कुरकुरे® कडून मिलेटवर आधारित जोवार पफ्ससोबत रौप्यमहोत्सव साजरा, पेप्सिको इंडियाच्या स्नॅकिंग वारशाचा विस्तार
कुरकुरे® कडून मिलेटवर आधारित जोवार पफ्ससोबत रौप्यमहोत्सव साजरा, पेप्सिको इंडियाच्या स्नॅकिंग वारशाचा विस्तार

• बेक्ड आहेत- फ्राइड नाहीत- पेप्सिको इंडियाची मिलेटवर आधारित नावीन्यपूर्णता ज्वारी आणि कुरकुरेच्या चटपटीत चवीसोबत जोडली जाणार- यापेक्षा चांगले काय असू शकते!
• कुरकुरे® जोवार पफ्समध्ये भारताच्या कृषी वारशाचे प्रतीक असलेली ज्वारी वापरली आहे
राष्ट्रीय,: पेप्सिको इंडियाचा प्रतिष्ठित घरगुती स्नॅक ब्रँड कुरकुरे आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नवीन कुरकुरे जोवार पफ्स बाजारात आणत आहे. या निमित्ताने कुरकुरे भारतातील बाजरी-आधारित स्नॅकिंग श्रेणीमध्ये पाऊल ठेवत असून ज्वारीची शक्ती आणि कुरकुरेची अविश्वसनीय चव आणि उत्साह एकत्र आणली आहे. यापेक्षा चांगले काय असू शकते? बेक्ड (तळलेले नाही), कुरकुरे ज्वारी पफ्स ग्राहकांना आधुनिक स्वरूपात परिचित घटकांचा आनंद घेण्याचा एक मजेदार, चवदार मार्ग दाखवतात.
भारताची खाद्यसंस्कृती विकसित होत आहे, ग्राहक पारंपरिक घटकांचा पुन्हा शोध घेत आहेत, सजग स्नॅकिंग पर्याय शोधत आहेत आणि स्थानिक समुदाय आणि अर्थव्यवस्था मजबूत करणारे देशांतर्गत ब्रँड स्वीकारत आहेत. मिलेट्सवरील वाढत्या प्रकाशझोतासह आणलेले हे बदल आजच्या पिढीसाठी पारंपरिक धान्यांची नव्याने कल्पना करतात.
मागील २५ वर्षांपासून कुरकुरे अभिमानाने मेड इन इंडिया ब्रँड ठरला आहे – भारतीय ग्राहकांसाठी तयार केलेला, विकसित आणि संगोपन केलेले. या वारशावर आणि ग्राहकांच्या सखोल अभ्यासावर आधारित कुरकुरे जोवार पफ्सच्या या नवसंशोधनात भारताच्या खाद्यपदार्थांच्या संस्कृतीशी जोडण्याची क्षमता असून पेप्सिको इंडियाच्या प्रदेश, अभिरुची आणि संस्कृतींमधील “अनेक भारतीयांना” सेवा देण्याचा दृष्टिकोन साजरा करतात.
पेप्सिको इंडियाच्या कुरकुरे आणि डोरिटोसच्या मार्केटिंग संचालक आस्था भसीन म्हणाल्या, “पेप्सिको इंडियामध्ये ग्राहक केंद्री दृष्टीकोन आमच्या प्रत्येक कामाच्या केंद्रस्थानी असतो. आमचे ध्येय भारताच्या समृद्ध खाद्यपदार्थांच्या परंपरांमध्ये रुजलेले राहून ग्राहकांच्या आवडी आणि पसंतींमध्ये सतत बदल घडवून आणणे हे आहे. कुरकुरे® जोवार पफ्ससह आम्ही एका कालखंडातील धान्याची नव्याने कल्पना अशा स्वरूपात करत आहोत जे सुलभ आणि अप्रतिम आहे आणि “इस से अच्छा क्या होगा” चे खरे प्रतीक आहे. हे उत्पादन भारताच्या परंपरा आणि भविष्याशी जुळणारे घटक तयार करताना ग्राहकांना आनंद देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”
व्यापक संशोधन आणि विकास आणि ग्राहकांच्या सखोल अभ्यासाच्या आधारे हे उत्पादन कुरकुरेला भारतीय स्नॅक्स श्रेणीतील एक आघाडीचा ब्रँड म्हणून बळकट करते, नवीन मिलेट्स बाजारपेठेत विस्तार करते, तर लाखो घरांमध्ये नावीन्य आणण्यासाठी आपली व्याप्ती आणि आवडीचा फायदा घेते.
कुरकुरे® जोवार पफ्स हे उत्तर, पश्चिम आणि पूर्व भारतात आधुनिक आणि पारंपरिक रिटेल, आघाडीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि क्विक-कॉमर्स अॅप्सद्वारे १० रूपये आणि २० रूपये पॅकमध्ये उपलब्ध असतील. या अनावरणाला टीव्ही, डिजिटल आणि रिटेल टचपॉइंट्सचा विस्तार करणाऱ्या एका मजबूत मीडिया प्लॅनद्वारे मदत मिळेल.



