खेल

जीतेज, सुजय, सर्वेश प्रथम

जीतेज, सुजय, सर्वेश प्रथम

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 03/01/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड सहप्रायोजित आयडियल राज्य स्तरीय शालेय मुलामुलींच्या जलद बुध्दिबळ स्पर्धेत ८ वर्षाखालील गटात जीतेज गाडगेने, ११ वर्षाखालील गटात सुजय सावंतने तर १४ वर्षाखालील गटात सर्वेश पांढरेने प्रथम क्रमांक पटकाविला. बिगर मानांकित सुजय सावंतने (४ गुण) सरस सरासरीच्या बळावर निकटतम प्रतिस्पर्धी फिडे गुणांकित व प्रथम मानांकित आरिष गांधी (४ गुण), द्वितीय मानांकित आहील शेख (४ गुण) व जश निसार (४ गुण) यांचे आव्हान मागे टाकत गटविजेतेपदावर झेप घेतली. आयडियल अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, क्रीडा संघटक सुनील नागवेकर, क्रीडाप्रेमी पल्लवी जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मुंबई बुध्दिबळ संघटना, इंडियन ऑईल व आरएमएमएस सहकार्याने झालेल्या ९० पुरस्कारांच्या स्पर्धेमधील ८ वर्षाखालील गटात जीतेज गाडगेने (४ गुण) प्रथम, शौर्य गौरने (४ गुण) द्वितीय, मेधांश बांगरने (४ गुण) तृतीय, साध्या जाधवने (४ गुण) चौथा, जीयांश जैनने (३ गुण) पाचवा; ११ वर्षाखालील गटात सुजय सावंतने (४ गुण) प्रथम, आरिष गांधीने (४ गुण) द्वितीय, आहील शेखने (४ गुण) तृतीय, जश निसारने (४ गुण) चौथा, आयांश पाटीलने (३ गुण) पाचवा तर १४ वर्षाखालील गटात सर्वेश पांढरेने (५ गुण) प्रथम, युग संघवीने (४ गुण) द्वितीय, सौरीश दळवीने (३.५ गुण) तृतीय, आदित्य केळकरने (३ गुण) चौथा, साईशा मुळेने (३ गुण) पाचवा पुरस्कार जिंकला. विविध जिल्ह्यातील फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह नामवंत १०१ खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!