खेल
Trending

महापौर शालेय कॅरम स्पर्धेच्या साकीनाका सराव उपक्रमात ५४ खेळाडूंचा सहभाग

महापौर शालेय कॅरम स्पर्धे

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 09/09/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, समता विद्या मंदिर-साकीनाका व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात साकीनाका-अंधेरी परिसरातील ५४ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. याप्रसंगी समता विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका भारती पवळे, क्रीडा शिक्षक साधुराम व सुनील खोपकर, शिक्षिका मीनाक्षी तिवारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय एकेरी कॅरम स्पर्धा २६ सप्टेंबरपासून होणार असल्यामुळे शालेय मुलामुलींना कॅरम खेळाच्या नियम व सरावाबाबत पूर्वतयारीचे विनाशुल्क मार्गदर्शन संयोजकांमार्फत चँम्पियन कॅरम बोर्डवर दिले जात आहे. साकीनाका-अंधेरी तसेच चेंबूर परिसरातील शालेय खेळाडूंचा प्रतिसाद लक्षात घेऊन संयोजकांनी उदयोन्मुख शालेय खेळाडूंचे २३ सप्टेंबर रोजी विनाशुल्क प्रगत मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!