Business

Amazon कडून भारतात नवीन Fire TV Stick HD लाँच – आतापर्यंतचा सर्वात स्लिम आणि वेगवान HD streaming stick

नवीन Fire TV Stick HD मागील पिढीच्या तुलनेत सरासरी 30 टक्‍के अधिक वेगवान कामगिरी आणि Wi-Fi 6 समर्थनासह फुल एचडी स्ट्रीमिंगचा अनुभव देते.

POSTED BY  : ANAGHA SAKPAL DATED ON 08/06/2026 ( 9004379946 )

हे Amazon चे आतापर्यंतचे सर्वात पोर्टेबल streaming stick आहे, जे Fire TV श्रेणीतील इतर स्टिक्सपेक्षा 30 टक्‍के अधिक स्लिम आहे; हे कोणत्याही wall adapter शिवाय प्रत्‍यक्ष टीव्हीच्या यूएसबी पोर्टद्वारे ऑपरेट केले जाऊ शकते.

Fire TV Stick HD मध्ये नवीन Fire TV Experience देण्यात आला आहे, जो अधिक वेगवान आणि सुव्यवस्थित आहे, ज्यामुळे ग्राहकांचा शोध घेण्याचा वेळ वाचून त्यांना स्ट्रीमिंगसाठी अधिक वेळ मिळेल.

ग्राहक नवीन Fire TV Stick HD 4,999 रूपयांमध्ये Amazon.in, Blinkit, Flipkart, Swiggy Instamart आणि Zepto वरून खरेदी करू शकतात. लवकरच हा डिवाईस रिटेल स्टोअर्समध्येही उपलब्ध होईल.

बेंगळुरू, भारत – 19 मे 2026: Amazon ने भारतात नवीन Fire TV Stick HD च्‍या लाँचची घोषणा केली आहे. हे Amazon चे आतापर्यंतचे सर्वात वेगवान HD streaming stick आहे, जे मागील पिढीच्या तुलनेत सरासरी 30 टक्‍के अधिक वेगवान कार्यक्षमता देते. हे ग्राहकांना HDR10+ आणि Wi-Fi 6 सपोर्टसह फुल एचडी स्ट्रीमिंग, अधिक स्लिम व पोर्टेबल डिझाइन, आणि वेगवान व सुव्यवस्थित नेव्हिगेशनसाठी रिडिझाइन केलेला नवीन Fire TV अनुभव प्रदान करते. Fire TV Stick HD द्वारे ग्राहक विविध कंटेंट प्रदात्यांकडील लाखो चित्रपट आणि टीव्ही एपिसोड्स पाहू शकतात, तसेच कोणत्याही कन्सोलशिवाय Xbox क्लाउड गेमिंगचा आनंद घेऊ शकतात (यासाठी सबस्क्रिप्शन शुल्क लागू असू शकते).

“ग्राहकांची त्यांचा टीव्ही स्ट्रीमिंग अनुभव वेगवान आणि प्रतिसाद देणारा असण्‍याची अपेक्षा आहे, जसे अॅप्स पटकन लोड होणे, कंटेंट सहज शोधता येणे आणि स्ट्रीमिंग विनाअडथळा होणे. आमचे नवीन Fire TV Stick HD नेमके हेच प्रदान करते. हे मागील पिढीच्या तुलनेत सरासरी 30 टक्‍के अधिक वेगवान आहे आणि अखंड स्ट्रीमिंगसाठी आमच्या नवीन, जलद Fire TV इंटरफेससह येते. हे आमचे आतापर्यंतचे सर्वात स्लिम आणि पोर्टेबल Fire TV Stick आहे, जे टीव्हीच्या मागे व्यवस्थित बसते आणि वायरचा पसारा दिसत नाही,” असे Amazon India च्‍या Fire TV विभागाच्‍या प्रमुख सयंतनी चौधरी म्‍हणाल्‍या. “कामगिरीपासून डिझाइनपर्यंत, आम्ही हा डिवाईस एक वेगवान, सुलभ आणि सोयीस्कर स्ट्रीमिंग अनुभव देण्यासाठी डिझाइन केला आहे. भारतातील ग्राहकांसाठी हा डिवाईस सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”

अॅप्सच्या जलद लाँचिंगसह जलद एचडी स्ट्रीमिंग अनुभवाचा आनंद घ्या

Fire TV Stick HD मागील एचडी मॉडेल्सच्या तुलनेत लक्षणीय वेगाने काम करते. हे मागील पिढीच्या तुलनेत सरासरी 30 टक्‍के अधिक वेगवान आहे, म्‍हणजेच, हा डिवाईस अधिक वेगाने सुरू होतो आणि अॅप्स देखील पटकन उघडतात. हे HDR10+ सह 1080p फुल एचडी स्ट्रीमिंग प्रदान करते. तसेच, यात Bluetooth 5.3 आणि Wi-Fi 6 चा सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे इंटरनेटचा वेग कमी असतानाही विश्वसनीय आणि दर्जेदार व्हिडिओ स्ट्रीमिंगचा अनुभव मिळतो.

