
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 03/05/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M)

मुंबई -मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. ५०, ६० आणि ७० च्या दशकात चित्रपटसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट देणारे अभिनेते सुदेश कुमार यांचे निधन झाले आहे. सुदेश कुमार यांचे शुक्रवारी (1 मे ) मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या ९५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चाहत्यांनी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.
१९६० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते सुदेश कुमार यांचं निधन झालं आहे. सुदेश कुमार यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आलेला. त्यानंतर त्यांना १ मे रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. सुदेश कुमार यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. सुदेश कुमार यांचं १ मे रोजी निधन झालं असून त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ४ मे रोजी प्रेयर मीटचं आयोजन करण्यात आलं आहे.
TOI च्या वृत्तानुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं सुदेश कुमार यांना सोमवार, २७ एप्रिल रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु अभिनेत्याच्या विनंतीनुसार त्यांना घरी परत आणण्यात आलं. ही माहिती सुदेश कुमार यांच्या पत्नीनं दिली. आता त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि मुलगी मिशिका आहेत.
सुदेश कुमार यांची पत्नी, जया धवन यांनी सांगितलं की, ‘त्यांच्या इच्छेनुसार, आम्ही त्यांना गुरुवारी घरी परत आणले. घरी एक तात्पुरतं वैद्यकीय युनिटसुद्धा होतं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला.’
सुदेश कुमार कारकीर्द
स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात, १९३१ साली सरहद्दीवरील शहर असलेल्या पेशावर येथे सुदेश यांचा जन्म झाला. सुदेश लहान असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. अभिनेत्याने एल्फिन्स्टन महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर कुमार यांनी पृथ्वीराज कपूर यांच्या थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश केला.पृथ्वीराज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘पैसा’ (१९५७) हा त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होता. अभिनेत्याचे खरे नाव सुदेश धवन असे होते.
अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे दूरचे नातेवाईक होते. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी ‘पैसा’ हा सिनेमा पृथ्वीराज कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. सुदेश कुमार यांचं खरं नाव सुदेश धवन होतं, पण त्यांचे पडद्यावरील नाव सतत बदलत राहिलं. काही चित्रपटांमध्ये ते सदेश, तर काहींमध्ये सुदेश कुमार म्हणून ओळखले जात, आणि बहुतेक चित्रपटांमध्ये ते सुदेश कुमार म्हणूनच ओळखले जात.
सुदेश कुमार यांना सुरुवातीला कमी बजेटच्या ऐतिहासिक आणि भक्तीपर चित्रपटांमध्ये भूमिका मिळत होत्या, पण १९५९ च्या ‘छोटी बहन’ या चित्रपटातील डॉक्टरच्या छोट्या भूमिकेमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. ‘सारंग’, ‘छोटी बहन’, ‘भरोसा’, ‘खानदान’, ‘जान हातली पे’ आणि ‘उलझन’ यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. 1970 च्या दशकात सुदेश कुमार यांनी ‘मन मंदिर’, ‘उलझन’, ‘बदलते रिश्ते’, आणि ‘जान हथेली पे’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

