Businessमहाराष्ट्रशैक्षणिक
Trending

400 हून अधिक वंचित मुलांच्या शिक्षणासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने ‘लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट’ बीएसई सोशल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध

‘लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट’ बीएसई सोशल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 07/09/2026 📞  9004379946

मुंबई NHI24.COM : पिढ्यान्‌पिढ्या सुरू असलेले गरिबीचे चक्र मोडून काढण्यासाठी कार्यरत असलेली ना-नफा तत्त्वावर आधारित संस्था लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट (एलओएलटी) आज बीएसई सोशल स्टॉक एक्स्चेंज (एसईई) वर सूचीबद्ध झाली आहे. वंचित समुदायातील मुलांना शिक्षणाची अधिक चांगली संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या भविष्यासाठी शाश्वत संधी निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने संस्थेच्या प्रयत्नांमधील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या सूचीबद्धतेचा एक भाग म्हणून, एलओएलटी ने रु 1.27 कोटींच्याझिरो कूपन झिरो प्रिन्सिपल’ (झेडसीझेडपी) बाँड इश्यूची सुरुवात केली आहे. बिहार आणि झारखंडमधील वंचित समुदायातील 420 मुलांच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. या इश्यूमध्ये प्रत्येकी रु 1,000 दर्शनी मूल्य असलेली झेडसीझेडपी साधने समाविष्ट असून, किमान एका इन्स्ट्रुमेन्ट्स साठी अर्ज करता येईल. त्यानंतर त्याच्या पटीतही अर्ज करता येणार आहे.

एसईई वरील सूचीबद्धतेमुळे एलओएलटी ला सामाजिक परिणाम साधणारा निधी उभारण्यासाठी नियमनबद्ध आणि पारदर्शक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यामुळे व्यक्ती, संस्था आणि संघटनांना स्पष्टपणे निश्चित केलेल्या सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी योगदान देण्याची संधी मिळणार आहे.

या प्रसंगी बोलताना लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या संस्थापक व्हिली डॉक्टर म्हणाल्या, “शिक्षणामध्ये केवळ एका व्यक्तीचे जीवन बदलण्याचीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाच्या जीवनाची दिशा बदलण्याची आणि कालांतराने संपूर्ण समुदायाच्या प्रगतीचा मार्ग बदलण्याची ताकद आहे. सोशल स्टॉक एक्स्चेंजवर आमची सूचीबद्धता हा अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक माध्यम उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”

“झेडसीझेडपी इश्यूच्या माध्यमातून, शिक्षण सुरू ठेवताना मोठ्या अडचणींचा सामना करणाऱ्या मुलांना मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यांना अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक भविष्य घडवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, आधार आणि संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिक्षणामध्ये गुंतवणूक करणे हा दीर्घकालीन सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग आहे, या विश्वासाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेप्रती आम्ही कृतज्ञ आहोत.”

एरिक्स ॲडव्हायझर्सच्या संस्थापक आणि या इश्यूच्या सल्लागार, सीएस पायल गुप्ता म्हणाल्या, “‘लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट’चे बीएसई सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होणे, ही आमच्यासाठी एक खूप विशेष उपलब्धी आहे, विशेषतः कारण या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होणाऱ्या पहिल्या तीन संस्थांपैकी ही एक बनली आहे. आमच्यासाठी, सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणजे केवळ निधी उभारणे नाही; तर स्वयंसेवी संस्थांना पारदर्शकता वाढवण्याची, त्यांची तयारी सुधारण्याची आणि देणगीदार व गुंतवणूकदारांच्या मोठ्या नेटवर्कशी जोडले जाण्याची ही एक संधी आहे.

गाइडस्टार इंडियाच्या संस्थापक व संचालक तसेच सेबी-स्थापित एसईई सल्लागार समिती आणि बीएसईच्या एसईई गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्या पुष्पा अमन सिंग म्हणाल्या, “सार्वजनिक प्रकटीकरणाच्या सर्वोच्च मानकांचा स्वेच्छेने स्वीकार करण्यासाठी एलओएलटी करत असलेले प्रयत्न हे केवळ संस्थेची विश्वासार्हता वाढवण्याच्या दृष्टीनेच महत्त्वाचे नाहीत, तर भारतातील एनपीओ क्षेत्राबाबतचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दिशेनेही एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

सोशल स्टॉक एक्स्चेंजची कार्यप्रणाली सामाजिक परिणाम साधणाऱ्या निधी उभारणीतील उत्तरदायित्व आणि पारदर्शकता अधिक बळकट करते. यामुळे संस्थांना उभारलेल्या निधीचा अपेक्षित वापर तसेच त्यांच्या विविध उपक्रमांमधून साध्य झालेले सामाजिक परिणाम स्पष्टपणे मांडता येतात.

About Light of Life Trust


https://lightoflifetrust.org/

Light of Life Trust (LOLT) is a nationally acclaimed non-profit organisation established in 2002 with the vision of breaking the intergenerational cycle of poverty and enabling underserved communities to live with dignity and self-respect. Registered under the Bombay Public Trust Act, 1950, LOLT works across education, healthcare, livelihoods and sustainable development to create long-term, community-led impact.

What began with supporting 25 children in Maharashtra has grown into a scalable organisation impacting millions of lives across India. Through Division Anando, for education and Division Jagruti for community development, LOLT works in partnership with governments, corporates, educational institutions and community organisations to build sustainable pathways towards empowerment and self-reliance.

Light of Life Trust has been recognised with Credibility Alliance Accreditation, GuideStar India’s Platinum Level certification and Give.do’s Gold Certification, reflecting its commitment to transparency, accountability and responsible social impact.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!