निसान मोटर इंडियाकडून महाराष्ट्रात नेटवर्कचा विस्तार, मुंबईत तीन नवीन टचपॉइंट्सचे उद्घाटन
निसान मोटर इंडियाकडून महाराष्ट्रात नेटवर्कचा विस्तार मुंबईत

POSTED BY : MRUNALI SAKPAL, DATED ON 06/03/2026 ( 8850212023 )

• निसानच्या महाराष्ट्रातील नेटवर्कचा मुंबईत विस्तार झाला असून त्यातून उपलब्धता सुधारेल आणि या प्रदेशात ग्राहकांच्या अनुभवात वाढ होईल.
• या महिन्यात भारतभरातील ऐतिहासिक नेटवर्क विस्ताराचा भाग असलेले हे नवीन टचपॉइंट्स महाराष्ट्रातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीला सेवा देतील.

मुंबई(NHI@24.com): निसान मोटर इंडिया प्रा. लिमिटेडने (एनएमआयपीएल) मुंबईत अत्याधुनिक लक्ष्मी निसान शोरूम आणि कार्यशाळा सुविधांच्या उद्घाटनाने महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला आहे. हे उद्घाटन निसानची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये अखंड विक्री आणि सेवा अनुभव देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांशी सुसंगत आहे.
या सुविधांमध्ये प्रत्येकी चार गाड्यांची प्रदर्शन क्षमता असलेली घाटकोपरमध्ये २००० चौरस फूट क्षेत्रात तसेच मालाडमध्ये २१०० चौरस फुटांची शोरूम्स आणि कांदिवलीत मासिक ३०० गाड्यांना सर्व्हिसिंग व सुट्या भागांचे पाठबळ देऊ शकणाऱ्या ७००० चौरस फूट क्षेत्रातील पूर्णपणे सुसज्ज सेवा कार्यशाळेचा समावेश आहे. निसानच्या जागतिक रिटेल मानकांच्या अनुषंगाने तयार केलेली अत्याधुनिक शोरूम्स उच्च दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आहेत आणि वाहन खरेदीचा उत्कृष्ट अनुभव व अद्वितीय ग्राहक मूल्य देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या जाणकार, सुशिक्षित आणि उत्साही विक्री आणि सेवा व्यावसायिकांद्वारे कार्यरत आहेत.
यावेळी बोलताना निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, “मुंबईत आमच्या नवीन शोरूम आणि कार्यशाळा सुविधांच्या उद्घाटनासह महाराष्ट्रात आमची उपस्थिती बळकट करताना आम्हाला आनंद होत आहे. निसान ब्रँडच्या वाढीला चालना देताना या प्रदेशात ग्राहकांकडून जोरदार मागणी दिसून येत आहे. हा विस्तार आमच्या राष्ट्रव्यापी नेटवर्क विस्ताराचा एक अविभाज्य भाग आहे, जो आमच्या ग्राहकांजवळ जाण्याच्या आणि वाहनखरेदीचा उत्तम अनुभव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देतो. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या निसान ग्रॅव्हाइटसह आम्ही आमच्या उत्पादनांच्या विक्रीला चालना देत आहोत. त्यामुळे नेटवर्क विस्तार हा आमच्या धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे.”
लक्ष्मी निसानचे मुख्य वितरक के. जयराम म्हणाले, “मुंबईत या नवीन सुविधांच्या शुभारंभासह महाराष्ट्रात ब्रँडची उपस्थिती वाढवण्यासाठी निसान मोटर इंडियाशी भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. निसानच्या उत्तम उत्पादन पोर्टफोलिओ आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोनाच्या पाठिंब्याने ग्राहकांना जागतिक दर्जाची रिटेल सुविधा आणि सेवा अनुभव प्रदान करण्याची आमची बांधिलकी या विक्रेत्यांमध्ये प्रतिबिंबित होते. आम्ही मुंबई आणि आसपासच्या भागातील ग्राहकांना दर्जेदार खरेदी अनुभव आणि विक्रीनंतरच्या पाठबळासह सेवा देण्यास उत्सुक आहोत. ”
