भारतातील पहिली ज्वेलरी ब्रँड-नेतृत्वाखालील मॅरेथॉन, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंदणीकृत
ज्वेलरी ब्रँड-नेतृत्वाखालील मॅरेथॉन, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंदणी
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 28/12/2025 📞 9004379946

मुंबई,( NHI@24.COM) : किस्ना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी (हरी कृष्णा ग्रुप) यांनी किस्ना डायमंड मॅरेथॉनच्या १०व्या ऐतिहासिक आवृत्तीचे यशस्वी आयोजन केले. मुंबईत ही मॅरेथॉन १०व्या वर्षात पदार्पण करत असताना, भारतातील आणखी ५६ शहरांमध्ये प्रथमच एका ज्वेलरी ब्रँडच्या नेतृत्वाखाली मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे ही उपक्रम राष्ट्रीय स्तरावर एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.
‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ या संकल्पनेअंतर्गत देशातील ५७ शहरांमध्ये एकाच वेळी हा उपक्रम राबवण्यात आला असून, या आयोजनाची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रयत्न म्हणून करण्यात आली आहे.
या मॅरेथॉनसाठी देशभरातून २०,००० हून अधिक धावपटूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी मुंबईत ५,००० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. मुंबईत ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा तीन प्रकारच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या, तर इतर शहरांमध्ये सकाळी ७ वाजता एकाच वेळी ५ किमीची शर्यत सुरू करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री उज्ज्वल निकम, गेस्ट ऑफ ऑनर म्हणून किरीट भंसाली (अध्यक्ष, GJEPC), मोतीलाल ओसवाल (अध्यक्ष, मोतीलाल ओसवाल ग्रुप) तसेच राजीव जलोटा (सल्लागार, इंडियन पोर्ट अथॉरिटी) यांची मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते २१ किमी, १० किमी आणि ५ किमी गटांतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. मॅरेथॉनचा फ्लॅग-ऑफ सुप्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.




