करमतारा इंजिनीअरिंग लिमिटेडचा आयपीओ बुधवार, 09 सप्टेंबर 2026 रोजी खुला होणार
प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ₹241 ते ₹254 असा निश्चित करण्यात आला आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 04/09/2026 (8850212023)
- करमतारा इंजिनीअरिंग लिमिटेडच्या प्रति इक्विटी शेअर ₹10 दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा (“इक्विटी शेअर्स”) प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ₹241 ते ₹254 निश्चित करण्यात आला आहे;
- फ्लोअर प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 24.10 पट आहे आणि कॅप प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 25.40 पट आहे;
- बोली/ऑफर बुधवार, 09 सप्टेंबर 2026 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख मंगळवार, 08 सप्टेंबर 2026 आहे;
- किमान 59 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 59 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येऊ शकते;
- 3 सप्टेंबर 2026 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसची लिंक:
https://live.jmfl.com/od/UploadedFiles/30724143-5FE1-426C-B1E7-411370531E90.pdf
- प्राईस बँड जाहिरातीची लिंक: https://live.jmfl.com/od/UploadedFiles/CEDCBF1B-A872-4971-BCED-16E4D73C973C.pdf
मुंबई (RMN) : करमतारा इंजिनीअरिंग लिमिटेडच्या (“कंपनी”) इक्विटी शेअर्सच्या आयपीओसंदर्भातील बोली/ऑफर बुधवार, 09 सप्टेंबर 2026 रोजी खुली होणार आहे. ही बोली/ऑफर शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल. अँकर इन्व्हेस्टरसाठी बोली लावण्याची तारीख मंगळवार, 08 सप्टेंबर 2026 असेल.किमान 59 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 59 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येऊ शकते. या ऑफरचा एकूण आकार प्रत्येकी ₹10 दर्शनी मूल्य असलेल्या 36,307,052 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा असून, त्याचे एकूण मूल्य ₹8,750.00 दशलक्षपर्यंत आहे.

या ऑफरमध्ये प्रत्येकी ₹10 दर्शनी मूल्य असलेल्या आणि एकूण ₹6,750.00 दशलक्ष पर्यंतच्या [●] इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि एकूण ₹2,000.00 दशलक्ष पर्यंतच्या [●] इक्विटी शेअर्सच्या विक्री प्रस्तावाचा समावेश आहे. या विक्री प्रस्तावामध्ये तन्वीर सिंग यांच्याकडून प्रत्येकी ₹10 दर्शनी मूल्य असलेल्या आणि एकूण ₹1,000.00 दशलक्ष पर्यंतच्या [●] इक्विटी शेअर्सच्या, तसेच राजीव सिंग यांच्याकडून प्रत्येकी ₹10 दर्शनी मूल्य असलेल्या आणि एकूण ₹1,000.00 दशलक्ष पर्यंतच्या [●] इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा समावेश आहे.
लागू कायद्यांतर्गत परवानगी असल्यानुसार, कंपनीने बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून ₹750.00 दशलक्ष मूल्याच्या कम्पल्सरी कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेयर्स – सीसीपीएसची प्री-आयपीओ प्लेसमेंट केली. ही प्री-आयपीओ प्लेसमेंट बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्लामसलतीने कंपनीने ठरवलेल्या किमतीत करण्यात आली होती आणि आरओसीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करण्यापूर्वी ती पूर्ण झाली होती. प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे उभारलेली रक्कम सुधारित सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19(2)(b) च्या अनुपालनाच्या अधीन राहून फ्रेश इश्यूमधून कमी करण्यात आली आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केलेले इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. या ऑफरच्या हेतूंसाठी, एनएसई हे नियुक्त स्टॉक एक्स्चेंज असेल.
ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19(2)(बी) आणि सेबी आयसीडीआर नियमावलीच्या नियम 31 नुसार दिली जात आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर नियमावलीच्या नियम 6(1) चे पालन करून ‘बुक बिल्डिंग प्रोसेस‘द्वारे दिली जात आहे, ज्यामध्ये ‘निव्वळ ऑफर‘च्या किमान 50% हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) प्रमाणबद्ध रीतीने वाटपासाठी उपलब्ध असेल. कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर्ससोबत सल्लामसलत करून, सेबी आयसीडीआर नियमांनुसार क्यूआयबी हिश्यातील 60% पर्यंत भाग स्वेच्छेनुसार ‘अँकर गुंतवणूकदारांना‘ देऊ शकते (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). या अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी 40% पर्यंतचा भाग खालीलप्रमाणे राखीव असेल: (अ) 33.33% पर्यंत हिस्सा देशांर्गत म्युच्युअल फंडांसाठी; आणि (ब) 6.67% पर्यंत हिस्सा जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीव असेल. हे वाटप अँकर गुंतवणूकदारांना ज्या किमतीला शेअर्स दिले जातील, त्या किमतीला किंवा त्यापेक्षा जास्त किमतीला वैध बोली प्राप्त होण्याच्या अटीवर असेल.
अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये कमी सबस्क्रिप्शन झाल्यास किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबी हिश्यात (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळून) जोडले जातील. नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी ऑफर किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. जर ऑफरच्या किमान 75% वाटप क्यूआयबीना होऊ शकले नाही, तर बोलीची संपूर्ण रक्कम त्वरित परत केली जाईल. मात्र, जर म्युच्युअल फंडांची एकूण मागणी ‘नेट क्यूआयबी पोर्शन‘च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड हिश्यातील उर्वरित शेअर्स इतर क्यूआयबीना प्रमाणबद्ध वाटपासाठी उर्वरित क्यूआयबी पोर्शन‘मध्ये जोडले जातील.
पुढे, (अ) ऑफरचा किमान 15% हिस्सा गैर-संस्थात्मक बोलीदात्यांसाठी वाटपासाठी उपलब्ध असेल (ज्यापैकी एक-तृतीयांश हिस्सा ₹0.20 दशलक्षपेक्षा अधिक आणि ₹1.00 दशलक्षपर्यंतच्या बोली लावणाऱ्या बोलीदात्यांसाठी राखीव असेल आणि दोन-तृतीयांश हिस्सा ₹1.00 दशलक्षपेक्षा अधिक बोली लावणाऱ्या बोलीदात्यांसाठी राखीव असेल), परंतु कोणत्याही एका उप-वर्गातील न विकलेला हिस्सा गैर-संस्थात्मक बोलीदात्यांच्या दुसऱ्या उप-वर्गातील बोलीदात्यांना वाटप केला जाऊ शकतो आणि (ब) सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार ऑफरचा किमान 35% हिस्सा रिटेल इंडिविज्युअल बिडर्ससाठी (‘RIBs’) वाटपासाठी उपलब्ध असेल, ज्यासाठी त्यांच्याकडून ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे बंधनकारक आहे. अँकर इन्व्हेस्टर्सव्यतिरिक्त, इतर सर्व संभाव्य बोलीदात्यांना त्यांच्या संबंधित एएसबीए खात्याचा आणि यूपीआय बिडर्सच्या बाबतीत यूपीआय आयडीचा तपशील देऊन ‘ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट‘ (“ASBA”) प्रक्रियेद्वारेच ऑफरमध्ये भाग घेणे बंधनकारक आहे. ही रक्कम, संबंधित बोलीच्या रकमेच्या मर्यादेत, सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स (“SCSBs”) किंवा स्पॉन्सर बँक(स) द्वारे ब्लॉक केली जाईल. या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स जेएम फायनान्शियल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (आधीची आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड) हे आहेत.




