लोकल न्यूज़
Trending

नवी, FACE आणि दूरसंचार विभागाच्या ‘संचार साथी’चा सायबर सुरक्षेसाठी उत्सवी उपक्रम; ‘No ‘Ten’sion This Festive Season’ मोहिमेद्वारे १० सामान्य सणासुदीतील ऑनलाइन फसवणुकींबाबत जनजागृती

दसऱ्यापासून प्रेरणा घेत ही मोहीम सणासुदीच्या काळातील १० सामान्य फसवणुकींचे प्रकार उलगडणार असून, सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी व्यावहारिक टिप्स देणार आहे.

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON  : 19/10/2026 (8850212013) 📞

राष्ट्रीय (NHI24) : देशभरात डिजिटल व्यवहार, ऑनलाइन खरेदी आणि सणासुदीच्या आकर्षक ऑफर्सना वेग येत असताना, नवी (Navi) ही कंपनी दूरसंचार विभागाच्या (DoT) ‘संचार साथी’ उपक्रमासह आणि फिनटेक असोसिएशन फॉर कन्झ्युमर एम्पॉवरमेंट (FACE) यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ‘No ‘Ten’sion This Festive Season’ ही मोहीम राबवत आहे.

‘संचार साथी’ हा दूरसंचार विभागाचा नागरिककेंद्रित उपक्रम असून, दूरसंचाराशी संबंधित फसवणुकीपासून नागरिकांना स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम करतो. या उपक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या ‘चक्षू’ सुविधेद्वारे नागरिक संशयास्पद फसवे कॉल, एसएमएस आणि व्हॉट्सॲप संदेशांची तक्रार नोंदवू शकतात. तसेच, या पोर्टलच्या माध्यमातून स्वतःच्या नावावर नोंदणीकृत असलेले मोबाइल कनेक्शन तपासता येतात आणि हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल हँडसेट ब्लॉक करता येतात. दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, संचार साथीवर नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारींमुळे संभाव्य सायबर फसवणुकीतील ₹५,००० कोटींपेक्षा अधिक रकमेचे नुकसान टाळण्यास मदत झाली आहे.

FACE ही भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) मान्यताप्राप्त फिनटेक क्षेत्रातील स्वयंनियामक संस्था (Self-Regulatory Organisation) आहे. ग्राहक संरक्षणाला प्राधान्य देत जबाबदार फिनटेक पद्धतींना प्रोत्साहन देण्याचे काम ही संस्था करते. या तिन्ही संस्था एकत्रितपणे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवण्यास आणि सणासुदीच्या काळात तसेच त्यानंतरही सुरक्षित डिजिटल व्यवहारांच्या सवयी विकसित करण्यास प्रोत्साहन देणार आहेत.

दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारी ही मोहीम रावणाच्या दहा तोंडांपासून प्रेरित आहे. या माध्यमातून सणासुदीच्या काळात होणाऱ्या फसवणुकीचे दहा सामान्य प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग अधोरेखित केले जाणार आहेत. सायबर सुरक्षा जागरूकता महिन्याच्या पार्श्वभूमीवर नवीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही मोहीम राबवली जाणार असून, लघु व्हिडिओंच्या माध्यमातून सायबर सुरक्षा हा विषय रंजक, सहज समजणारा आणि दैनंदिन जीवनात उपयोगात आणता येईल अशा पद्धतीने मांडला जाणार आहे.

या मोहिमेअंतर्गत पुढील विषयांवर भर दिला जाणार आहे: सणासुदीच्या काळातील फसवणुकीचे १० प्रकार: बनावट डिलिव्हरी संदेश, फसव्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स, बनावट कॅशबॅक ऑफर्स, QR कोडद्वारे होणारी फसवणूक, दुसऱ्याची ओळख धारण करून केली जाणारी फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्या रोख रकमेच्या ऑफर्स अशा सामान्य फसवणुकींची माहिती दिली जाणार आहे.

– सायबर सुरक्षेच्या १० सवयी: मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करणे, आर्थिक व्यवहारांसाठी वापरली जाणारी ॲप्स नियमितपणे अपडेट करणे, ॲप्सना दिलेल्या परवानग्यांचा आढावा घेणे आणि व्यवहारांसाठी अलर्ट सुरू करणे अशा डिजिटल सुरक्षा मजबूत करणाऱ्या सोप्या आणि व्यावहारिक उपायांची माहिती दिली जाणार आहे.

– ‘Scam or Safe? Festive Edition’: या विशेष मालिकेत तज्ज्ञांच्या माध्यमातून सणासुदीच्या काळातील दैनंदिन प्रसंगांचे विश्लेषण केले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना संभाव्य फसवणूक ओळखता येईल आणि सुरक्षित राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, हे समजण्यास मदत होईल.

सणासुदीच्या काळातील परिचित प्रसंग आणि थोडक्यात दिलेल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून ही मोहीम फसवणूक करणारे लोक घाई, भीती, बनावट ओळख आणि आकर्षक ऑफर्सचा वापर करून लोकांना संवेदनशील माहिती शेअर करण्यास किंवा पडताळणी न करता पैसे पाठवण्यास कसे प्रवृत्त करतात, हे स्पष्ट करणार आहे. केवळ जागरूकता निर्माण करण्यापुरते मर्यादित न राहता, ग्राहकांनी प्रत्यक्ष कृतीतून सुरक्षितता सुनिश्चित करावी, यावर या मोहिमेचा भर असेल. संशयास्पद फसवणूक आढळल्यास थांबून माहितीची पडताळणी करणे आणि उपलब्ध तक्रार नोंदवण्याच्या सुविधांचा वापर करणे, यासाठीही ग्राहकांना प्रोत्साहित केले जाणार आहे.

या सणासुदीच्या काळात संदेश अगदी सोपा आहे: सणांचा आनंद घ्या, पैसे भरण्यापूर्वी क्षणभर थांबा, माहितीची पडताळणी करा आणि ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!