आतापर्यंतच्या सर्वात स्लिम Fire TV Stick सह स्ट्रीमिंगचा कुठेही अनुभव घ्‍या

नवीन Fire TV Stick HD हे Amazon चे आतापर्यंतचे सर्वात स्लिम streaming stick आहे, जे Fire TV श्रेणीतील इतर स्टिक्सपेक्षा सुमारे 30 टक्‍के अधिक स्लिम आहे. हे Direct Power द्वारे प्रत्‍यक्ष टीव्हीच्या यूएसबी पोर्टवरून चालवता येते, ज्यामुळे कोणत्याही wall adapter ची गरज उरत नाही आणि ते टीव्हीच्या मागे व्यवस्थित बसते. हा नवीन डिवाईस प्रवासाच्या बॅगेत किंवा लहान खिशातही सहज मावेल अशा प्रकारे डिझाइन केला आहे, ज्‍यामुळे ग्राहक प्रवास करताना देखील त्यांच्या आवडत्या कंटेंटचा आनंद घेऊ शकतात.

कंटेंट शोधण्यात वेळ कमी घालवा आणि स्ट्रीमिंगचा आनंद जास्त घ्या

Fire TV Stick HD नवीन Fire TV Experience सह येते, जे अधिक सुटसुटीत, वेगवान आणि सुव्यवस्थित असण्‍यासाठी पुन्‍हा डिझाइन करण्यात आले आहे. यात चित्रपट, टीव्ही शो, फ्री कंटेंट आणि लाइव्ह कंटेंटसाठी स्वतंत्र श्रेणी देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना जे पाहायचे आहे ते पटकन शोधणे सोपे होते. तसेच, या इंटरफेसमध्ये स्मार्ट होम कंट्रोल्स सहज उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ज्यामुळे एसी, गिझर, पंखे आणि लाइट्स यांसारखी Alexa-सुसंगत स्मार्ट अप्‍लायन्‍सेस ऑपरेट करणे अधिक सोयीचे होते.

2026 च्या सुरुवातीला Amazon ने आपले रिडिझाइन केलेले Fire TV Mobile App भारतात लाँच केले. या अपडेटेड अॅपमुळे ग्राहक प्रत्‍यक्ष त्यांच्या स्मार्टफोनवरून कंटेंट शोधू शकतात, आपली वॉचलिस्ट व्‍यवस्‍थापित करू शकतात आणि टीव्हीवर रिमोटली टायटल्स प्ले करू शकतात. या अॅपचा नवीन लूक आणि फील Fire TV च्या नवीन इंटरफेसशी सुसंगत आहे.

सर्व मनोरंजनाचा आनंद एकाच ठिकाणी मिळवा

Fire TV Stick HD च्या मदतीने ग्राहक अॅपस्‍टोअर वरील हजारो अॅप्स जसे Prime Video, Netflix, JioHotstar, YouTube, Zee5 आणि इतर अनेक अॅप्सद्वारे लाखो चित्रपट आणि टीव्ही शोचा आनंद घेऊ शकतात (यासाठी सबस्क्रिप्शन शुल्क लागू असू शकते). तसेच, ग्राहक मोफत/जाहिरात-समर्थित कंटेंट पाहू शकतात, ज्यामध्ये क्रीडा सामने, बातम्या आणि इतर लाइव्ह कंटेंटचा समावेश आहे. Alexa Voice Remote मुळे Alexa ला व्हॉईस कमांड देऊन किंवा रिमोटवरील प्री-सेट बटणे वापरून कोणताही कंटेंट शोधणे आणि पाहणे अत्यंत सोपे होते.

Fire TV Stick HD मुळे पहिल्यांदाच Fire TV HD स्ट्रीमिंग डिवाईसेसवर क्‍लाऊड गेमिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे ग्राहकांना कोणत्याही कन्सोलशिवाय त्यांच्या आवडत्या Xbox गेम्सचा आनंद घेता येईल. हे नवीन streaming stick सुसंगत ब्लूटूथ कंट्रोलरसोबत जोडून ग्राहक Fire TV Stick HD वरील Xbox अॅपद्वारे शेकडो क्लाउड-सक्षम गेम्स खेळू शकतात (यासाठी Xbox Game Pass सबस्क्रिप्शन आवश्यक आहे).

किंमत आणि उपलब्धता

ग्राहक Fire TV Stick HD फक्त 4,999 रूपयांमध्ये Amazon.in, Blinkit, Flipkart, Swiggy Instamart आणि Zepto वरून खरेदी करू शकतात. हा डिवाईस लवकरच रिटेल स्टोअर्समध्येही उपलब्ध होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!