Uncategorized

लोहिया कॉर्प लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी उघडणार

प्रति इक्विटी शेअरसाठी ४०४ रु. ते ४२५ रु. चा किंमतपट्टा निश्चित

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 20/07/2026 📞  8850212023

  • १ रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरचा किंमतपट्टा ४०४ रु. ते ४२५ रु. निश्चित करण्यात आला आहे.
  • ​बिड/ऑफर सुरू होण्याची तारीख: गुरुवार, २३ जुलै २०२६ आणि बिड/ऑफर बंद होण्याची तारीख: सोमवार, २७ जुलै २०२६.
  • ​किमान बिड लॉट ३५ इक्विटी शेअर्सचा आहे आणि त्यानंतर ३५ च्या पटीत शेअर्ससाठी अर्ज करता येईल.

मुंबई NHI24.COM : लोहिया कॉर्प लिमिटेडने (पूर्वी कानपूर पॅकेजिंग मशीन्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) आपल्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी (आयपीओ) १ रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरसाठी ४०४ रु. ते ४२५ रु. चा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

​कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ किंवा “ऑफर”) सबस्क्रिप्शनसाठी गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी उघडेल आणि सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी बंद होईल.

​गुंतवणूकदार किमान ३५ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३५ इक्विटी शेअर्सच्या पटीत बिड (अर्ज) करू शकतात.

​आमच्या कंपनीचे इश्यूड, सबस्क्राईब्ड आणि पेड-अप इक्विटी शेअर भांडवल १०,५६,५०,००० आहे, जे १ रु. दर्शनी मूल्य असलेल्या १०,५६,५०,००० इक्विटी शेअर्समध्ये विभागलेले आहे.

​आजच्या तारखेला आऊटस्टॅडिंग असलेले (outstanding) इक्विटी शेअर्स १ रु. दर्शनी मूल्याचे १०,५६,५०,००० इक्विटी शेअर्स आहेत.

​१ रु. दर्शनी मूल्य असलेल्या या ऑफरमध्ये प्रमोटर्स – राज कुमार लोहिया, अमित कुमार लोहिया, गौरव लोहिया आणि प्रमोटर ग्रुपच्या सदस्या – रितू लोहिया तसेच इतर विक्री करणारे भागधारक – आलोक कुमार लोहिया, अनुराग लोहिया आणि अनुजा लोहिया यांच्याद्वारे २५,९३१,४०७ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे.

​ही ऑफर बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात आहे, ज्यामध्ये निव्वळ ऑफरपैकी किमान ७५% भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) आणि निव्वळ ऑफरच्या अनुक्रमे १५% पेक्षा जास्त नाही आणि १०% पेक्षा जास्त नाही असा भाग बिगर-संस्थात्मक बोलीदाते (NII) आणि किरकोळ वैयक्तिक बोलीदात्यांसाठी (Retail) वाटप केला जाईल.

​२०२३ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी, २०२४ मधील महसुलाच्या दृष्टीने टेक्निकल टेक्स्टाईल्ससाठी लागणाऱ्या मशिनरी आणि उपकरणांच्या जागतिक स्तरावरील प्रमुख उत्पादकांपैकी एक आहे. पॉलीप्रॉपिलेन (PP) आणि हाय-डेन्सिटी पॉलीइथिलिन (HDPE) वोव्हन फॅब्रिक आणि सॅक (राफिया) उत्पादनाच्या समाधानांवर (solutions) कंपनीचा भर आहे (स्रोत: F&S रिपोर्ट, पृष्ठ १९३).

​वित्त वर्ष २०२६ मध्ये (FY26) ऑपरेशन्सद्वारे मिळालेला कंपनीचा महसूल १७,१६९.९५ दशलक्ष रुपये होता, जो आधीच्या वर्षी १३,७६८.७२ दशलक्ष रुपये होता. वित्त वर्ष २०२६ मधील कंपनीचा निव्वळ नफा १,९३४.५२ दशलक्ष रुपये होता, जो आधीच्या वर्षी १,१७८.४१ दशलक्ष रुपये होता.

​इक्वायरस कॅपिटल लिमिटेड (पूर्वीची इक्वायरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड) आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड हे बुक-रनिंग लीड मॅनेजर्स आहेत, आणि MUFG इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ही ऑफरची रजिस्ट्रार आहे.

​हे इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि बीएसई लिमिटेड (BSE) वर सूचीबद्ध (List) करण्याचे प्रस्तावित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!