आरोग्यमहाराष्ट्र

आयकॉनिक व्हाईटची जगातील सर्वात वेगाने वाढणारा मिलियनेअर व्हिस्की ब्रँड म्हणून घोडदौड कायम

आयकॉनिक व्हाईट: मिलियनेअर व्हिस्की ब्रँड

POSTED BY ANAGHA SAKPAL ON DATED 12/06/2026(9004379946)

मुंबई, (NHI@24.IN): अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्ट्रिलर्स लिमिटेड (एबीडी) या भारतातील आघाडीच्या मद्य कंपनीने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. ड्रिंक्स इंटरनॅशनलच्या मिलियनेअर्स क्लब २०२६ च्या अहवालात आयकॉनिक व्हाईट व्हिस्कीला सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वात वेगाने वाढणारा मिलियनेअर व्हिस्की ब्रँड म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आयकॉनिक व्हाईटने जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणाऱ्या व्हिस्कीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आणि जगभरातील सर्व श्रेणींमध्ये दुसरा सर्वात वेगाने वाढणारा मद्य ब्रँड म्हणून समोर आला. २०२३ मध्ये मिलियनेअर्स क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतर आयकॉनिक व्हाईटने प्रत्येक कॅलेंडर वर्षात आपल्या विक्रीचे प्रमाण दुप्पट केले आहे, ज्यामुळे ही व्हिस्‍की जागतिक मद्य उद्योगातील सर्वात आकर्षक वाढीची कथा बनली आहे. या अहवालात ब्रँडच्या वाढीच्या वाटचालीचे वर्णन ‘इतिहास घडवणारी’ असे करण्यात आले आहे. आयकॉनिक व्हाईटने आपली प्रबळ वाढीची गती कायम ठेवली आहे, ज्यामध्ये मे २०२६ या एकाच महिन्यात आजवरची सर्वोच्च मासिक विक्री नोंदवत १ दशलक्ष केसेसचा टप्पा ओलांडला आहे.

 

कंपनीचा मुख्य ब्रँड ऑफिसर्स चॉईस व्हिस्कीला एकंदरीत जगातील सातव्या क्रमांकाचा मद्य ब्रँड आणि आता जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाचा व्हिस्की ब्रँड म्हणून स्थान मिळाल्याने या ओळखीला आणखी दृढता मिळाली आहे. स्टर्लिंग रिझर्व्ह व्हिस्कीने देखील जगातील आघाडीच्या २५ मिलियनेअर व्हिस्की ब्रँड्समध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे, ज्‍यामधून ग्राहकांचे विविध वर्ग आणि किंमतींच्या पातळीवर अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्ट्रिलर्स लिमिटेडची वाढती ताकद दिसून येते. एकत्रितपणे, हे तिन्ही ब्रँड्स सलग तीन वर्षे ड्रिंक्स इंटरनॅशनलच्या मिलियनेअर्स क्लबमध्ये समाविष्ट झाले आहेत, ज्‍यामधून कंपनीच्या पोर्टफोलिओचे प्रमाण, सातत्य आणि वाढती जागतिक प्रासंगिकता दिसून येते.

ड्रिंक्स इंटरनॅशनलद्वारे दरवर्षी प्रकाशित केला जाणारा मिलियनेअर्स क्लब हा विश्वसनीय जागतिक अहवाल आहे, जो प्रतिवर्षी एक दशलक्ष लिटर केसेसपेक्षा जास्त विक्री करणाऱ्या मद्य ब्रँडची क्रमवारी लावतो आणि आंतरराष्ट्रीय मद्य उद्योगातील सर्वाधिक कामगिरी करणाऱ्या व सर्वात डायनॅमिक नावांवर प्रकाश टाकतो. वरील क्रमवारी ही कॅलेंडर वर्ष २०२५ साठी आहे.

या यशाबाबत मत व्‍यक्त करत एबीडीचे मॅनेजिंग डायरेक्‍टर अमर सिन्हा म्हणाले, “सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वात वेगाने वाढणारा मिलियनेअर व्हिस्की ब्रँड म्हणून ओळख मिळणे हा आयकॉनिक व्हाईटसाठी महत्त्वाचा टप्पा आहे आणि कमी कालावधीत ग्राहकांनी या ब्रँडबद्दल दाखवलेली व्‍यापक पसंती यामुळे दिसून येते. ऑफिसर्स चॉईस आणि स्टर्लिंग रिझर्व्हचे मिलियनेअर्स क्लबमधील सातत्यपूर्ण अस्तित्व आमच्या पोर्टफोलिओची व्यापकता व स्थिरता अधिक अधोरेखित करते.

या मान्‍यतांमधून ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी, सातत्यपूर्ण ब्रँड गुंतवणूक आणि सर्व बाजारपेठांमध्ये शिस्तबद्ध अंमलबजावणी यांवर आमचे असलेले लक्ष दिसून येते. आम्ही आमचा पोर्टफोलिओ प्रबळ करत असताना दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारे आणि ग्राहकांसाठी प्रासंगिक राहणारे ब्रँड्स तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

हा सन्‍मान एबीडीच्या पोर्टफोलिओची व्यापकता अधिक दृढ करतो, ज्यामध्ये प्रस्थापित मोठे ब्रँड्स आणि वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम उत्पादनांचा समावेश आहे. एकत्रितपणे ऑफिसर्स चॉईस, आयकॉनिक व्हाईट आणि स्टर्लिंग रिझर्व्ह हे ग्राहकांच्या विविध वर्गांमध्ये वाढ घडवून आणण्याची कंपनीची क्षमता निदर्शनास आणतात आणि भारतातील, तसेच जागतिक मद्य क्षेत्रात ब्रँडचे स्‍थान दृढ करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!