‘उजास’ उपक्रमांतर्गत आई-मुलीच्या संभाषणातून मासिकपाळीविषयीचे मौन भंगचे आयोजन
'उजास' उपक्रमांतर्गत आई-मुलीच्या संभाषणातून मासिकपाळीविषयीचे मौन भंगचे आयोजन

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 11/03/2026 📞 8850212023

मुंबई NHI24.COM(M) – अद्वैतेशा बिर्ला यांनी स्थापन केलेल्या ‘उजास’ उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त पालघर जिल्ह्यात मासिक पाळीच्या आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल “लेट्स टॉकरेड II ” या आई व मुलींच्याजागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मासिकपाळीविषयी दीर्घकाळापासून असलेले मौन तोडण्यासाठी आणि दोन पिढ्यांमध्ये खुल्यासंवादांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला.
पालघर येथील माध्यमिकविद्यालय भगिनी समाज येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये२५ माता आणि २५ किशोरवयीन मुली, शिक्षक आणिमुख्याध्यापक उपस्थित होते. * या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता वर्तककार्यक्रमाच्या पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.* ‘उजास’च्या माध्यमातून, ही संस्था संवेदनशीलता, वैज्ञानिक जागरूकता आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून मासिक पाळीच्याआरोग्याचा विषय हाताळून किशोरवयीन मुलींच्या आरोग्य आणि लिंग समानतेला चालना देतआहे. मासिक पाळीशी संबंधित आरोग्य हे सन्मान, शिक्षण आणि संधीशी जवळून जोडलेले आहे हे ओळखून, या उपक्रमातून मासिक पाळीबद्दलच्या संभाषणांना सामान्य पातळीवर आणण्याचातसेच कोणत्याही मुलीचा आत्मविश्वास किंवा शिक्षण कलंकाने मर्यादित राहणार नाहीयाची सुनिश्चिती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
* ‘उजास’च्याप्रमुख पूनम पाटकर म्हणाल्या.* “’उजास’ मासिकपाळीच्या आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी गेल्या एकवर्षापासून पालघरमधील समुदायांमध्ये जवळून काम करत आहे. या काळात आम्ही २८६४३ हून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत आणिमुलींना सुरक्षित मासिक पाळीच्या उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ४०७३७हून अधिक सॅनिटरी पॅड मोफत वाटले आहेत. पालघर हेभौगोलिकदृष्ट्या मुंबईपासून जवळ असूनही, मासिकपाळीबद्दल जागरूकतेची येथील कमतरता लक्षणीय होती, ही याप्रवासातील सर्वात उल्लेखनीय गोष्ट होय. सुरुवातीच्याकाळात, मासिक पाळीविषयी असलेल्या प्रवादांमुळेत्याविषयी आरोग्य जागरूकता सत्र आयोजित करण्याची परवानगी मिळवणे हेसुद्धा एकआव्हान होते. वर्षानुवर्षे सातत्याने सामुदायिकसहभागानंतर आज आम्ही मासिक पाळीबद्दल उघडपणे चर्चा करण्यासाठी माता आणि मुलींनाएकत्र आणू शकतो. जेव्हा कुटुंबे आणि समुदायांमध्येसंभाषण सुरू होते, तेव्हा ते आत्मविश्वास निर्माणकरण्यात, आरोग्याबाबत फलनिष्पत्ती सुधारण्यात आणिकोणत्याही मुलीला नैसर्गिक जैविक प्रक्रियेची लाज वाटू नये याची हमी देण्यात समर्थभूमिका बजावू शकतात, हे या बदलावरून दिसून येते,”
आई-मुलीचे चर्चा मंडळ हे या कार्यक्रमाचे एक प्रमुखआकर्षण होते. खुल्या संवादासाठी सुरक्षित जागा निर्माणकरण्यासाठी त्याची रचना करण्यात आली होती. यात मातांनीत्यांच्या पहिल्या मासिक पाळीतील स्वतःचे अनुभव सांगितले, तर मुलींनी देखभाल, समजूतदारपणा आणि भावनिकआधाराबाबतच्या त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या.
सहभागी झालेल्या एका मुलीनेसांगितले की, “याकार्यक्रमामुळे आम्हाला मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने बोलण्याचा आत्मविश्वास मिळाला. यामुळे आई आणि मुलींमधील बंध अधिक घट्ट होण्यास मदत झाली. आपल्या समाजामध्ये अशा चर्चाअधिक व्हायला हव्यात, असे मला वाटते.” सहभागी झालेली एक आई म्हणाली ,”हे सत्र खूप उपयुक्त होते. आम्हालामासिक पाळीबद्दल तसेच आई व मुली एकमेकांना कसे आधार देऊ शकतात याबद्दल महत्त्वाचीमाहिती मिळाली. मी माझ्या इतर मुलींना या कार्यक्रमातआणले असते तर बरे झाले असते. अशा चर्चा वारंवार व्हायला हव्यात.”