ऑगमॉन्ट एंटरप्रायझेस लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग
(आयपीओ) शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी खुला होणार

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 18/08/2026 (8850212023)
-
ऑगमॉन्ट एंटरप्रायझेस लिमिटेडच्या (“कंपनी“) दर्शनी मूल्य ५ रुपये असणाऱ्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी प्राईस बँड ७५० रुपये ते ७८८ रुपये निश्चित करण्यात आला आहे
-
अँकर इन्व्हेस्टर बिडिंग तारीख – गुरुवार, २० ऑगस्ट २०२६
-
बिड / ऑफर ओपिनंग तारीख – शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६, आणि बिड / ऑफर क्लोजिंग तारीख – मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६
-
दर्शनी मूल्य ५ रुपये असलेल्या किमान १९ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १९ इक्विटी शेअर्सच्या पटीत बिड्स (बोली) लावल्या जाऊ शकतात.
-
रेड हॅरिंग प्रॉस्पेक्टस (“आरएचपी”) लिंक: https://www.augmont.com/assets/files/stakeholders/ipo%20disclosures/AUGMONT%20ENTERPRISES%20LIMITED%20RHP%20-%20Signed.pdf
राष्ट्रीय (RMN.COM) : ऑगमॉन्ट एंटरप्रायझेस लिमिटेड (“कंपनी“) शुक्रवारी, २१ ऑगस्ट २०२६ रोजी दर्शनी मूल्य ५ रूपये (“इक्विटी शेअर्स“) असलेल्या आपल्या इक्विटी शेअर्सचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (“आयपीओ/ऑफर“) खुला करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. अँकर इन्व्हेस्टर बिडिंग तारीख ही बिड/ऑफर ओपनिंग तारखेच्या आधीचा कामकाजाचा दिवस म्हणजेच गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ आहे. बिड/ऑफर क्लोजिंग तारीख मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ आहे.
ऑफरचा प्राईस बँड दर्शनी मूल्य ५ रुपये असणाऱ्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी ७५० रुपये ते ७८८ रुपये निश्चित करण्यात आला आहे. दर्शनी मूल्य ५ रुपये असणाऱ्या किमान १९ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ५ रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या १९ इक्विटी शेअर्सच्या पटीत अर्ज केले जाऊ शकतात. फ्लोअर प्राईस आणि कॅप प्राईस अनुक्रमे इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या १५०.०० पट आणि १५७.६० पट आहेत. कंपनीसाठी आर्थिक वर्ष २०२६ च्या बेसिक आणि डायल्यूटेड ईपीएसवर आधारित प्राईस टू अर्निग्स रेशिओ (पी/ई) प्राईस बँडच्या निचल्या स्तरावर (फ्लोअर प्राईस) १८.५४ पट आणि प्राईस बँडच्या वरच्या स्तरावर (कॅप प्राईस) १९.४८ पट आहे. मागील तीन आर्थिक वर्षांसाठी नेट वर्थवरील वेटेड एव्हरेज रिटर्न ५५.२५ टक्के आहे.

८२५ कोटी रूपयांच्या या ऑफरमध्ये दर्शनी मूल्य ५ रुपये असलेल्या इक्विटी शेअर्सचा ६२० कोटी रूपयांपर्यंतचा फ्रेश इश्यू आणि काही विद्यमान भागधारकांकडून २०५ कोटी रूपयांपर्यंतच्या दर्शनी मूल्य ५ रुपये असलेल्या इक्विटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे; ज्यामध्ये नमिता केतन कोठारी यांच्याद्वारे ६९.४ कोटी रूपयांपर्यंतचे दर्शनी मूल्य ५ रुपये असलेले इक्विटी शेअर्स, विवेक पृथ्वीराज कोठारी यांच्याद्वारे ६९.४ कोटी रूपयांपर्यंतचे दर्शनी मूल्य ५ रुपये असलेले इक्विटी शेअर्स आणि डिंपल मुकेश कोठारी यांच्याद्वारे ६६.२ कोटी रूपयांपर्यंतचे दर्शनी मूल्य ५ रुपये असलेले इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. या ऑफरमध्ये कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांच्या खरेदीसाठी ४ कोटी रूपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे आरक्षण देखील समाविष्ट आहे.
ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या नियम ३१ सह वाचल्या गेलेल्या एससीआरआरच्या नियम १९(२)(बी) अंतर्गत आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या नियम ६(१) चे पालन करून बुक बिल्डिंग प्रोसेसद्वारे केली जात आहे; ज्यामध्ये सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या नियम ३२(१) नुसार नेट ऑफरच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”, आणि असा भाग, “क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणात वाटपासाठी उपलब्ध नसेल. पण, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार आमची कंपनी, बुक रनिंग लीड मॅनेजर्सचा सल्ला घेऊन क्यूआयबी पोर्शनच्या ६० टक्क्यांपर्यंत भाग अँकर इन्व्हेस्टर्सना स्वविवेकाधिकारावर (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”) वाटप करू शकते. सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार अँकर इन्व्हेस्टर वाटप किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत घरगुती म्युच्युअल फंड, आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांकडून वैध बिड्स प्राप्त होण्याच्या अधीन राहून, अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी ३३.३३ टक्के भाग घरगुती म्युच्युअल फंडांसाठी आणि ६.६७ टक्के भाग आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीव असेल. आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीव असलेल्या शेअर्समध्ये कमी सबस्क्रिप्शन झाल्यास, ते शेअर्स घरगुती म्युच्युअल फंडांना वाटप केले जाऊ शकतात. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये कमी सबस्क्रिप्शन झाल्यास किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये (“नेट क्यूआयबी पोर्शन”) जोडले जातील.
तसेच, नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५ टक्के भाग केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणात वाटपासाठी उपलब्ध असेल, आणि उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शन हा ऑफर प्राईसवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत वैध बिड्स प्राप्त होण्याच्या अधीन राहून, म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबींना (अँकर इन्व्हेस्टर्स वगळून) प्रमाणात वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि, म्युच्युअल फंडांची एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबींना प्रमाणात वाटप करण्यासाठी उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील. याशिवाय, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार नेट ऑफरच्या किमान १५ टक्के भाग बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल, ज्यापैकी (अ) अशा पोर्शनपैकी एक-तृतीयंश भाग ०.२० दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त आणि १.०० दशलक्ष रुपयांपर्यंत अर्जाचा आकार असलेल्या बोलीदारांसाठी राखीव असेल; आणि (ब) अशा पोर्शनपैकी दोन-तृतीयंश भाग १.०० दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त अर्जाचा आकार असलेल्या बोलीदारांसाठी राखीव असेल; जर या उप-श्रेण्यांपैकी कोणत्याही एका श्रेणीतील सबस्क्राइब न झालेला भाग बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-श्रेणीतील बोलीदारांना वाटप केला जाऊ शकतो.
याशिवाय, ऑफर प्राईसवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत वैध बिड्स प्राप्त होण्याच्या अधीन राहून, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार नेट ऑफरच्या किमान ३५ टक्के भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“रिटेल पोर्शन“) वाटपासाठी उपलब्ध असेल. तसेच, एम्प्लॉई रिझर्व्हेशन पोर्शन अंतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून ऑफर प्राईसवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत वैध बिड्स प्राप्त होण्याच्या अधीन राहून, प्रमाणात इक्विटी शेअर्स वाटप केले जातील. अँकर इन्व्हेस्टर्स वगळता सर्व संभाव्य बोलीदारांना त्यांच्या संबंधित एएसबीए खात्याचे तपशील आणि यूपीआय बोलीदारांच्या बाबतीत लागू असल्यानुसार यूपीआय आयडी प्रदान करून अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये भाग घेणे बंधनकारक आहे; ज्यानुसार संबंधित बोली रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स किंवा यूपीआय यंत्रणेअंतर्गत स्पॉन्सर बँकेद्वारे (बँकांद्वारे) त्यांच्या संबंधित बोलीच्या रकमेपर्यंत ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेद्वारे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही.
हे इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”) आणि बीएसई लिमिटेड (“बीएसई”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी एनएसई डेझिग्नेटेड स्टॉक एक्सचेंज असेल.
नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड, इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अडव्हायझर्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत




