाचता सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ३१ नुसार आणली जात आहे; ज्यामध्ये ऑफरच्या किमान ७५ टक्‍के भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“क्यूआयबी“) प्रमाणशीर तत्त्वावर (“क्यूआयबी पोर्शन“) वाटप केला जाईल, या अटीवर की, आमची कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार क्यूआयबी पोर्शनच्या ६० टक्क्यांपर्यंत भाग स्वेच्छानिर्णयानुसार अँकर गुंतवणूकदारांना वाटप करू शकते (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन“). अँकर गुंतवणूकदार पोर्शनमधील ४० टक्‍के भाग पुढील पद्धतीने वाटपासाठी राखीव ठेवला जाईल: (i) ३३.३३ टक्‍के देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी, आणि (ii) ६.६७ टक्‍के आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी. सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार, अँकर गुंतवणूकदार वाटप किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झाल्यास, आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीव असलेल्या पोर्शनमध्ये कमी सबस्क्रिप्शन (अंडर-सबस्क्रिप्शन) झाल्यास, हे वाटप देशांतर्गत म्युच्युअल फंडांना केले जाईल. अँकर गुंतवणूकदार पोर्शनमध्ये कमी सबस्क्रिप्शन झाल्यास किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील (“नेट क्यूआयबी पोर्शन“).तसेच, ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झाल्यास, केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणशीर तत्त्वावर वाटपासाठी निव्वळ क्यूआयबी पोर्शनचा ५ टक्‍के भाग उपलब्ध असेल, आणि उर्वरित निव्वळ क्यूआयबी पोर्शन, ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झाल्यास म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबींना प्रमाणशीर तत्त्वावर वाटपासाठी उपलब्ध असेल. जर ऑफरच्या किमान ७५ टक्‍के वाटप क्यूआयबींना करता आले नाही, तर संपूर्ण बोलीची रक्कम (बिड अमाऊंट) तात्काळ परत केली जाईल. मात्र, जर म्युच्युअल फंडांची एकूण मागणी क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स सर्व क्यूआयबींना प्रमाणशीर वाटप करण्यासाठी उर्वरित निव्वळ क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील.

तसेच, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार, ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झाल्यास, ऑफरचा कमाल १५ टक्‍के भाग बिगर-संस्थात्मक बोलीदारांकरिता वाटपासाठी उपलब्ध असेल आणि ऑफरचा कमाल १० टक्‍के भाग किरकोळ वैयक्तिक बोलीदारांसाठी (“आरआयबी“) वाटपासाठी उपलब्ध असेल. बिगर-संस्थात्मक पोर्शनचा एक तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंतच्या बोली आकाराच्या बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध असेल, तर बिगर-संस्थात्मक पोर्शनचा दोन तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त बोली आकाराच्या बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी वाटपासाठी उपलब्ध असेल; या अटीवर की, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झाल्यास, बिगर-संस्थात्मक पोर्शनच्या या दोन उप-श्रेण्यांपैकी कोणत्याही एका श्रेणीत कमी सबस्क्रिप्शन (अंडर-सबस्क्रिप्शन) झाल्यास तो हिस्सा दुसऱ्या उप-श्रेणीतील बिगर-संस्थात्मक बोलीदारांना वाटप केला जाऊ शकतो. सर्व संभाव्य बोलीदारांनी (अँकर गुंतवणूकदार वगळता) आपापल्या एएसबीए खात्यांचे तपशील आणि लागू असल्यास यूपीआय बोलीदारांच्या बाबतीत यूपीआय आयडी देऊन ‘अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट’ (“एएसबीए“) प्रक्रियेद्वारे या ऑफरमध्ये सहभागी होणे अनिवार्य आहे; ज्यानुसार त्यांची संबंधित बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकांद्वारे (“एससीएसबी“) किंवा परिस्थितीनुसार यूपीआय यंत्रणेअंतर्गत प्रायोजक बँकेद्वारे (स्पॉन्सर बँकांद्वारे) संबंधित बोलीच्या रकमेइतकी ब्लॉक केली जाईल. अँकर गुंतवणूकदारांना एएसबीए प्रक्रियेद्वारे या ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. सविस्तर माहितीसाठी आरएचपीच्या पान क्रमांक ५०९ पासून सुरू होणारी “ऑफर प्रोसिजर” पहा. 

हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या २१ सप्टेंबर २०२६ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे (“आरएचपी“) जारी केले जात आहेत, जे दक्षिण दिल्ली येथील कंपनी निबंधक, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली-I (“आरओसी“) कडे दाखल करण्यात आले आहे, तसेच या शेअर्सची बीएसई लिमिटेड (“बीएसई“) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई“, एकत्रितपणे “स्टॉक एक्सचेंजेस“) वर नोंदणी (लिस्टिंग) करण्याचा प्रस्ताव आहे.

आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीची आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड), सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सिस्टिमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड (“बीआरएलएम“) हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. येथे वापरलेल्या, पण व्याख्या न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड संज्ञांचे (विशिष्ट संज्ञांचे) अर्थ आरएचपीमध्ये दिल्याप्रमाणे असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!