Uncategorized

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा २३ मार्चपासून

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा २३ मार्चपासून

POSTED BY ANAGHA SAKPAL ON DATED 11/03/2026 (9004379946)

MUMBAI (NHI@24.COM) विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८ येथे होणार आहे. जखमी क्रीडापटूंना रुग्णालयीन सेवा त्वरित उपलब्ध करण्यासाठी विविध हॉस्पिटलचे क्रिकेटपटू सहकार्य करीत असल्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी स्पर्धेचे सातत्य कायम राखले आहे. अजिंक्यपद पटकाविणाऱ्या संघाला रुपये पंधरा हजार पुरस्कारासह आकर्षक चषक व सर्व खेळाडूंना मेडल्सने सन्मानित केले जाणार आहे.

 

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा यंदा बाद पध्दतीने आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीद्वारे आयोजित केली जाणार आहे. टॉप-१० संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक देण्यात येईल. सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज तसेच प्रत्येक सामन्यातील दोन्ही संघातील प्रत्येकी एका उत्कृष्ट खेळाडूला आकर्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रुग्णालयीन सेवेत कायम स्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हॉस्पिटल संघातून स्पर्धेत खेळता येईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णालयीन क्रिकेट संघांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा ब्रीच कँडी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कप्तान प्रदीप क्षीरसागर (७९७७४ ७१९४३) यांच्याकडे १३ मार्चपर्यंत संपर्क साधावा.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!