एलन मुंबईचा रौष्मित गुप्ता NEET-UG 2026 मध्ये AIR-34 एलन मुंबईचे 4 विद्यार्थी देशातील टॉप 1000 मध्ये
4 विद्यार्थी देशातील टॉप 1000 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

POSTED BY : ANAGHA SAKPAL DATED ON : 17/07/2026 (9004379946)
मुंबई (NHI24.COM) : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा NEET-UG 2026 चा निकाल जाहीर झाला असून एलन करिअर इन्स्टिटयूट, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एलन मुंबईचा क्लासरूम विद्यार्थी रौष्मित गुप्ता याने 720 पैकी 700 गुण मिळवत अखिल भारतीय स्तरावर (AIR-34) वा क्रमांक पटकावला आहे. तसेच एलन मुंबईचे
एलन मुंबईचे सेंटर हेड नेहचल सिंह हंसपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रौष्मित गुप्ता (AIR-34), अन्वी गोयल (AIR-696), मनीष गुप्ता (AIR-718) आणि आरुषी गुप्ता (AIR-724) यांनी देशातील टॉप 1000 मध्ये स्थान मिळवले आहे. तसेच एलन मुंबईचे 11 विद्यार्थी देशातील टॉप 5000 मध्ये झळकले आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील निकालात आर्यन गुप्ता आणि पांशुल बन्सल या दोघांनीही 720 पैकी 715 गुण मिळवले. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) टायब्रेकर नियमानुसार आर्यन गुप्ता याला (AIR-1), तर पांशुल बन्सल याला (AIR-2) घोषित करण्यात आले. यापैकी पांशुल बन्सल हा एलन चा नियमित क्लासरूम विद्यार्थी असून, आर्यन गुप्ता हा एलन च्या Distance Learning Program शी संबंधित विद्यार्थी आहे.
याशिवाय, एलन क्लासरूम विद्यार्थी आयुष भालोटिया याने 710 गुणांसह (AIR-4), एलन Online Test Series मधील आर्यन दुबे याने (AIR-7), तर एलन क्लासरूम विद्यार्थी मधील गौरव सिंह याने (AIR-9) मिळवून संस्थेच्या यशात भर घातली.
एलन चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नितीन कुकरेजा यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, NEET-UG 2026 च्या निकालात एलन ने पुन्हा एकदा देशभरातील आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम राखली आहे.
आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार देशातील टॉप 10 मधील 5, टॉप 20 मधील 10, टॉप 50 मधील 23 आणि टॉप 100 मधील 46 विद्यार्थी ALLEN चे आहेत. यापैकी 36 विद्यार्थी क्लासरूम मधील, 1 विद्यार्थी Online Live क्लासरूम मधील, तर 10 विद्यार्थी Distance Learning Program आणि Online Test Series मधील आहेत.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) प्रसिद्ध केलेल्या 690 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या टॉप 138 विद्यार्थ्यांच्या यादीत एलन चे 63 विद्यार्थी असून, त्यामध्ये 50 विद्यार्थी क्लासरूम मधील, 1 विद्यार्थी Online Live क्लासरूम मधील आणि 13 विद्यार्थी Distance Learning Program आणि Online Test Series मधील असल्याची माहिती एलन प्रशासनाने दिली.




