BusinessExhibition founder

तैवान एक्सलन्सकडून ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये स्मार्ट उत्पादनाच्या भविष्यासाठी एआय-आधारित अ‍ॅडॅप्टिव्ह सोल्यूशन्सचे सादरीकरण

भारतातील स्मार्ट उत्पादन परिसंस्थेला गती देण्यासाठी तैवानच्या सर्वात मोठ्या औद्योगिक तंत्रज्ञान प्रदर्शनांपैकी एकाचे आयोजन

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 22/07/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM  : भारत स्मार्ट उत्पादन (स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रात वेगाने प्रगती करत असताना, तैवान तंत्रज्ञान भागीदार म्हणून आपली भूमिका अधिक बळकट करत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स – तैवानच्या अर्थमंत्रालयाचा (Ministry of Economic Affairs – MOEA) उपक्रम – भारतातील उत्पादन क्षेत्राच्या पुढील टप्प्यातील वाढीस चालना देण्यासाठी एआय-आधारित औद्योगिक उपाययोजना सादर करत आहे.

मुंबईतील तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरचे महासंचालक श्री. होमर चँग यांच्या हस्ते तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध आघाडीच्या उद्योग संघटना, उत्पादन क्षेत्रातील कंपन्या आणि तंत्रज्ञान भागीदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या पॅव्हेलियनमध्ये २२ पुरस्कारप्राप्त तैवानी ब्रँड्स सहभागी असून एआय एज कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स आणि स्मार्ट ऑटोमेशन तसेच औद्योगिक उपकरणे व घटक या क्षेत्रांतील ५५ हून अधिक अत्याधुनिक नवकल्पनांचे प्रदर्शन करण्यात आले आहे.

उद्घाटन दिनाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या “बिल्डिंग सस्टेनेबल मॅन्युफॅक्चरिंग विथ तैवान्स अ‍ॅडॅप्टिव्ह सोल्यूशन्स” या विषयावरील तैवान एक्सलन्स प्रॉडक्ट लॉन्च कार्यक्रमात HIWIN, IBASE, SINTRONES आणि SYNTEC यांनी आपली नवीन औद्योगिक उत्पादने सादर केली. या उपाययोजनांमधून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनचा वापर करून उत्पादनक्षमता वाढवणे, मशीन डाऊनटाइम कमी करणे आणि अधिक बुद्धिमान (इंटेलिजंट) कारखाना व्यवस्थापन शक्य कसे होते, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

या पॅव्हेलियनमध्ये AAEON, ADATA Industrial, Advantech, APLEX, Campro, FATEK, Getac, HIWIN, IBASE, ICP DAS, Jumbo Laser, KSS, Lanner, MCM, PLANET, Premio, Shuttle, SINTRONES, SYNTEC, TBI Motion, TOYO आणि Winmate यांसारख्या आघाडीच्या तैवानी कंपन्यांची अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या दिवशी एआय एज कॉम्प्युटिंग हे तंत्रज्ञान विशेष आकर्षण ठरले. यामुळे रिअल-टाइम डेटा विश्लेषण, प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स आणि बुद्धिमान कारखाना व्यवस्थापनाविषयी उद्योग क्षेत्रातील वाढता कल अधोरेखित झाला.

यावेळी बोलताना मुंबईतील तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरचे महासंचालक श्री. होमर चँग म्हणाले, “भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उत्पादन बाजारपेठांपैकी एक आहे आणि औद्योगिक ऑटोमेशनमधील आपल्या कौशल्याच्या माध्यमातून तंत्रज्ञान भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी तैवान कटिबद्ध आहे. २०२५ मध्ये भारत आणि तैवान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार १२ अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक झाला आहे. प्रगत उत्पादन तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढत असताना दोन्ही देशांमध्ये भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि भारताच्या स्मार्ट उत्पादनाच्या उद्दिष्टांना पाठबळ देण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.”

तैवान एक्सलन्स पॅव्हेलियन २२ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हॉल क्रमांक ६, बूथ I2–J2, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई येथे सर्व अभ्यागतांसाठी खुले राहणार आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या: https://teautomationexpo.com/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!