आ.सचिनभाऊ अहिर वाढदिवस चषक कॅरम स्पर्धेत ४८ खेळाडूंमध्ये शुक्रवारी चुरस
आ.सचिनभाऊ अहिर वाढदिवस चषक कॅरम स्पर्धेत ४८ खेळाडूंमध्ये शुक्रवारी चुरस

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON 19/03/26 ( 8850212023 )
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आमदार सचिनभाऊ अहिर वाढदिवस चषक शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे २० मार्च रोजी अजिंक्यपद पटकाविण्यासाठी विविध जिल्ह्यातील १४ वर्षाखालील ४८ खेळाडूंमध्ये परेल येथील आरएमएमएस सभागृहात चुरस होईल. राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेत राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विरुध्द सुयश तोडकर आणि नील म्हात्रे विरुध्द वरद कोल्हे यामधील सलामीच्या लढती संघाचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते उद्घाटनाने होणार आहेत.
विजेतेपदाच्या दावेदारीसाठी पोद्दार अकादमी स्कूलचा प्रसन्न गोळे, श्री नारायण गुरु हायस्कूलचा उमैर पठाण, पार्ले टिळक विद्यालयाचा दुर्वेश चव्हाण, पाटकर हायस्कूलचे नील म्हात्रे व सारा देवन, एसकेकेई हायस्कूलचा केवल कुळकर्णी, हॉली फॅमिली हायस्कूलचा चैतन्य पोमेंडकर, सीएनएम हायस्कूलचे धृती राय व राशी कोटेचा, कनोसा हायस्कूलची वेदिका पोमेंडकर आदी खेळाडू दर्जेदार खेळ करण्याच्या पावित्र्यात आहेत. चँम्पियन कॅरम बोर्डावर होणाऱ्या स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिला जाणार आहे. सबज्युनियर खेळाडूंच्या तंत्रशुध्द खेळाबरोबर सरावात्मक दर्जा वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणारे आमदार सचिनभाऊ अहिर यांचे शालेय क्रीडा चळवळीमधील योगदान उल्लेखनीय असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय क्रीडा स्पर्धेचे सातत्य संयोजकांनी यंदाही कायम राखले आहे.