निसान भारतीय बाजारपेठेत वेगाने विस्तार करत असल्याने ही वाढ एका महत्त्वपूर्ण वेळी झाली आहे. न्यू निसान मॅग्नाइटच्या सातत्यपूर्ण यशामुळे वाढीचा भक्कम पाया रचला गेला आहे, तर न्यू निसान ग्रॅव्हाइटमुळे मुख्य क्षेत्रांत ब्रँडची उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे.
या विस्तारासह निसान भारतीय ग्राहकांना अधिक मूल्य देण्याच्या उद्देशाने वितरक विकास आणि ग्राहककेंद्री उपक्रमांमध्ये निरंतर गुंतवणुकीच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेसाठी आपली दीर्घकालीन वचनबद्धता मजबूत
मुंबई, महाराष्ट्र लक्ष्मी निसान, घाटकोपर लक्ष्मी निसान, दुकान ५, सीटीएस १५१.१५, द मेरिडियन बिझनेस पॉईंट, लाल बहादूर शास्त्री मार्ग, आर सिटी मॉलजवळ, घाटकोपर पश्चिम, मुंबई-४०००८६, महाराष्ट्र
मुंबई, महाराष्ट्र लक्ष्मी निसान, मालाड लक्ष्मी निसान १ एस सुविधा, दुकान क्र. तळमजल्यावर १ आणि २ आणि दुकान क्र. १ पहिल्या मजल्यावर, वन वर्ल्ड, एसव्ही रोड, एन.एल. शाळेजवळ मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४, महाराष्ट्र
मुंबई, महाराष्ट्र लक्ष्मी निसान, मालाड वर्कशॉप लक्ष्मी निसान कार्यशाळा, तळमजला आणि पहिला मजला, युनिट क्र. ६१ए आणि ६१बी, कांदिवली को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेड, चारकोप रोड, मुंबई, मुंबई उपनगरी, महाराष्ट्र, ४०००६४
निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडबाबत निसान मोटर इंडिया प्रा. लि.ची (एनएमआयपीएल) स्थापना २०१० मध्ये झाली असून ती निसान मोटर कंपनी लिमिटेड, जपानची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे व ९० वर्षांहून अधिक काळापासून नावीन्यपूर्ण आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेसह जागतिक स्तरावर वाहन क्षेत्रात आघाडीवर आहे. निसान त्यांच्या प्रतिष्ठित वाहनांसाठी, प्रगत गतिशीलता तंत्रज्ञानासाठी आणि कामगिरीवर आधारित सेवांसाठी ओळखली जाते. ही गोष्ट त्यांच्या जागतिक मोटरस्पोर्ट्समधील उपस्थिती आणि विद्युत वाहनांतील आघाडीत दिसून येते. त्यात पुरस्कारविजेत्या निसान लीफचा समावेश आहे.
निसान मोटर इंडिया ६५ आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देशांतर्गत आणि निर्यात सेवा पुरवते आणि सध्या जागतिक स्तरावर दोन लाखांहून अधिक ग्राहक आणि ऑल न्यू निसान ग्रॅव्हाइटसह निसान मॅग्नाइटची रिटेल विक्री करते. कंपनीने २०२५ मध्ये कंपनीने एकूण १.२ दशलक्ष वाहन निर्यात साध्य केली. त्यामुळे ती भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाईल निर्यातदारांपैकी एक ठरली. निसान मोटर इंडिया २८० हून अधिक ग्राहक टचपॉईंटसह विस्तारीत नेटवर्क, भारतकेंद्री उत्पादने आणि नाविन्यपूर्ण, विश्वासार्ह आणि ग्राहककेंद्री गतिशीलतेसाठी वचनबद्धतेच्या माध्यमातून आपली उपस्थिती मजबूत करते.




