खेल

आनंदराव अडसूळ ट्रस्ट विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा १८ एप्रिलला

शालेय कॅरम स्पर्धा १८ एप्रिलला

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT.14/04/2026 📞  9004379946

मुंबई NHI.COM(M) आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट, को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप तर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचीत्य साधून विनाशुल्क शालेय कॅरम व आंतर सहकारी बँक सांघिक कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. शालेय १६ वर्षाखालील मुलामुलींची पहिल्या टप्प्यातील निवड चाचणी कॅरम स्पर्धा १८ एप्रिल रोजी सिबिईयु सभागृह, दादर-पश्चिम येथे होणार आहे. स्पर्धेतील १६ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार असून त्यांना १ मेपासून होणाऱ्या सांघिक स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती संघटन समितीचे पदाधिकारी प्रमोद पार्टे व जनार्दन मोरे यांनी दिली.

गतवर्षी कामगारांच्या मुलामुलींसाठी कामगार दिनानिमित्त साकारण्यात आलेल्या पूर्णपणे मोफत कॅरम उपक्रमास गतवर्षी लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल घेऊन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी विनाशुल्क कॅरम उपक्रमाचे सातत्य यंदाही कायम राखले आहे. शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धा १८ व २५ एप्रिल रोजी दोन टप्प्यात होणार असून निवड झालेल्या खेळाडूंचे संघ निर्माण करण्यात येणार आहेत. उदयोन्मुख शालेय खेळाडूंना दर्जेदार सरावासह मोफत तज्ञांचे मार्गदर्शन देखील लाभणार आहे. सदर उपक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे १६ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!