मनोरंजन कॅटेगरी

वाद निर्माण करणारी की नाती जोडणारी? ‘भागुबाई’ची खरी ओळख जाणून घ्या, आता ‘अल्ट्रा झकास’वर!

'भागुबाई'चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर आज पासून फक्त अल्ट्रा झकासवर

मुंबई, : आजच्या धावपळीत कुटुंबासोबत निवांत वेळ घालवताना एखादा हलकाफुलका, मनोरंजक आणि मनाला स्पर्श करणारा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर ‘भागुबाई’ हा मराठी चित्रपट उत्तम पर्याय आहे.गावातील गप्पा, नात्यांमधला गोडवा आणि त्यातून उलगडणारे आयुष्याचे धडे यांची मनोरंजक सांगड घालणारा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘भागुबाई’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर १२ जून २०२६ ला ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर होणार आहे.

‘भागुबाई’ एक मनमिळाऊ, मदतीला नेहमी पुढे असणारी आणि गप्पा मारायला आवडणारी बाई. गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तिला खबर असते आणि नकळत ती त्या गोष्टी इतरांनाही सांगत राहते. तिच्या या स्वभावामुळे कधी मजेशीर प्रसंग घडतात, तर कधी गैरसमज आणि भांडणंही होतात. पण तिच्या बोलण्यामागे कोणाचंही वाईट करण्याचा हेतू नसतो, हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात येतं.

एका टप्प्यावर तिच्या गप्पांमुळे गावात मोठा गोंधळ उडतो आणि त्यादरम्यान भागुबाईचा आवाजही जातो, त्यामुळे ती काही काळ बोलू शकत नाही. पण हळूहळू गावकऱ्यांना जाणवू लागतं की भागुबाईच्या गप्पा थांबल्यामुळे गावात शांतता पसरली आहे. पण मात्र जेव्हा ती पुन्हा बोलू लागते, तेव्हा अनेक नात्यांमागची सत्ये आणि तिच्या वागण्यामागचा खरा हेतू समोर येऊ लागतो. तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात येतं की, तिचं बोलणं कधी कधी टोचणारं वाटलं तरी त्यामागे लोकांचं भलं व्हावं हेच होतं.

‘निर्मिती सावंत’ ने साकारलेली भागुबाई ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. त्यांच्यासोबत शशांक शेंडे, मंगेश देसाई, विजय पाटकर आणि भार्गवी चिरमुले यांनीही प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केले असून, श्रद्धा पटेल या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी. ई. ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “मराठी प्रेक्षकांना दर्जेदार आणि कौटुंबिक मनोरंजन देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. ‘भागुबाई’ हा चित्रपट विनोद, भावना आणि समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या कथानकाचा सुंदर संगम आहे. मला खात्री आहे की भागुबाईची आगळीवेगळी कथा आणि तिचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक घरातील प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करेल.”

हास्य, भावना, कौटुंबिक नाती आणि समाजाला विचार करायला लावणारा संदेश यांचा सुंदर मिलाफ असलेला ‘भागुबाई’ हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखा असून, फक्त १९ रुपयांत ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!