Business

बाळांच्या निरोगी वाढीचा संदेश देणारी ‘हिमालया बेबीकेअर’ची नवी जाहिरात सादर केली आहे.

दररोजच्या मालिशमध्ये अश्वगंधा आणि बला यांचे महत्त्व अधोरेखित

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON 20/04/2026 ( 8850212023 )

Mumbai : NHI24.COM भारतातील विश्वासार्ह बेबी केअर ब्रँडपैकी एक असलेल्या ‘हिमालया बेबीकेअर’ने ‘हिमालया बेबी मसाज ऑइल’साठी एक नवीन जाहिरात सादर केली आहे. या व्हिडिओ जाहिरातीमध्ये बालपणाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मांडण्यात आला असून, बाळ असणे हे दिसते तितके सोपे नसते, याची पालकांना आठवण करून देण्यात आली आहे. बाळे सक्षम होण्यासाठी जी छोटी-छोटी धडपड करीत असतात, त्यांचे या फिल्ममध्ये कौतुक करण्यात आले आहे. तसेच बाळांना करावयाचे रोजचे मालिश ही केवळ दिनचर्या नसून, बाळांची ताकद, त्यांचा विकास आणि एकूणच त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असा तो जपणुकीचा महत्त्वाचा भाग आहे, यावरही या जाहिरातीत प्रकाश टाकण्यात आला आहे.

या जाहिरातीविषयी बोलताना ‘हिमालया वेलनेस कंपनी’चे बेबीकेअर विभागाचे संचालक एन. व्ही. चक्रवर्ती म्हणाले, “हिमालया बेबीकेअरमध्ये आम्हाला विश्वास आहे की बाळाची वाढ ही त्याची दररोज घेतली जाणारी काळजी आणि त्याच्याशी असणारे जिव्हाळ्याचे क्षण यांमधून घडत असते. बाळाला मालिश करणे ही पारंपरिक पद्धत असून, ती बाळाची शारीरिक ताकद वाढवते, पालक-बाळ नाते अधिक घट्ट करते, भावनिक जिव्हाळा निर्माण करते आणि एकूणच त्याच्या आरोग्यास मदत करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!