आदित्य रिखारी, कुतले खान आणि रॅवॅटर यांच्या ‘ऐ अजनबी’ गाण्यासह कोक स्टुडिओ भारत सीझन ४ चा शुभारंभ
भारत सीझन ४ चा शुभारंभ

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 24/03/2026 📞 8850212023
राष्ट्रीय,NHI24.COM(M : कोक स्टुडिओ भारत या भारताच्या वैविध्यपूर्ण संगीत वारशाला साजरे करणाऱ्या मंचाने ‘ऐ अजनबी’ या पहिल्या गाण्यासह आपल्या सीझन ४ ची सुरुवात केली आहे. हे गाणे एका भावनेवर आधारित आहे जी कधीही जुनी होत नाही, ती म्हणजे ‘ओढ’. आदित्य रिखारी यांचा मधुरमय आवाज, लोकसंगीताचे निष्णात कलाकार कुतले खान यांची प्रभावी शैली आणि रॅवॅटर यांची संगीत निर्मिती यांतून साकारलेले हे गाणे म्हणजे दोन युगांमधील संवाद आहे. हा संवाद पत्रांमध्ये लिहिलेल्या प्रेमाचा, तसेच पाठवल्या न गेलेल्या संदेशांमध्ये दडलेल्या प्रेमाचा आहे.
‘ऐ अजनबी’ हे गाणे साध्या पण वैश्विक सत्याचा शोध घेते, ते म्हणजे प्रेमाची भाषा बदलली असली, तरी त्यामागील व्याकुळता तीच आहे. चोरून पाहिलेले कटाक्ष आणि हाताने लिहिलेल्या कवितांच्या शांततेपासून रात्री उशिरापर्यंत केलेले मेसेजेस आणि अपूर्ण राहिलेल्या कबुलीपर्यंत हे गाणे कोणत्याही एका काळाची बाजू न घेता प्रेमामध्ये असलेल्या ओढीचा प्रवास मांडते. हे गाणे ना भूतकाळाचे अति-उदात्तीकरण करते, ना वर्तमानाकडे धाव घेते, तर या दोन्ही काळांना एकमेकांच्या सोबतीने जगू देते.
संगीताच्या बाबतीतही हे गाणे अशाच एका भावनिकतेला सादर करते. लोकसंगीतातील गोडवा आणि समकालीन पॉप यांचा येथे नैसर्गिक संगम झाला आहे, ज्यामुळे परंपरेचा वारसा जपणारे आणि वर्तमानाचा श्वास घेणारे अनोखे गाणे आकारास आले आहे. आदित्य रिखारी या गाण्याला वास्तवाशी आणि सर्वसामान्यांना पटेल अशा भावनांशी जोडतात, तर कुतले खान या गाण्यामध्ये प्रादेशिक सखोलपणा आणि आत्मीयता आणतात, जी ‘ओढी’इतकीच जुनी वाटते. रॅवॅटर या दोन्ही जगांना एकत्र विणण्याचे काम करतात, ज्यामुळे हे गाणे नवे वाटते पण त्याचा मूळ गाभा तसाच राहतो. या सर्वांचा परिणाम म्हणजे हे गाणे जुन्या काळातील भावपूर्ण मेलोडीजवर प्रेम करणाऱ्यांना आणि पहिल्यांदाच प्रेमाचा अनुभव घेणाऱ्या आजच्या तरुणांना आपलेसे वाटते.
कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट एशियाचे आयएमएक्स (इंटीग्रेटेड मार्केटिंग एक्स्पीरिअन्स) प्रमुख शंतनू गंगाणे म्हणाले, ”आज भारतीय संगीत केवळ एका मर्यादित चौकटीत राहिलेले नाही. श्रोते आता लोकसंगीत, इंडी, इलेक्ट्रॉनिक अशा अनेक संगीत प्रकारांचा आनंद घेतात. ‘ऐ अजनबी’ या गाण्याच्या माध्यमातून कोक स्टुडिओ भारतने विविध पिढ्या, संस्कृती आणि सोनिक्स यांना एकत्र आणले आहे.
आम्हाला अत्यंत प्रतिभावान आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले आदित्य रिखारी यांच्यासोबत या सीझनची सुरुवात करताना खूप आनंद होत आहे. त्यांचा मोठा चाहता वर्ग आणि लोकसंगीताचे दिग्गज कुतले खान यांची पारंपरिक मुळे यांचा मिलाफ म्हणजे कोक स्टुडिओ भारतचा खरा आत्मा आहे. डीजे रॅवॅटर यांनी या दोन भिन्न जगांना एकाच मंचावर आणण्याचे अप्रतिम काम केले आहे, ज्यातून कोक स्टुडिओ भारत सीझन ४ ची दमदार सुरुवात झाली आहे.”




