Flim category

“F.I.R. NO. 469” दाखल होणार २२ जानेवारीला

अभिनेता किरण गायकवाडचं दिग्दर्शकीय पदार्पण

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON  15/09/2026 (8850212023)

मुंबई (NHI24)  तगडी स्टारकास्ट असलेला थ्रिलर चित्रपट आजवर अनेक मालिका, चित्रपटांतून आपल्या उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलेला किरण गायकवाड आता दिग्दर्शकीय पाऊल टाकत आहे. किरणनं दिग्दर्शित केलेला “F.I.R.NO. 469” थ्रिलर चित्रपट २२ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट यांनी “F.I.R. NO 469” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निलेश राठी आणि प्राची राऊत, सचिन अग्रवाल चित्रपटाचे निर्माता, अर्चना नरेश भुतडा या सहनिर्मात्या, तर त्र्यंबक डागा, मोहसीन खान सहयोगी निर्माता आहेत. किरण गायकवाड यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन, तर योगेश कोळी यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेता नचिकेत पूर्णपात्रे, ​प्रसाद ओक अभिनेत्री अमृता धोंगडे, ​राहुल मगदूम, ​निखिल चव्हाण, हार्दिक जोशी, ​अंकिता लांडे, देवेंद्र गायकवाड, ​रमेश परदेशी, ​सुहास शिरसाट, योगेश शिरसाट, चेतन चावडा, ​अंजली जोगळेकर, ​अंकुश मांडेकर, ​मीरा सारंग, चेतन रायकर यांच्या भूमिका आहेत.

एका सर्वसामान्य नागरिकाची गोष्ट “F.I.R. NO. 469” या चित्रपटात आहे. सत्ता, राजकारण, पैसा गुन्हा, पोलिस प्रक्रिया, प्रशासन यात अडकत गेलेल्या माणसाची सस्पेन्स, थ्रिलर अशा प्रकारची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधूनही गोष्टीविषयीची उत्सुकता वाढत आहे. पोलिस स्टेशन दिल एका बाकड्यावर बसलेला सर्वसामान्य माणूस, त्याची हतबलता, मागे भिंतीवर सत्यमेव जयते लिहिलेले दिसते.

 

चित्रपटाविषयी किरण म्हणतो, एका कॉमन मॅनची गोष्ट “F.I.R. NO. 469” या चित्रपटात आहे. अत्यंत नाट्यमय घटना-घडामोडींतून ही गोष्ट उलगडत जाते. समाजातील वेगवेगळे पदर त्यातून कळत जातात. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक या गोष्टीत गुंततील अशा प्रकारे मांडणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!