Uncategorized

एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १लाख २५हजार डॉलर महिला टेनिस स्पर्धेत घरच्या मैदानावर महाराष्ट्राची अव्वल मानांकित खेळाडू वैष्णवी आडकर कौशल्य पणाला लावणार

एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १लाख २५हजार डॉलर महिला टेनिस स्पर्धेत घरच्या मैदानावर महाराष्ट्राची अव्वल मानांकित खेळाडू वैष्णवी आडकर कौशल्य पणाला लावणार

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 29/01/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १लाख २५हजार डॉलर महिला टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राची अव्वल मानांकित खेळाडू वैष्णवी आडकर हिला मुख्य ड्रॉ मध्ये वाईल्ड कार्ड द्वारे थेट प्रवेश देण्यात आला असून घरच्या मैदानावर आपले कौशल्य पणाला लावणार आहे.

स्पर्धेच्या पत्रात फेरीचे सामने ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी होणार असून २ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुख्य ड्रॉ फेरीचे सामने रंगणार आहेत.

२१ वर्षीय वैष्णवी आडकर हिने राज्यातील अव्वल मानांकित खेळाडू असून तिने लक्षवेधी कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये वैष्णवी हिने 15हजार डॉलर महिला आयटीएफ स्पर्धेत आपले पहिले वाहिले विजेतेपद पटकावले होते. याशिवाय गतवर्षी जर्मनी येथे पार पडलेल्या जागतिक विद्यापीठ टेनिस स्पर्धेत तिने कांस्य पदक पटकावले होते. अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला टेनिस पटू ठरली होती.

महाराष्ट्रातील मूळच्या पुण्याची असलेली वैष्णवी आडकर म्हणाली की, घरच्या मैदानावर आपल्या चाहत्यांसमोर खेळणे ही खरच आनंदाची बाब आहे. येथील वातावरण अतिशय उत्साही आणि सकारात्मक असते. जेव्हा चाहत्यांचा तुम्हाला पाठिंबा असतो तेव्हा दबावाखाली देखील अधिक जोमाने खेळण्यास उत्साह येतो. महाराष्ट्रात खेळताना मला अभिमान वाटत असून आम्हाला पाठिंबा देण्यास येत असलेल्या सर्वांचे मी आभार मानते. आगामी या स्पर्धेत याच उत्साहाने आणि आत्मविश्वासाने कामगिरी बजावेल.

एमएसएलटीए आणि एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धेने उपलब्ध करून दिलेल्या प्लॅटफॉर्मबद्दल आभार मानताना वैष्णवी म्हणाली की, खास करून माझ्या क्रमवारीनुसार
डब्ल्यूटीए स्पर्धेत थेट प्रवेश मिळणे शक्य नाही. पण या स्पर्धेमुळे अव्वल दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल एमएसएलटीएचे अध्यक्ष प्रशांत सुतार व मानद सचिव सुंदर अय्यर यांचे मी मनापासून आभार मानते.

आगामी स्पर्धेत मी माझ्या सर्व्हिस व बेस लाईन खेळाकडे अधिक लक्ष देणार आहे. या स्पर्धेत क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची व त्यानुसार आपल्या खेळात अधिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!