Business

एलआयसी-अडसूळ ट्रस्ट ट्रॉफी आंतर सहकारी बँक सांघिक कॅरम स्पर्धा १ मेपासून  

  एलआयसी-आनंदराव अडसूळ ट्रस्ट ट्रॉफी आंतर सहकारी बँक आणि शालेय मुलामुलींच्या सांघिक कॅरम स्पर्धेस १ मेपासून दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहात प्रारंभ होणार आहे.

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON 01/05/2026 ( 8850212023 )

Mumbai :- ( NHI24.COM ) एलआयसी-आनंदराव अडसूळ ट्रस्ट ट्रॉफी आंतर सहकारी बँक आणि शालेय मुलामुलींच्या सांघिक कॅरम स्पर्धेस १ मेपासून दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहात प्रारंभ होणार आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत दोन सांघिक कॅरम स्पर्धांचे विजेतेपद पटकाविण्यासाठी नामवंत ८ सहकारी बँकांचे कॅरम संघ तसेच नुकत्याच झालेल्या विविध जिल्ह्यातील ६४ शालेय मुलामुलींच्या निवड चाचणीमधून निर्माण झालेले ६ संघ, १ ते ३ मेपर्यंत झुंजणार आहेत. आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्तचा हा उपक्रम सहकारी बँक कर्मचारी व शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क आहे.

आंतर सहकारी बँक सांघिक कॅरम स्पर्धेमध्ये साखळी अ गटात अपना बँक, म्युनिसिपल बँक, एमएससी बँक, कुर्ला बँक तर साखळी ब गटात कोकण बँक, एनकेजीएसबी बँक, जनकल्याण बँक, ग्रेटर बॉम्बे बँक आदीं संघांची बाद फेरी गाठण्यासाठी चूरसं असेल. नुकत्याच झालेल्या विविध जिल्ह्यातील ६४ शालेय मुलामुलींच्या निवड चाचणीमधून निर्माण झालेल्या आनंदराव अडसूळ प्लॅटीनम, सिबिईयु वॉरीअर्स, कॅप्टन अभिजित चॅम्पियन्स, आनंदसागर फिनिशर्स, आयडियल फायटर्स, कॅरम लव्हर्स आदी ६ संघांच्या सुपर लीग कॅरम स्पर्धेत उदयोन्मुख शालेय खेळाडू आपल्या बोटांची करामत मोबाईलपेक्षा कॅरम बोर्डवर दाखविण्यास अधिक उत्सुक आहेत. स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, जनरल सेक्रेटरी नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे व अन्य पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १० वा. अपना बँक विरुद्ध एमएससी बँक यामधील साखळी लढतीने होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!