Business
Trending

‘इंडेल मनी’कडून ५०० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यासाठी अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) सार्वजनिक विक्री

'इंडेल मनी'कडून ५०० कोटी रुपयांपर्यंत निधी  अपरिवर्तनीय रोख्यांची एनसीडी सार्वजनिक विक्री

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 12/08/2026 📞  8850212023

• प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्य असलेली सुरक्षित, मानांकन प्राप्त, सूचीबद्ध आणि विमोचन करण्यायोग्य रोखे; रोख्यांचा कालावधी ४०० दिवस ते ७२ महिन्यांपर्यंत
• या सार्वजनिक विक्रीमध्ये २५,००० लाख रुपये (२५० कोटी रुपये) च्या ‘बेस इश्यू’चा समावेश; तसेच २५,००० लाख रुपयांपर्यंतची (२५० कोटी रुपये) अतिरिक्त मागणी स्वीकारण्याचा पर्यायही आहे; ज्यामुळे एकूण उभारणी ५०,००० लाख रुपयांपर्यंत (५०० कोटी रुपये) होऊ शकते
• ही विक्री मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होईल आणि सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी बंद होईल
• रोख्यांना इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च प्रा. लि.कडून ‘इंड ए-/स्टेबल’ (IND A-/Stable) मानांकन प्राप्त
• प्रति वर्ष १२.२५% पर्यंत प्रभावी परतावा
• रोख्यांच्या सर्व मालिकांसाठी किमान अर्ज रक्कम १०,००० रुपये असून, त्यानंतर १,००० रुपयांच्या पटीत गुंतवणूक असावी लागेल
• रोख्यांची मुंबई शेअर बाजारावर (बीएसई) सूचीबद्धता प्रस्तावित

मुंबई NHI24.COM: ठेवी न स्वीकारणारी मध्यम स्तर श्रेणीतील बँकेतर वित्तीय कंपनी (NBFC-ML) असलेल्या इंडेल मनी लिमिटेडने प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या सुरक्षित, मानांकन प्राप्त, सूचीबद्ध आणि विमोचन करण्यायोग्य अपरिवर्तनीय रोख्यांची (नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स – एनसीडी) सार्वजनिक विक्री जाहीर केली आहे.

ही विक्री मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होईल आणि सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी बंद होईल; तथापि, संबंधित मंजुरींच्या अधीन राहून ही विक्री मुदतीपूर्वी बंद करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.

गुंतवणूकदार या रोख्यांसाठी एक किंवा अधिक अर्ज करू शकतात; यासाठी सर्व मालिका मिळून किमान अर्ज रक्कम १०,००० रुपये असणे आवश्यक आहे आणि त्यानंतरची रक्कम १,००० रुपयांच्या पटीत असावी लागेल. या सार्वजनिक रोखे विक्रीद्वारे २५,००० लाख रुपये (२५० कोटी रुपये) इतक्या मूळ इश्यूचा समावेश आहे. तसेच, अतिरिक्त मागणी (ओव्हरसबस्क्रिप्शन) झाल्यास आणखी २५,००० लाख रुपयांपर्यंतची (२५० कोटी रुपये) रक्कम स्वीकारण्याचा ‘ग्रीन शू’ पर्यायही यात ठेवण्यात आला आहे. यामुळे रोखे विक्रीचा एकूण आकार ५०,००० लाख रुपयांपर्यंत (५०० कोटी रुपये) असू शकतो.

‘ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड’ आणि ‘आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड’ हे या रोखे विक्रीचे मर्चंट बँकर आहेत.

रोखे विक्रीमधून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा वापर पुढील कर्जवाटपासाठी, विद्यमान कर्जाची परतफेड किंवा पुनर्वित्तपुरवठा करण्यासाठी आणि/किंवा कर्ज सेवा (जसे की व्याजाची परतफेड किंवा विद्यमान कर्जाची मुद्दल व व्याजाची परतफेड/पूर्व-परतफेड) करण्यासाठी तसेच सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी केला जाईल. (कंपनी या निधीचा वापर मुदतपूर्व-परतफेडीच्या दंडासाठी (prepayment penalty) करणार नाही. निव्वळ रक्कम ही निर्धारीत उद्दिष्टांसाठी वापरली जाईल आणि उरलेली रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल; मात्र, हा वापर एकूण रकमेच्या २५% पेक्षा जास्त नसेल आणि तो सेबीच्या एनसीएस नियमांचे पालन करणारा असेल.)

श्री. उमेश मोहनन, पूर्ण-वेळ संचालक, इंडेल मनी

‘इंडेल मनी’चे पूर्णवेळ संचालक श्री. उमेश मोहनन म्हणाले , “आम्हाला आमच्या मागील एनसीडी विक्रीच्या वेळी बाजाराकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला होता आणि या सार्वजनिक विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे. गुंतवणूकदारांचा कायम असलेला विश्वास आमच्या व्यवसाय प्रारूप, व्यवस्थापन संघ, कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धती आणि दीर्घकालीन विकास धोरणावरील त्यांचा भर दर्शवतो. भारतीय अर्थव्यवस्था आपली कणखरता टिकवून ठेवत असताना आणि कर्जाची मागणी चांगली असताना, व्यक्ती आणि व्यवसायांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात संघटित कर्जदात्यांची (ज्यामध्ये सोने तारण कर्ज देणाऱ्या बँकेतर वित्तीय कंपनीचा समावेश आहे) भूमिका महत्त्वाची ठरते. या निधी उभारणीमुळे आमची भांडवली स्थिती अधिक मजबूत होईल आणि बदलत्या कर्ज मागणीची पूर्तता करण्याची, दीर्घकालीन विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याची व नियामक आवश्यकतांचे पालन करण्याची आमची क्षमता वाढेल.”

३१ मार्च २०२६ पर्यंत, ‘इंडेल मनी’ची ‘व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता’ (एयूएम) ४,१०,३९०.३४ लाख रुपये (४,१०३.९० कोटी रुपये) इतकी होती; तुलनेसाठी, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ती २,३३,४४४ लाख रुपये (२,३३४.४४ कोटी रुपये) इतकी होती. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, कंपनीने ६०,५९६ लाख रुपये (६०५.९६ कोटी रुपये) इतके एकूण उत्पन्न आणि १२,३९७ लाख रुपये (१२३.९७ कोटी रुपये) इतका कर-पश्चात नफा नोंदवला. कंपनीचे नक्त मूल्य (नेट वर्थ) ६३,१७७ लाख रुपये (६३१.७७ कोटी रुपये) इतके होते. कंपनीने मालमत्तेचा दर्जा आणि भांडवली बळकटी यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ३१ मार्च २०२६ रोजी सकल अनुत्पादित मालमत्ता (ग्रॉस एनपीए) १.६५%, निव्वळ अनुत्पादित मालमत्ता (नेट एनपीए) १.३०% आणि टियर-१ भांडवल पर्याप्तता गुणोत्तर १८.९५% इतके होते.

कंपनीचा विस्तार ३० जून २०२६ रोजी, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांमध्ये, तसेच पुद्दुचेरी, दिल्ली, चंदीगड आणि अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!