Flim category

‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’ आता तुमच्या स्क्रीनवर – जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’चा खास नजराणा!

_थिएटरपासून ओटीटीपर्यंत ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’ – अल्ट्रा झकास मराठी ओटीटी वर ७५ हून अधिक गाजलेली नाटके पाहता येणार!_

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON 25/03/2026 ( 8850212023 )

 मराठी रंगभूमीची ‘तिसरी घंटा’ आता केवळ नाट्यगृहांपुरती मर्यादित राहिलेली नाही. तिचा आवाज आता डिजिटल जगातही तितक्याच ताकदीने घुमतो आहे.

याच पार्श्वभूमीवर, जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’ घेऊन येत आहे ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’ या उपक्रमाचा दुसरा पर्व. त्यामध्ये २७ मार्चपासून प्रेक्षकांना ७५ हून अधिक गाजलेली मराठी नाटके एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत.

मराठी रंगभूमीने अनेक दशकांपासून आपल्या कथा, विनोद आणि भावनिक स्पर्शामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. १९८०-९० च्या दशकात टुरिंग टॉकीज आणि दौऱ्यांमुळे ही नाटके महाराष्ट्रातील शहरांपासून छोट्या गावांपर्यंत पोहोचली. त्यामुळे नाटकांवर प्रेम करणारा निष्ठावान प्रेक्षकवर्ग तयार झाला.

‘इथे लटकला श्याम’ आणि ‘ह्या नारी झाल्याच ना भारी’ यांसारख्या नाटकांनी शेकडो प्रयोग गाजवले आणि त्यातील कलाकार घराघरात ओळखले जाऊ लागले. आजही या नाटकांची लोकप्रियता तितकीच कायम आहे.

आता हेच गाजलेले रंगमंचीय अनुभव डिजिटल माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत. ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘यदा कदाचित’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘बुवा तिथे बाया’, ‘गोपाळा रे गोपाळा’ आणि ‘फादर माझा गॉडफादर’ यांसारखी लोकप्रिय नाटके या संग्रहात पहायला मिळणार आहेत. याशिवाय ‘नवरा म्हणू नये आपला’, ‘चोर चोर चाळीत चोर’ आणि ‘धुमशान’ ही नाटकेही प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवतील.

कॉमेडी, कौटुंबिक, सामाजिक आणि भावनिक अशा विविध विषयांवर आधारित हा संग्रह आहे. ‘मिस्टर खोटे खरे बोला’, ‘बोल बच्चन’ आणि ‘डिटेक्टिव्ह चंगू मंगू’ ही नाटके प्रेक्षकांना खळखळून हसवतील; तर ‘सासू वरचढ जावई’, ‘माझा पती करोडपती’ आणि ‘आमच्या या घरात’ ही नाटके घरगुती नात्यांवर हलक्या-फुलक्या शैलीत भाष्य करतात. ‘अधांतर’, ‘मनोमनी’, ‘निष्पाप’ आणि ‘तू तसा मी’ यांसारखी नाटके भावनिक बाजूही प्रभावीपणे मांडतात.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी. ई. ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “मराठी रंगभूमी ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’ या उपक्रमातून आम्ही हा वारसा जपत आहोत आणि डिजिटल माध्यमातून नव्या पिढीपर्यंत मराठी नाटकं पोहोचवत आहोत.”

आज विविध प्रकारचा कंटेंट उपलब्ध असला तरी दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम आहे. येत्या २७ मार्चला ‘तिसरी घंटा’ पुन्हा एकदा वाजेल आणि यावेळीसुद्धा ती तुमच्या स्क्रीनवर अनुभवायला मिळेल.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!