जीएलपी-1 थेरपीसाठी परवडण्याजोग्या किमतीत एक नवा मापदंड निर्माण करत, साप्ताहिक उपचार ₹325 पासून सुरू होईल
जीएलपी-1 थेरपीसाठी परवडण्याजोग्या किमतीत एक नवा मापदंड

.POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 21/03/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) : ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (ग्लेनमार्क), एक संशोधन-आधारित जागतिक औषध निर्माण करणाऱ्या कंपनीने,जीएलपी-1 थेरपीसाठी परवडण्याजोग्या किमतीत एक नवा मापदंड स्थापित करीत, आणि रुग्णांना प्रगत मधुमेह उपचारांपर्यंत अधिक व्यापक प्रवेश मिळावा यासाठी. आज भारतात टाइप 2 डायबिटीज मेलिटस (टी2डीएम) च्या व्यवस्थापनासाठी GLIPIQⓇ (सेमाग्लूटाइड) लाँच केल्याची घोषणा केली.
अनेक रुग्णांच्या बाबतीत, खर्च आणि गुंतागुंत यामुळे प्रगत इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या थेरपीची सुरुवात करण्याचा निर्णय अनेकदा उशिरा घेतला जातो. GLIPIQⓇ चे उद्दिष्ट परवडणाऱ्या किमतीत लक्षणीय सुधारणा करून, जीएलपी-1 थेरपीपर्यंत प्रवेश वाढवणे आणि अधिक व्यापक रुग्ण समूहास उपचाराची सुरुवात लवकर करण्यास सक्षम करणे हे आहे.
GLIPIQⓇ हे वायल आणि प्री-फिल्ड पेन या दोन्ही फॉर्म्युलेशन्समध्ये उपलब्ध आहे. भारतात करण्यात आलेल्या बहु-केंद्रित, यादृच्छिक, तुलनात्मक, अॅक्टिव्ह-कंट्रोल्ड, ओपन-लेबल फेज III चिकित्सालयीन अभ्यासानंतर या उत्पादनास सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून मान्यता देण्यात आली आहे, ज्यामध्ये टाइप 2 डायबिटीज असलेल्या भारतीय रुग्णांमध्ये अनुकूल परिणामकारकता आणि सुरक्षितता दर्शविण्यात आली आहे.
GLIPIQⓇ च्या केंद्रस्थानी डोस-विशिष्ट सिरिंजेससह त्याचे वायल-आधारित फॉर्म्युलेशन आहे. जे जीएलपी-1 थेरपीसाठी अधिक सुलभ, लवचिक आणि चिकित्सालयीन व्यवस्थापनीय दृष्टिकोन सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे वायल फॉर्म्युलेशन रुग्णांच्या गरजांनुसार, विशेषतः उपचाराच्या प्रारंभीच्या टप्प्यांमध्ये, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डोस देण्यास समर्थन देते. तसेच, हे किफायतशीर उपचाराचा मार्ग प्रदान करते, जे थेरपीपर्यंत प्रवेश वाढण्यास आणि उपचार पालन सुधारण्यास मदत करते.
GLIPIQⓇ वायलद्वारे उपचाराचा अपेक्षित साप्ताहिक खर्च ₹325 ते ₹440 दरम्यान आहे, ज्यामुळे भारतात जीएलपी-1 थेरपी सुरू करण्यासाठी असलेला खर्चाचा अडथळा लक्षणीयरीत्या कमी होतो आणि या उपचाराच्या वर्गासाठी अधिक परवडणारा प्रवेशबिंदू निःश्चित केला जातो.
वायल्स व्यतिरिक्त, GLIPIQⓇ प्री-फिल्ड पेन फॉर्मॅटमध्ये देखील उपलब्ध आहे, जे दीर्घकालीन थेरपीसाठी स्वयं-डोसिंगची सोय प्रदान करते. हे दोन्ही फॉर्मॅट—वायल आणि पेन—एकत्रितपणे एक संरचित उपचार मार्ग सक्षम करतात. हा दृष्टिकोन उपचाराची सातत्यता, सुधारित पालन आणि शाश्वत उपचार परिणामांना समर्थन देतात. दोन्ही सादरीकरणे 2 एमजी/1.5 एमएल, 4 एमजी/3 एमएल आणि 8 एमजी/3 एमएल या प्रमाणांमध्ये उपलब्ध आहेत.
ग्लेनमार्क ‘संकल्प’ हा रुग्ण समर्थन कार्यक्रम (पीएसपी) देखील सादर करत आहे, जो थेरपीची सुरुवात करण्यास मदत करणे, इंजेक्टेबल उपचाराबाबतचे समाधान व आत्मविश्वास वाढवणे आणि दीर्घकालीन पालन सक्षम करणे यासाठी डिझाइन केला आहे. हे ग्लेनमार्कच्या केवळ परवडण्याजोगेपणा सुधारण्याच्याच नव्हे, तर रुग्णांना थेरपीवर टिकून राहण्यास आणि उत्तम आरोग्य परिणाम साध्य करण्यास सक्षम करण्याच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे.
लॉन्चविषयी भाष्य करताना, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि उद्योग प्रमुख, इंडिया फॉर्म्युलेशन्स, श्री आलोक मलिक म्हणाले, “भारतामध्ये प्रगत डायबिटीज थेरपी सुरू करण्यासाठी परवडणे हा सर्वात मोठ्या अडथळ्यांपैकी एक आहे. GLIPIQⓇ च्या माध्यमातून आम्ही जीएलपी-1 थेरपीसाठी परवडणाऱ्या किमतीत एक नवा मापदंड स्थापित करत आहोत, ज्यामध्ये साप्ताहिक उपचार ₹325 पासून सुरू होईल. वायल-आधारित फॉर्मॅट चिकित्सालयीन मार्गदर्शित सुरुवात आणि लवचिक डोसिंगला समर्थन देण्यासोबतच आम्हाला अधिक किफायतशीर पर्याय देण्यास सक्षम करते
जीएलपी-1 श्रेणीतील आमच्या अनुभवाच्या आधारे, ज्यामध्ये Lirafit™ (लिराग्लूटाइड) यांचा समावेश आहे, आणि आमच्या ‘संकल्प’ कार्यक्रमाच्या पाठबळाने, अधिकाधिक रुग्णांना कालांतराने थेरपीपर्यंत पोचवणे, ती सुरू करणे आणि सुरू ठेवणे यासाठी मदत करणे हा आमचा उद्देश आहे.”
सेमाग्लूटाइड हे जीएलपी-1 रिसेप्टर अॅगोनिस्ट असून, टाइप 2 डायबिटीज असलेल्या रुग्णांच्या व्यवस्थापनात विस्तृत प्रमाणावर वापरले जाते, विशेषतः ज्या रुग्णांना स्थूलता, स्थापित अॅथेरोस्क्लेरोटिक कार्डिओव्हॅस्क्युलर आजार (एएससीव्हीडी ), संरक्षित इजेक्शन फ्रॅक्शनसह हृदयविकार (एचएफपीईएफ) आणि दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार (सिकेडी) यांसारख्या सह-रुग्णता आहेत अशा रुग्णांसाठी,जे ग्लायसेमिक नियंत्रणापलीकडे त्याच्या व्यापक कार्डिओमेटाबॉलिक लाभ प्रोफाइलचे प्रतिबिंब दर्शवते.




