महाराष्ट्रयुवा

न ओळखता येणारा लूक! ‘पेड्डी’मधील ‘अप्पलासूर’ म्हणून जगपती बाबूंचे कॅरेक्टर पोस्टर प्रदर्शित

न ओळखता येणारा लूक! ‘पेड्डी’मधील ‘अप्पलासूर’

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 29/12/2025 📞  9004379946

 

‘पेड्डी’मध्ये जगपती बाबूंचा धक्कादायक अवतार प्रदर्शित; ‘अप्पलासूर’ कॅरेक्टर पोस्टरने वाढवली उत्सुकता!

मुंबई NHI.COM(M)

‘पेड्डी’ ही 2026 मधील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया चित्रपटांपैकी एक मानली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नामवंत दिग्दर्शक बुची बाबू सना करत आहेत. चित्रपटात ग्लोबल स्टार राम चरण प्रमुख भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या दमदार उपस्थिती आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी ते सज्ज आहेत. तर फीमेल लीडमध्ये सुंदर जान्हवी कपूर झळकणार आहे. टीझर लाँच आणि चित्रपटाच्या ‘चिकिरी चिकिरी’ या गाण्याच्या प्रचंड यशानंतर, प्रेक्षकांना चित्रपटाशी संबंधित नव्या अपडेट्सची आतुरतेने प्रतीक्षा आहे.

ही उत्सुकता आणखी वाढवत, ‘पेड्डी’च्या निर्मात्यांनी आज जगपती बाबूंचे कॅरेक्टर पोस्टर जारी केले असून त्यांचा ‘अप्पलासूर’ हा किरदार प्रेक्षकांसमोर आणला आहे. या पोस्टरमध्ये ते पूर्णपणे नव्या आणि वेगळ्या लूकमध्ये दिसत आहेत, ज्यामुळे त्यांना ओळखणेही कठीण आहे. साधे, विस्कटलेले ग्रामीण कपडे, पांढरे केस, काळी-पांढरी मिशी आणि दाढी, डोळ्यांवर चष्मा—एकूणच त्यांचा लूक एखाद्या गावातील सामान्य माणसासारखा भासतो. या पोस्टरमुळे चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले,
“शानदार @IamJagguBhai ‘अप्पलासूरी’च्या भूमिकेत #Peddi मधून ❤‍🔥
एका दमदार आणि प्रभावी पात्रातील त्यांच्या जबरदस्त परफॉर्मन्ससाठी तयार राहा 💥”

https://x.com/i/status/2005573505979433123

‘पेड्डी’चे गाणे “चिकिरी चिकिरी” चार्ट्सवर धुमाकूळ घालत असून चित्रपटाची चर्चा प्रचंड वाढवली आहे. जपान, यूएईसह जगभरातील अनेक देशांतील चाहते या गाण्याच्या सिग्नेचर स्टेप्स रिक्रिएट करत आहेत. तसेच या गाण्याने 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज पार केले असून, ते एक ग्लोबल हिट ठरले आहे.

राम चरण, जान्हवी कपूर, जगपती बाबू, शिवा राजकुमार आणि दिव्येंदू शर्मा यांसारख्या कलाकारांनी सजलेला ‘पेड्डी’ हा चित्रपट बुची बाबू सना यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे. हा चित्रपट 27 मार्च 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!