खेल

१९ जानेवारीला श्री उद्यानगणेश विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा 

१९ जानेवारीला श्री उद्यानगणेश विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा 

MUMBAI:(NHN@24.COM) : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही एक दिवसीय कॅरम स्पर्धा सर्व शालेय १६ वर्षाखालील मुलामुलींसाठी मोफत खुली असून पहिल्या १६ विजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर व टी शर्ट आदी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

माघी श्री उद्यानगणेश जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील श्री उद्यानगणेश मंदिर मंडपात ही शालेय कॅरम स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी बाद पद्धतीने रंगणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीचे विश्वस्त प्रकाश परब अथवा प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे १० जानेवारीपर्यंत संपर्क साधावा.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!