आयडियल स्पोर्ट्सच्या सल्लागार विमल अग्निहोत्री यांचा अमृत महोत्सव संपन्न
आयडियल स्पोर्ट्सच्या सल्लागार विमल अग्निहोत्री यांचा अमृत महोत्सव संपन्न

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 08/05/2026 📞 8850212023
MUMBAI : RMI.COM(M) आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप संस्थेच्या सल्लागार व क्रीडाप्रेमी श्रीमती विमल अग्निहोत्री यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल, श्रीफळ, पंच्याहत्तरी हार, सन्मानचिन्ह व ७५ दिव्यांची ओवाळणी करून महिला क्रीडा विभाग प्रमुख सुनिता चव्हाण व सहकाऱ्यांनी अभीष्टचिंतन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका रेश्मा कडवे, समाजसेविका अपर्णा कडवे आदी उपस्थित होते. महिला विभाग क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमात विमल अग्निहोत्री यांचे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपला गेली अनेक दशके सहकार्य लाभत आहे.
श्रीमती विमल अग्निहोत्री अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या कनिष्ठ भगिनी सुनिता चव्हाण यांनी आपले पिताश्री स्व. रामचंद्र कडवे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ काळेवाडी-काळाचौकी येथील बाल गोपाळ मित्र मंडळाच्या व्यायामशाळेचे नुतनीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे विभागातील गरीब युवा व्यायामपटूना त्याचा जास्तीत जास्त लाभ होणार आहे. तसेच शालेय खेळाडूंसाठी कॅरमप्रेमी स्व. दशरथ चव्हाण स्मृती कॅरम सेंटर देखील सुरु करण्यात येणार आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, क्रीडापटू गोविंदराव मोहिते, सुनील नागवेकर, प्रवीण शिंदे, अनिल सावळे, ओमकार चव्हाण आदी विशेष कार्यरत आहेत.


