Businessदेश
Trending

VBJ कडून ‘डिव्हाईन दिवाळी’ विशेष ऑफर जाहीर

VBJ – Vummidi Bangaru Jewellers

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 21/10/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM : भारतातील पारंपरिक दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बंगारू ज्वेलर्स (VBJ – Vummidi Bangaru Jewellers) या ब्रँडने ‘डिव्हाईन दिवाळी’ ही विशेष ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर ८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत सोने, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांच्या दागिन्यांसह चांदीच्या वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
या ऑफरअंतर्गत सोन्याचे, हिऱ्यांचे, प्लॅटिनमचे आणि मौल्यवान रत्नांचे दागिने तसेच चांदीच्या वस्तूंच्या खरेदीवर घडणावळ शुल्क आणि मूल्यवर्धित शुल्कावर (व्हॅल्यू ॲडिशन) २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय, चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर १० टक्के सवलत मिळणार आहे. जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रति ग्रॅम १२५ रुपये अतिरिक्त मूल्यही मिळणार आहे.
VBJ चे व्यवस्थापकीय भागीदार अमरेंद्रन वुम्मीडी म्हणाले, “दिवाळी हा दागिन्यांच्या खरेदीच्या दृष्टीने महत्त्वाचा सण आहे. डिव्हाईन दिवाळी’ ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर अधिक लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सणासुदीच्या काळात दागिने खरेदीचा अनुभव अधिक लाभदायी करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. विविध प्रकारच्या दागिन्यांमध्ये ग्राहकांना विस्तृत पर्याय उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!