Business

स्वातंत्र्यदिनी बीओबी कप १४ वर्षाखालील शालेय बुध्दिबळ स्पर्धा  

किमान चार साखळी फेऱ्यांमधील स्पर्धेतील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील.

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON 08/08/2026 (8850212023)

Mumbai (NHI24.COM) आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग सहप्रायोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त बीओबी कप ८/९/१०/११/१२/१४ वर्षाखालील मुलामुलींची शालेय बुध्दिबळ स्पर्धा १५ ऑगस्ट रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार आहे. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागाच्या सौजन्याने विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ९० पुरस्कार दिले जाणार आहेत.

किमान चार साखळी फेऱ्यांमधील स्पर्धेतील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील एकूण ६ वयोगटातील प्रत्येक वयोगटांमध्ये विजेत्या-उपविजेत्यांना १५ बीओबी कपचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेमध्ये दोन विजेत्यापदांचा मानकरी ठरणाऱ्या स्पर्धकास समाजरत्न स्व. सुरेश आचरेकर स्मृती विशेष पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे १० ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!