खेल

आयडियल बुध्दिबळ स्पर्धेत समीरा, सुजय, कैवल्य गटविजेते

आयडियल बुध्दिबळ स्पर्धेत समीरा, सुजय, कैवल्य गटविजेते

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT.19/07/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM आयडियल बुध्दिबळ स्पर्धेत समीरा, सुजय, कैवल्य गटविजेते आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे दि न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहप्रायोजित शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेत पुण्याची समीरा थोरातने ८ वर्षाखालील, मुंबईच्या कैवल्य परबने १० वर्षाखालील तर सुजय सावंतने १२ वर्षाखालील गटविजेतेपद पटकाविले. निर्णायक फेरीत समीरा थोरातने वजिराच्या सहाय्याने आक्रमक खेळ करीत अगस्त्य मुनोटच्या राजाला १८ व्या चालीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले आणि अपराजित राहून पाचवा साखळी गुण जिंकला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त मुंबई बुध्दिबळ संघटना व आरएमएमएस सहकार्याने झालेल्या न्यू इंडिया अॅशुरन्स-आयडियल जलद बुध्दिबळ स्पर्धेच्या ८ वर्षाखालील गटात मुलींमध्ये समीरा थोरातने प्रथम (५ गुण), साध्या जाधवने द्वितीय (४ गुण), निरंजना संदीपने तृतीय (४ गुण) व मुलांमध्ये साहस जाधवने प्रथम (३ गुण), युवीर शाहने द्वितीय (३ गुण), अरिंजय भट्टाचार्जीने तृतीय (३ गुण); १० वर्षाखालील गटात मुलींमध्ये निकिता संदीपने प्रथम (४ गुण), आरोही मालूने द्वितीय (२ गुण) व मुलांमध्ये कैवल्य परबने प्रथम (४ गुण), अथर्व मुळीकने द्वितीय (४ गुण), जीतेज गाडगेने तृतीय (३.५ गुण) तर १२ वर्षाखालील गटात मुलींमध्ये सर्वा परेलकरने प्रथम (४ गुण), स्वना शाहने द्वितीय (३ गुण), विअना जैनने तृतीय (२ गुण) व मुलांमध्ये सुजय सावंतने प्रथम (५ गुण), अर्णव जगतापने द्वितीय (३ गुण), कार्तिकेय सावंतने तृतीय (३ गुण)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!