कबड्डी दिनी आयडियलतर्फे शालेय खेळाडूंसाठी मोफत नियम मार्गदर्शन शिबीर
याप्रसंगी उत्कृष्ट शिबिरार्थी व आयडियल कबड्डीरत्न पुरस्कार सोहळा माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते,
POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON 09/07/2026 (8850212023)
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे समता विद्या मंदिर सहकार्याने कबड्डी दिन – १५ जुलैनिमित्त शालेय खेळाडूंसाठी मोफत कबड्डी नियम मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शालेय खेळाडूंना कबड्डीचा दम, मध्य-निदान-बोनस रेषा ओलांडण्याबाबत, राखीव क्षेत्र आदीबाबत कबड्डी खेळाच्या प्रमुख नियमांची माहिती करून देण्याचा उद्देश आहे. याप्रसंगी उत्कृष्ट शिबिरार्थी व आयडियल कबड्डीरत्न पुरस्कार सोहळा माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते, समता विद्या मंदिरचे सचिव राजेश सुभेदार व मुख्याध्यापिका भारती पोवळे, संयोजक लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

कबड्डीच्या प्रमुख नियमांची ओळख झाल्यास नवोदित शालेय खेळाडूंचे शंकानिरसन होऊन ते अधिक प्रमाणात कबड्डी खेळाकडे आकृष्ट होण्यास मदत होईल, अशी आशा गेले दशकभर सातत्याने शालेय कबड्डी चळवळ विनाशुल्क राबविणाऱ्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीला आहे. शिबिरास प्रशिक्षक सुनील खोपकर, राष्ट्रीय ख्यातीचे कबड्डीपटू किरण जिकमडे, कबड्डीपटू अनंत विचारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे. समता विद्या मंदिर-साकीनाका, अंधेरी येथे १५ जुलै रोजी सकाळी १०.०० वा. होणाऱ्या सदर शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी विनाशुल्क प्रवेशासाठी सुनील खोपकर (९७०२० ८०३४३) यांच्याकडे ११ जुलैपर्यंत संपर्क साधा



