Uncategorizedखेल

राज्य पातळी आंतर को-ऑपरेटिव्ह बँक क्रिकेट स्पर्धा १४ फेब्रुवारीपासून

राज्य पातळी आंतर को-ऑपरेटिव्ह बँक क्रिकेट स्पर्धा १४ फेब्रुवारीपासून

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 09/02/2026 📞  9004379946

मुंबई NHI.COM(M) माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या एकमेव मान्यता प्राप्त को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य पातळी मर्यादित षटकांची आंतर को-ऑपरेटिव्ह बँक टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १४ व १५ फेब्रुवारी रोजी दादर-पूर्व येथील पुरंदरे स्टेडीयमवर ही स्पर्धा होईल. मुंबई शहर व उपनगरसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील को-ऑपरेटिव्ह बँकांचे टेनिस क्रिकेट संघ प्रतिवर्षीप्रमाणे सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत.

को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई संलग्नीत सहकारी बँकांमधील महाराष्ट्र राज्यातील टेनिस क्रिकेट संघांसाठी मर्यादित असून स्पर्धा बाद पध्दतीने होईल. पहिल्या ४ विजेत्या-उपविजेत्या संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक देऊन अध्यक्ष आनंदराव अडसूळ व सल्लागार माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित संघांनी प्रवेश अर्जासाठी युनियन कार्यालय (दूरध्वनी: २४३७ १७५५/ ९९६९२ ६५५३८), ८१/८३ शालिनी पॅलेस, भवानी शंकर रोड, दादर-पश्चिम, मुंबई-२८ येथे ११ फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर, नितीन गवादे आदी पदाधिकारी कार्यरत आहेत.

 

https://newshindindia.com/news/12576/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!